मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६५७१ ते ६५८० निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८० Translation - भाषांतर त्यानंतर तुकाराम बावांनीं भजन करुन देवांस आरती करुन लळीत केलें. आरती॥६५७१॥जगदीश जगदीश तुज म्हणती । परि या जना माजी असशील युक्ती ॥पुण्य पाप विरहित सकळां अधिपती । दृष्टा परी नळणी अलिप्त गती ॥१॥जयदेव जयदेव जय पंढरीनाथा श्री पंढरीनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥२॥आगमनिगम तुज नेणती कोणी । परी तूं भावभक्ति जवळीच दोन्ही ॥नेणतां विधियुक्त राते पूजनीं । न माय ब्रम्हांडीं संपुष्ट शयनीं ॥३॥असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुख एक चावितो धुंडें ॥भक्तां शरणांगतां चाले तो पुढें । दावी वाट जाऊं नेदी वांकुडें ॥४॥एकाएकीं बहू विस्तरला सुखें । खेळे लीळा त्याची तोचि कौतुकें ॥तेथें नरनारी कवळ बाळकें । काय पाप पुण्य कवण सुख दु:खें ॥५॥सकळां वर्मा तूंचि जाणसी एक । बंध मोक्ष प्राप्त आणि सुखदु:ख ॥आणूं म्हणती तुज ठकलीं बहुतेक । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥६॥लळीतें॥६५७२॥कळस वाहियेला शिरीं । सहस्त्र नामें पूजा करीं ॥१॥पीक पिकलें पिकलें । घन दाटूनियां आलें ॥२॥शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥३॥तुका ह्मणे पोट । भरलें वारले बोभाट ॥४॥॥६५७३॥गलित झाली काया । हेंचि लळीत पंढरीराया ॥१॥आलें अवसानापासीं । रुप राहिलें मानसीं ॥२॥वाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥३॥तुका म्हणे गोड झालें । नारायणीं पोट धालें ॥४॥॥६५७४॥बोलाचे गौरव । नव्हे माझा अनुभव ॥१॥माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकां पांगिली ॥२॥व्याली वाढविलें । निजपदीं निजविलें ॥३॥दाटली रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥४॥विष्णु जोडी कर । रज माथां वंदी हर ॥५॥तुका म्हणे बळ । तोरडी हा कळी काळ ॥६॥====सप्तरात्री देव व भक्ता बरोबर क्रमून निर्याण काळ समीप आला असें पाहून इंद्रायणीच्या कांठीं भजन करीत चालले तेव्हां देवादि विमानांत बसून समारंभ पाहवयास आले.॥६५७५॥वाट वैकुंठीं पहाती । भक्त कैं पा येथें येती ॥ तयां जन्म मरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥धन्य धन्य हरीचे दास । तया सुलभ गर्भवास ॥ब्रह्मादिक करिती आस । तीर्थे वास भेटिची ॥२॥कथा श्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस ॥पाहाती रात्रंदिवस । वाट कर जोडूनियां ॥३॥रिद्धीसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां ॥मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥४॥असती जेथें उभे ठेले । सदां प्रेमसुखें धाले ॥आणिकही उद्धरीले । महा दोषी चांडाळ ॥५॥सकळ करिती त्यांची आस । सर्व भावें ते उदास ॥धन्य भाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥६॥॥६५७६॥नाहीं कंटाळलों परी वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥जनवन आम्हां समानचि झालें । काम क्रोध केले पाठवणी ॥२॥षड् ऊर्मि शत्रु जिंकिलें अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥३॥मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥४॥ह्मणऊनी तुका अवलोकोनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥५॥॥६५७७॥आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥केलें तरी आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥२॥नाहीं भक्तराजीं ठेविला उद्धार । नामाचा आकार त्यांचियानें ॥३॥तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥४॥====प्रयाणापूर्वी पंढरीनाथानीं तुकारामबावास प्रायश्चित्त घेण्यास सांगितलें. ॥६५७८॥एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ॥१॥अहंकार नांवें दोष । त्याचें ओस पाडिलें ॥२॥अनुतापें स्नानविधी । यज्ञसिद्धि देह होम ॥३॥जीव शिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥४॥॥६५७९॥झाली होती काया । बहुत मलीन पंढरीराया ॥१॥तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥२॥अनुतापें झाला झाडा प्रालब्धानें केला तोडा ॥३॥तुका ह्मणे देह पायीं । ठेउनी झालों उतराई ॥४॥॥६५८०॥संसाराचे अंगीं अवघीं च व्यसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥आतां हें सोंवळें झालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥२॥ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥३॥तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP