राजधर्म विचार- व्यवहार नीति

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


सभा, राजा व राज पुरुष यांनी देशाचा व शास्त्र व्यवहार यांच्या सहाय्यानें पुढे लिहिलेल्या आठरा विवाद स्थानांचा प्रति दिवशीं निर्णय करावा. जे नियम पूर्वीच्या शास्त्रांत नसतील व ज्यांची देशकालानुसार आवश्यकता वाटेल ते उत्तमोत्तम नियम करुन राजा व प्रजा यांची उन्नति करावी.
विधि आणि निषध रुपानें अधिकार्‍याची अपेक्षा विवाद स्थानें अठरा आहेत. तीं हीं [१] ऋण देणें आणि घेतले असेल तर त्या संबंधाचा विवाद, [२] सर्वांनी एकत्र मिळून कांही कृत्य करणें [३] ठेव, किंवा कोणी कोणाकडे कांही पदार्थ कांही कामा निमित्य ठेवलेला असतो, त्यासंबंधी वाद; (४) एकाचा पदार्थ दुसर्‍यानें मालकाच्या आज्ञेशिवाय विकणें; [५] दिलेला पदार्थ मागितला असतां पुन: परत न करणें; (६) नोकरी करणाराला जो पगार मिळतो तो कमी करणें किंवा त्यांतील कांही भाग आपण घेंणे; (७) केलेल्या प्रतिज्ञेचे पालन न करणें [८] पशूंचा स्वामी व पालक यांत होणारा वादविवाद; [९] सीमेच्या संबंधाचा वाद; (१०) कठोर शिक्षा करणें; [११] शिव्या गाळी, बेअब्रू, किंवा कडक भाषण करुन दुसर्‍याला दु:खविणें; [१२] चोरी करणें, दरवडा घालणें; (१३) बलात्कारानें करुन कांही काम करणें; (१४) परस्त्रीला घेऊन जाणें; (१५) स्त्री पुरुषांदिकांच्या धर्मामध्यें व्यतिक्रम होणें; (१६) दायविभाग संबंधी वादविवाद; [१७] घेण्या देण्यांत वादविवाद; [१८] जड व चेतन पदार्थाला डावामध्यें धरुन जुगार खेळणें. ही अठरा प्रकारची परस्पर वादिप्रतिवादीमध्यें उत्पन्न होणारी विवादस्थानें आहेत याचा निर्णय करतांना राजा व राज पुरुषांना उचित आहे कीं, त्यांनी अठरा प्रकारचे विवादमधून कोणत्याही विवादाचें कारण उपस्थित झाल्यावर तत्वाचा विचार करुन यथार्थ न्याय करणें, तथा अपराध्याला यथा योग्य दंड करणें या विषयाचा विस्तार राजनीतीच्या ग्रंथामध्यें पाहूण घेतला पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP