वर्णाश्रमधर्मनिर्णय - संन्यासाश्रम

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


संन्यासाश्रम.
आयुष्याचा तिसरा भाग होईपर्यंत वनामध्यें घालवून म्हणजे वानप्रस्थाश्रमाचे नियम पालन करून आयुष्याचा चतुर्थ भागांत सर्वत्र व सर्वदा ज्ञानाच्या द्वारां एक आत्म्याला [ ब्रम्हस्वरुपाला] पाहाणें, म्हणजे अद्वैत व वेदांत ब्रम्हविद्याचें द्वारा ब्रम्हस्वरुपाचें श्रवण, मनन आणि निधिध्यासन करणें याला संन्यासाश्रम असें म्हणतात. या संन्यासाश्रमाचें गृहण करण्यामध्यें तीन पक्ष मानिले गेले आहेत. ते खाली लिहिलेल्या शतपथ ब्राम्हणाच्या वाक्यापासून कळतील.
॥ ब्रम्हचर्यं समाप्य गृही भवेत्‍ । गृही भूत्वा वनी भवेत ।
॥ वनी भूत्वा प्रव्रजेत्‍ ॥१॥
॥ यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत्‍ । ॥ गृहाद्वनाद्वा ॥२॥
॥ ब्रम्हाचर्यादेव प्रवजेत्‍ ॥३॥
अर्थ:- ब्रम्हचर्याश्रम पूर्णपणें संपवून गृहस्थाश्रम करावा नंतर बानप्रस्थी बनून शेवटीं संन्यास घ्यावा हा एक पक्ष आहे. दुसरा पक्ष, ज्या दिवशी विरक्तता उत्पन्न होईल त्याचे दिवशी संन्यास घ्यावा, मग तो गृहस्थाश्रमामध्यें असो किंवा वानप्रस्थश्रमामध्यें असो"  या दुसर्‍या पक्षामध्यें वानप्रस्थाश्रम न करितां गृहस्थाश्रमामधूनच संन्यास घ्यावयास हरकत नाही. तिसरा पक्ष:- " गृहस्थ-वानप्रस्थ हे दोन आश्रम सोडून ब्रम्हचर्याश्रम पूर्ण्पणें संपवून संन्यास घ्यावा.
याचप्रमाणें जाबाल श्रुतींमध्यें कोणत्याही आश्रमांतून संन्यास स्वीकारावा असेंहि सांगितले आहे. परंतु आम्ही येथें विस्ताराच्या भयास्तव लिहीत नाही. या संन्यासाश्रमाची खालीं सांगितल्याप्रमाणें कर्तव्यें [ धर्म ] आहेत.
॥ अगारादभिनिष्क्रांत: पवित्रोपचितो मुनि: ॥
॥ समुषोढेषु कामेषु निरपेक्ष: परिव्रजेत‍ ॥४॥ मनु अ. ६ श्लो. ४१
॥ अनग्रिरनिकेत: स्याद्‍ग्राममन्नार्थमाश्रयेत्‍ ॥
॥ उपेक्षकोऽशंकुसुको मुनिर्भावासमाहित: ॥५॥ मनु अ. ६ श्लो. ४३
॥ अलाभे न विषादी स्याल्लाभे चैव न हर्षयेत्‍ ॥
॥ प्राणायात्रकमात्र: स्यान्मात्रासंगाद्विनिर्गत: ॥६॥ मनु अ. ६ श्लो. ५७
॥ अतिवादांस्तितिक्षेत नावमन्येत कंचन ॥
॥ न चेमं देहमाश्रित्य वैरं कुर्वीत केनचित‍ ॥७॥ मनु अ. ६ श्लो. ४७
अर्थ:- घरांतून बाहेर निघाल्यापासून पवित्रांनी ( मंत्र, जप,दर्भ, कमंडलु इत्यादिकांनी ) युक्त, मुनि असा काम समीप प्राप्त झाले असतां त्याविषयी निरपेक्ष असावें म्हणजे त्या पदार्थाला मनानें पाहू नये, श्रवण करूं नये, त्यांच्या जवळ राहू नये [ असें सर्व इच्छा रहित होऊन मुनीनें संन्यासाश्रम स्वीकारावा] ॥४॥
अग्नि व गृह यांनी रहित [ कमंडल्वादिक पदार्थ अथवा वाध्यादियुक्त शरीर यांच्यावार ] उपेक्षा करणारा ( ममता रहित ) अशंकुसुक [ स्थिरबुद्धि] मुनिधर्म ( ब्रम्हविचार) धारण करणारा चित्तानें समाधानयुक्त [ मानसिक कल्पना वर्ज्य करणारा]  असा असून भिक्षेसाठी मात्र गांवांत जावें ॥५॥
भिक्षा न मिळाली असतां खेद मानूं नये, मिळाली असतां हर्ष मानूं नये, केवळ प्राणरक्षण होईल इतकें अन्न अथवा कंदमूल फलें याचें भोजन करुन रहावें. मात्र ( कमंडलु इत्यादिक) त्यांच्याविषयी आसक्ति करुं नये ॥६॥
दुसर्‍या मनुष्यांन्ची निष्ठुर भाषणें सहन करावी, कोणाचा तिरस्कार करुं नये. या अस्थिर देहाचा आश्रय करून कोणाशी वैर करुं नये ॥७॥
॥ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत्‍ ॥
॥ सत्यपूतां वदेद्वाचं मन:पूतं समाचरेत्‍ ॥८॥ मनु अ. ६ श्लो. ४६
॥ ध्यानं शौचं तथा भिक्षा नित्यमेकान्तशीलता ॥
॥ भिक्षोश्वत्वारि कर्माणि पश्चमो नोपपद्यते ॥९॥ भगवतो दक्षत्य वचनम्‍
॥ यदा भावेन भवति सर्वभावेषु निस्पृह: ॥
॥ तदा सुखमवाप्नोति प्रेत्य चेह च शाश्वतम्‍ ॥१०॥ मनु अ. ६ श्लो. ८०
॥ सम्यग्दर्शनसंपन्न: कर्मभिर्न निबध्यते ॥
॥ दर्शनेने विहीनस्तु संसारं प्रतिपद्यते ॥११॥ मनु अ. ६ श्लो. ७४
अर्थ:- नेत्रांनी शुद्ध भूमि पाहून पाऊल टाकावें ( जलांत सूक्ष्म प्राणी मल वगैरे असतात तन्निवारणार्थ) वस्त्रानें गाळून उदक प्राशन करावें, सत्यानें पवित्र वाणी बोलावी, मनानें पवित्र असें जे ज्ञात तें आचरण करावें ॥८॥
"ध्यान" म्हणजे सर्वत्र आणि सर्वदा ज्ञानाचे द्वारां फक्त आत्म्याचा ( ब्रम्हाचा) साक्षात्कार करून घेणें ’शौच’ म्हणजे अंतर्बाह्य पवित्र रहाणें, "भिक्षा" म्हणजे शरीराचें रक्षण करण्यासाठी पवित्र अन्न ग्रहण करणें, व " एकान्तशीलता" ह्म. एकान्त ( जनरहित) स्थानामध्यें राहाणें, ही चार कर्मे संन्यासाश्रमाची प्रत्येक दिवशी करावयाची कर्तव्ये आहेत. यांच्याशिवाय पांचवे कर्म नाही ॥९॥
ज्या वेळी सर्व भावांचे ठायी ( विषयांचे ठायी) परमार्थाच्या दृष्टीनें विनाशित्व आहे असें समजून नि:स्पृह [ अभिलाषशून्य] होतो, त्यावेळीं इहलोकीं संतोषजन्य सुख व परलोकीं अविनाशी मोक्षसुख मिळतें ॥१०॥
जो संन्यासी सम्यग्‍दर्शनानें ( ब्रम्हसाक्षात्कारानें) संपन्न होतो तो कर्मांनी बद्ध होत नाहीं ( कारण ब्रम्हसाक्षातकार) झाला असतां पुण्यपापाचा नाश होतो ) जो ब्रम्हसाक्षात्कारानें शून्य तो जन्म मरणरुप बंधाला पावतो ॥११॥
॥ जराशोकसमाविष्टं रोगायतनमातुरम्‍ ॥
॥ रजस्वलमनित्यं च भूतावासमिमं त्यजेत्‍ ॥ मनु अ. ६ श्लो. ७७
॥ अनेन क्रमयोगेन परिव्रजति यो द्विज: ॥
॥ स विधूयेह पाप्मानं परं ब्रम्हाधिगच्छति ॥१३॥ मनु अ. ६ श्लो. ८५
॥ एष धर्मोऽनुशिष्टो वो यतीनां नियतात्मनाम्‍ ॥
॥ वेद संन्यासिकानां तु राजयोगं निबोधत‍ ॥१४॥ मनु अ. ६ श्लो. ८६
अर्थ:- जरा व शोक यांनी युक्त; रोगांचे गृह; आतुर [ क्षुधातहान, शीत, उष्ण यांनी पीडलेले ] रजोगुणानें युक्त; अनित्य; पृथिव्यादि पंचमहाभूतांचे वसतिस्थान असें जे जीवांचे गृह असें शरी याचा त्याग करावा, ह्मणजे ब्रम्हज्ञानरुपी उद्कानें अविद्या रुपी मलाला धुऊन काढणें अथवा ब्रम्हज्ञारुपी खड्गानें संसाराचे मूल जी अविद्या तिला छेदणें. ॥१२॥
क्रमानें ही ( पूर्वोक्त) अनुष्ठाने करुन जो द्विज म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य संन्यासाश्रम धारण करितो तो इहलोकी सर्व पाप टाकून परब्रम्हाला पावतो. ( ब्रम्हसाक्षात्कारानें उपाधि शरीराचा नाश होऊन ब्रम्हाच्या म्हणजे आत्म्याच्या ऐक्यतेला पावतो. ) ॥१३॥
मी तुह्माला जे नियतात्मेयती त्या सर्वांचा साधारण धर्म सांगितला. आतां यतींमध्ये विशेष ज्ञानवंत राजयोगी [ म्हणजे मठाधिकारी आचार्य ] संन्यासी त्यांचा विशेष धर्म सांगतो, श्रवण करा ॥१४॥
हस्तामलक ग्रंथांत पुढीलप्रमाणें गुरुमहिमा वर्णिला आहे: -
॥ गुरुपरंपरा पद्धती ॥ समूळ सांगावी लागे ग्रंथी ॥ संपता ग्रंथांचे अंती ॥ गुरुस्तुति वदावी ॥१५॥
॥ कलौ रुद्रौ महादेवो लोकानामीश्वर: पर: ॥
॥ सर्व व्यापकश्चैतन्यरुपेणाद्यापि तिष्ठति ॥१६॥
॥ नारायणं १ पद्मभवं २ वसिष्ठं ३ शक्तिंच ४ तत्पुत्रपराशरंच ५॥
॥ व्यासं ६ शुकं ७ गौडपदं ८ महांतं ९ गोविंदयोगिंद्रमथास्य शिष्यम‍॥१७॥
॥ श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम्‍ ॥
॥ तत्रोटकं वार्तिककारमन्यानस्मद्‌गुरुन्संतत मानतोऽस्मि ॥१८॥
॥ मुळी मुख्य श्री गुरुनारायण । त्याचा शिष्य चतुरानन ॥ तेणें उपदेशिला आपण । श्री वसिष्ट जाण महामुनीं ॥१९॥
वसिष्ठें उपदेशिला शक्तिस । शक्तिनें उपदेशिला परास्क ॥२०॥
परास्कें उपदेशिला गौडपादाचार्यास । तेथूनि संन्यासपद्धती ॥२१॥
संन्यासगुरु गौड पादाचार्य । तच्छिष्य गोविंदपदपूज्यवर्य ॥ तेणें केलें शिष्यद्वय । विवर्णाचार्य आणि शंकरु ॥२२॥
प्रबोध धैर्य अतिवीर्य । ज्ञानगुणें गुणगांभीर्य ॥ निजात्मज्ञानें अति औदार्य । तो शंकराचार्य त्रिन्मूर्ति ॥२३॥
दशाचार्य दशसंन्यासी । जे बोलिले व्यासपूजेसी ॥ त्याचे सांगेन विभागासी । यथान्वयेंसी पद्धती ॥२४॥
दशाचार्यांची अति थोरी । पूर्वाचार्य श्रेष्ठाचार्‍ही शंकराचार्य पासोनी ज्ञानगजरी ॥ आचार्यत्व वरी दाहीजन ॥२५॥
पूर्वाचार्य चहूचा विभाग । आदौ गौड पादाचार्य ॥ दुसरा गोविंद भगवत्पदावर्य । त्या पासोनी विवर्णाचार्य । मुख्य आचार्य श्री शंकरु ॥२७॥
शंकराचार्यापासोनी षडाचार्य । विश्वरुपाचार्य एक । पृथ्वी धराचार्य दुसरा देख । सहजाचार्य हस्तामलक । वेदवेदान्त व्याख्याता ॥२८॥
पद्मपादाचार्य त्रोटाकाचार्य । इतुकेन संपले दशाचार्य । सन्याशामाजी हे अतिवर्य हे परम्‍ सूर्य ज्ञानाचे ॥२९॥
आश्रम धर्मी अतिवीर्य । ज्ञानदानें श्रेष्ठ शौर्य ॥ ते चौघे झाले मठाचार्य । मठ पर्याय तो ऐका ॥३०॥
शंकराचार्य उपदेशी । त्या पासोनी दशसंन्यासी ॥ सांगेन त्याचीया नांवासी । यथान्वयेंसी विभाग ॥३१॥
अथ संन्यास दश नामानि मठाम्राय तीर्थाश्रम २ बनाश्रम ३ अरण्य ४ गिरि ५ पर्वत ६ सागर: ७ ॥
सरस्वती ८ भारतीच ९ पुरी १० नामानि वैदश ॥३२॥
तीर्थ १ आश्रम २ बन ३ अरण्य ४ ॥ गिरी ५ पर्वत ६ सागर ७ ॥
सरस्वती ८ भारती ९ नामाभिधान ॥ पुरि १० ही परिपूर्ण दहा नांवें ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP