आश्विन वद्य ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


राजाराम पन्हाळ्याहून जिंजीस !

शके १६११ च्या आश्विन व. ८ रोजीं शिवाजीमहाराज यांचे चिरंजीव राजाराममहाराज हे जिंजीस जाण्यासाठीं पन्हाळ्याहून निघाले. बादशहाच्या हातीं संभाजी सांपडल्यावर त्याला जास्तच चेव आल्यासारखें झालें होतें. रायगड घेण्यासाठीं झुल्फिकारखानाची रवानगी झाली होतीच. अशा वेळीं कांही व्यवस्था करुन राजाराम रायगडावरुन प्रतापगडास आला होता. रायगड किल्ला हातीं आल्यावर राजारामास पकडण्यासाठीं बादशहाची धांवपळ सुरु झाली. त्या फौजांनीं प्रतापगडास सुद्धां वेढा दिला; तेव्हां राजारामाला आपला मुक्काम पन्हाळगडावर करावा लागला. बादशहाच्या फौजेस तोंड देण्याचें कार्य मराठे लोक अत्यंत नेटानें करीत होते. संभाजीचा वध ज्या ठिकाणीं झाला त्याच ठिकाणीं संताजी घोरपडे यानें रायगडास वेढा घालणार्‍या इतिकदखानावर छापा घालून त्याचे पांच हत्ती आणून पन्हाळ्यावर राजारामास सादर केल्यावर राजारामास मोठा संतोष वाटला. आणि त्यानें संताजीस ‘ममल्‍कत मदार’ नव्हता. त्यानें शेख निजाम या सरदारास पन्हाळा काबीज करण्यासाठी पाठविलें. परंतु फौज थोडी असल्यामुळें निजामास यश आलें नाहीं; आणि राजारामाचा निभाव लागणें शक्य झालें. परंतु पुढें मोठ्या तयारीनिशीं बादशहानें रुहुल्लाखान यास ताबडतोब पन्हाळ्यावर पाठविलें. त्या वेळीं मात्र राजारामास पन्हाळा सोडण्याखेरीज गत्यंतर नव्हतें. "निघण्यापूर्वी त्यानें देवीच्या नवरात्राचा उत्सव साजरा केला. आणि आश्विन व. ८ रोजीं तो बाहेर पडला, तेव्हा वेढा घालणारें प्रचंडा सैन्य प्रथमच त्याच्या दृष्टीस पडलें." राजाराम प्रथम रांगण्यास गेला. तेथून सुमारें एक महिन्यानंतर बेलोर येथें जाऊन पोंचला आणि पुढें नोव्हेंबर महिन्यांत तो जिंजीस आला. या त्याच्या दीर्घ प्रवासांत लोकांचे अत्यंत हाल झाले. नाना प्रकारचीं संकटें सोसावीं लागलीं. राजारामाच्या सुरक्षेचें श्रेय प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रुपाजी भोसले, इत्यादि एकनिष्ठ सेवकांनाच आहे.

- २६ सप्टेंबर १६८९

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP