आश्विन शुद्ध ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


बाजीरावाची निजामाविरुद्ध मोहीम !

शके १६४९ च्या आश्विन शु. ११ रोजीं पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव यांनी निजामावर मोहीम सुरु केली. या सुमारास बाजीराव कर्नाटकाचे स्वारीवर होता. इकडे कोल्हापूरच्या संभाजीनें चंद्रसेन जाधवाच्या द्वारें निजामाशी संधान लावलें. सर्व फौज घेऊन तो निजामास मिळाला. तेव्हां निजामानें उचल खाल्ली. त्याचें उग्र स्वरुप शाहूच्या नजरेस आलें ! बाजीरावास शाहूनें दक्षिणेंतून बोलावून घेतलें. शाहूच्या नजरेस आलें ! बाजीरावास शाहूनें दक्षिणेंतून बोलावून घेतलें. शाहूच्या जमवाजमवींस उशीर झाल्यामुळें निजामानें उठविलेला दंगा सर्वत्र पेट घेत होता. मराठ्यांत दुही माजावी म्हणून निजाम आटोकाट प्रयत्न करीत होता. कोल्हापूरकर संभाजी, रावरंभा निंबाळकर, चंद्रसेन जाधव, आदि मंडळी हाताशीं होतीच. शाहूकडेल लोक ज्या वेळीं निजामच्या राज्यांतील चौथाई व सरदेशमुखीच्या हक्कांची वसुली करण्यास गेले त्या वेळीं त्यांना हांकून देण्यांत आलें. "तुमचे लोक वसूल करण्यास येता आणि कोल्हापूरकर संभाजी राजाचेहि येतात. या तुम्हां दोघांपैकीं खरा वारस कोण ते आगोदर ठरवा, आणि मग वसुलीस या" असा मग्रूरीचा निरोप निजामाचा होता. यामुळें शाहूस अत्यंत क्रोध आला. बाजीराव कर्नाटकाचे स्वारीवर होता, तरी त्यानें कळविलें : ‘निजाम गर्वानें चढूण गेला आहे. मला आज्ञा द्या; मी त्याचा मोड करतों." शाहूकडून परवानगी मिळाल्यावर बाजीराव फौज जमविण्याच्या उद्योगास लागण्यासाठी सन १७२७ च्या एप्रिलास सातार्‍यास येऊन दाखल झाला. निजामानें अगदीं भीमेपर्यंतची सत्त्ता काबीज केली होती. तेव्हां त्यास गनिमी काव्यानें हरण करण्याचें बाजीरावानें ठरविलें. आणि सर्व जमवाजमव करुन आश्विन शु. ११ ला मोहीम सुरु केली. सन १७२८ च्या फेब्रुवारीपर्यंत पालखेड येथें निजामाचा पराभव होऊन ही मोहीम संपली. बाजीरावाच्या कर्तृत्वाची छाप सर्व भारतांत पडली. ‘मराठी राज्याचा विस्तार बाजीरावच करील’ अशी खात्री शाहूची झाली.

- १३ सप्टेंबर १७२७

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP