ज्येष्ठ शु. ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


राणा प्रतापसिंहाचा जन्म !

शके १४६२ च्या ज्येष्ठ शु. ३ रोजीं उदेपूरचा पराक्रमी राणा प्रतापसिंह याचा जन्म झाला.
अतुल पराक्रम, आत्यंतिक स्वार्थत्याग, मूर्तिमंत देशाभिमान,आणि धर्माभिमान इत्यादि गुणांमुळें राणा प्रतापांचें नांव अजरामर झालें आहे. प्रजापसिंह हा उदयसिंहाचा पुत्र. गादींवर आल्यापासूनच चितोडचें पूर्वीचें वैभव व सामर्थ्य परत आणण्याच्या तयारीस राणा प्रताप लागला.परिस्थिति प्रतिकूल होती. बहुतेक रजपुतांनीं मुसलमानांना आपल्या मुली देऊन सोयरीक केली होती. प्रतापी राण्याला हें सहन झालें नाहीं. मागील राणे कमकुवत निघाले, तेवढया अवधींत अकबर बादशहानें सारीं रजपूत राज्यें आपल्या ताब्यांत आणण्याचा सपाटा चालविला होता. चितोड परत घेणें हें राणा प्रतापाचें ध्येय होतें. त्यासाठीं त्याला कित्येक दिवसपर्यंत रानावनांतून हिंडावें लागलें, कंदमुळांवर निर्वाह करावा लागला. त्याची धडाडी पाहून अकबर म्हणे, “मला शरण ये, मी तुला तुझें राज्य देतों.” त्यावर राणा प्रताप सांगे, “मी बाप्पारावळचा वंशज, राज्यप्राप्तीसाठीं शत्रूला शरण जाऊन अभिमानशाली रजपूत कुल कलंकित करणार नाहीं.” चिंत्डच्या गादीवरुन उदेपूरचें घराणें पदच्युत झाल्यापासून चितोडला एक प्रकारचें वैधव्य आलें होतें. चितोड परत घेईपर्यंत सोन्यारुप्यांच्या ताटांऐवजीम पानापत्रावळीवर भोजन करावयाचें, आणि बिछान्यावर न झोंज्पतां गवताच्या शय्येवर झोंपावयाचें अशी प्रतापाची प्रतिज्ञा होती. एखाद्या तपस्व्याप्रमाणें राण्यानें आपली दाढीहि वाढविली होती.
प्रताप खरा योध्दा होता. त्याच्या शौर्याची वाहवा प्रत्यक्ष शत्रुहि करीत. “त्याचा स्वधर्म, स्वदेश व स्वकुल यासंबंधींचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी आणि प्रखर होता. अबकरांशीं युध्द करण्यांत दाखवलेलें शौर्य अलौकिक होतें. तो जसा वीर तसाच मोठा क्षमाशील, उदार अंत:करणाचा न नीतिपरायण होता. त्यानें अनेक वेळां युध्दप्रसंगीं सांपडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागविलें. त्याच्या मरणानंतर शत्रूंनींहि आंसवें गाळलीं.”
- ९ मे १५४०

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP