TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

सर्ग ९
विश्वतरुचें मूल बीज ज्या शिंपिति नवविधा भक्ती ।
धर्मनीतिच्या शाखा पसरुनि देवो सुजना मुक्ती ॥
भवभय दु:खाला । नाशुनि तारो जगताला ॥१॥

कोत्सा ! तुझ्या सांगण्यानें माझा बराच घोटाळा उडाला, कोणतीहि गोष्ट कथन करणें म्हणजे ती साद्यंत, सविस्तर असली पाहिजे; नपेक्षां, मध्येंच भाग तोडलेल्या ऋच्यांप्रमाणें अर्थाचा अनर्थ व्हावयाचा. काश्यप ! हेंच तें, वृ म्हणतांच सारें वृत्त लक्षांत यावें, यालाच तैलबुद्धि म्हणतात. काष्टबुद्धि, चर्मबुद्धि यांची व्याख्या जाणतोस ना ? कोत्सा ! तुझ्यासारखे तैलबुद्धि लक्षांत नव्हें कोट्यावधींतदेखील सांपडणे कठिण. पण, तैलापेक्षां, काष्टांचा, चर्माचा उपयोग जगांत होत असतो; तैलबुद्धिपेक्षां, काष्ट, चर्मबुद्धि नव्हे पाषाणबुद्धि यांची वृद्धि जगांत भारीच होत असते. बरें तर, काश्यप ! विचार, तुला पाहिजे तें विचार. कोत्सा ! त्वां सांगितलें, दधीचि मुनीच्या आश्रमांत, त्याच्या सारस्वत नामक पुत्राचा उपनयन, संस्कार आहे म्हणून; तेव्हां सहजच असा प्रश्न निघतों कीं, दधीचि हा कोठला ? कोण ? या प्रश्नाला उत्तर देण्यास बृहस्पतीचा चुलताच भेटलां पाहिजे. काश्यप ! सूर्य कोठें असतो. चंद्र म्हणतात तो कसा ? अशा प्रश्नाला कोण उत्तर देईल ! ज्याला सर्व जग ओळखत आहे, आपल्या पातंजल मुनीच्या तोंडांत ज्याचें नांव नित्यश: घोळत असतें, तो दधीचिमुनि कोठला कोण म्हणून विचारणें म्हणजे, सरस्वती नदी ही स्वर्गावर वहाते का पाताळांत असते, अशाच प्रकारचें आहे. कोत्सा ! तूं पडला नैय्यायिक आणि बोलणें अन्यायीक; सरस्वती नदीच्या तीरावर वास करणारा दधीचिमुनी, मला ऐकून माहित आहे; त्याचें अत्युत्तम गुरुकुल, त्याचें उग्र तपाचरण, त्याचें स्मरण पातंजल मुनि नित्यश: करित आहेत, तो जात्या हठयोगी, जवळ जवळ ऊर्ध्वरेता हेंहि मी ऐकलें आहे, त्यांच्याच पुत्राचा व्रतबंध का म्हणून विचारल्यास तूं मला पाषाणबुद्धि म्हणून हांसणार होता. माझ्या मतें दधीचि नांवाचा आणखी एखादा ऋषि असेल, आणि त्याचा सारस्वत नांवाचा पुत्र असेल, विशेषनामाला का समास पाहिजे ? काश्यप ! यांत तुला आश्चर्य असें काय दिसलें ? सरस्वती तीरावर वास करणारा दधीचिमुनि याचा पुत्र सारस्वत, याचा व्रतबंध उद्यां मीन लग्नावर, तेव्हां सर्वांस बरोबर घेऊन येण्यास पातंजलमुनीस आमंत्रण पत्रिका आली आहे, हें पहा त्यांचे पत्र. कोत्सा ! आमंत्रणपत्रिकेबद्धल का माझा प्रश्न आहे ? आणि आम्हां ब्राह्मणांस का आमंत्रण पाहिजे ? आम्हांस सर्वत्र मुक्तद्वार, ब्राह्मणांचे सहज दर्शन झाल्यास लोक वंदन करुन पावन होतात; ब्राह्मणाचे चरणांत सर्व तीर्थे वेंगाळून असतात, हे सर्व लोक मानतात, " सागरे सर्व तीर्थानि पदे विप्रस्य दक्षणे" हा शुद्ध शास्त्रार्थ. मला काय, मीन लग्न,मेष मास, सिंहराशी, अश्विनि नक्षत्र, समजण्याचें कारण आहे ? व्यतिपात योग असो वा तिथि क्षय असो; त्या दधीचि मुनीचा पुत्र आणि त्याचा व्रतबंध हें ऐकून जरा आश्चर्य वाटलें. कश्यप ! कसचें आश्चर्य दधीचि मुनीला का पुत्र होऊंच नये, आणि त्याला काय सारस्वत हें नांव असूंच नये, काय तरी आश्चर्य ? कोत्स ! आश्चर्य नाहीं, ब्रह्मचर्यासंबंधी प्रश्न आहे, उद्यां कपिल महामुनीच्या पौत्राचें उपनयन आणि गार्गेयीच्या कन्येचें लग्न म्हणून आमंत्रण आल्यास आमचे नियंत्रण लागणारच. "ब्राह्मणो भोजन प्रिय: याला नियंत्रण कोठेंच नाहीं. पण एक सांग, दधीचि मुनीच्या विवाहास आम्हांस नेल्यास, पातंजल मुनीस काय, मोठेच सायास पडणार होते ? दुसर्‍याची थट्टा केल्यास आपल्या विद्वत्तेस बट्टा लागत नाहीं ? काश्यप ! मी, थट्टा करणार्‍यांचा कट्टा शत्रू आहें. दधीचि मुनीला सरस्वती नदीपासून पुत्र झाला, हें वृत्त तुला माहित नाहीं म्हणून मी मानीत नव्हतों. कोत्स ! दधीचि मुनीला सरस्वती नदी ही, त्या मुनीची धर्मपत्नि का पण्यांगना ? नदीला तसा कांही प्रतिबंध नाहीं असा शास्त्रसिद्धांत आहे; ब्राह्मण, शूद्र, अतिशूद्र यानी कोणीहि स्नान केलें तरी, नदीहि पावन आणि तेहि परमपावन. आणि एक सांग, सरस्वती, गरोदर कधीं झाली ? गर्भवतीस स्पर्श करूं नये असा शास्त्रार्थ, तर तिच्या तीरावर राहणार्‍या ऋषींनीं स्नानपान कोठें केलें ? एकावर एक प्रश्न वाढणार आणि उत्तरे देण्यास आपण चिडणार. लग्नहोमानंतर गर्भाधान होम झालाच पाहिजे. काश्यप ! सरस्वती गर्भवती झाली म्हणणार्‍यांची मति, अतिशयच मंदगति म्हटली पाहिजे. कोत्स ! पवनगतीचे मतिमंत विद्वान असें प्रतिपादन करतात कीं, सृष्टिजीवनाचा नियम, यमधर्माच्यानेंहि उल्लंघन करवत नाहीं, तर सरस्वती गर्भवती झाल्यावांचून पुत्रवती झाल्याची उपपत्ति कशी लागेल. काश्यप आपण वेदपाठांतच थाटत आहों. पुराणग्रंथांवर नजर फेंकल्यास या गोष्टीचा सारांश काढण्यास थोडाच आयास पडणार होता. कोत्स ! पुराणग्रंथांची थोडीशी माहिती मला आहे; समुद्रांतून लक्ष्मीचें आणि पर्वतापासून पार्वतीचें जनन झालें, हें कथन करण्यास नको आहे, पण अमक्या ऋषीपासून हें नेमक्या शब्दांनीं सांगणें हें जरा आश्चर्यवाणें दिसतें खरें. काश्यप ! दधीचि ऋषीचें वीर्य सरस्वती नदींत पतन पावले आणि त्यापासून सारस्वत नामक पुत्राचें जनन झालें, यांत मोठेंसें मनन करण्यासारखें कांहीच नाहीं. हं ! अगदी मनन करण्यासारखें कांहीच नाहीं. केवळ वीर्यपतनापासून पुत्रजनन होतें, येथें निसर्गदेवतेंचे अध:पतन होतें, हें मात्र निजध्यासन करण्यासारखें आहे. महादेव शंकराचे नंदन त्याच्या वदनांपेक्षां नव्हे त्याच्या नयनांपेक्षां अधिकच झाले असतील तर, मानवांची कल्पनासृष्टि, परमेष्टीच्या अदृष्टीं नाहीं, असें म्हणतात, हें दृष्टीभूत आहे. काश्यप ! मी अनृत भाषण कधींच करणार नाहीं. कोत्स ! अनृत आणि असंगत, असें भाषण करण्याचें नव्हे म्हणण्याचेंहि कारण नाहीं. सृष्टीचा नियमभंग, आणि निसर्गाचा अधोरंग यांत व्यंग तर अगदींच नाहीं. काश्यप ! सृष्टिनियमाविरुद्ध गोष्टींचा, पुराणांत पुरावा आहे. कोत्स ! सृष्टिनियमाविरुद्ध गोष्टींचा, पुराणांत पुरावा आहे. कोत्स ! पुराणांत पुरावे आणि आकाशांत देखावे, जितके पहावे तितके मिळतील. पुंकेसर आणि स्त्रीकेंसर यांचें संमेलन झाल्यावांचून फळपुष्पांचेंहि जनन होत नसतें असें म्हणतात. काश्यप ! ब्राह्मणांनीं पुराणग्रंथांवर अविश्वास ठेवल्यास विश्वाचे श्वासोच्छवासच बंद पडतील. अमोघ विर्याचे प्रभाव आश्चर्यभावच असतात. नासिकेत ऋषीचा जन्मवृत्तांत आपल्या लक्षांत नाहीं असें म्हटल्यास आपल्या डोळ्यांस लाली येणार. कोत्स ! नासिकेत ऋषीची साधारण माहिती मला आहे, त्याचा यमलोकाचा प्रवास सर्वांस ठाऊक आहे; परंतु या गोष्टींत त्याचा संबंध लावणें असंबद्धच होणार. नासिकेत ऋषीची जननी, मानवपत्नीच होती. ती गर्भवती झाली मग प्रसूति झाली, सृष्टिनियमाची च्युति यांत दिसली नाहीं. अंतर इतकेंच, एका ऋषीचें वीर्य पुष्पसुवासासरसें तिच्या नाकांत शिरलें, गर्भाशयांत त्याचा प्रवेश झाला. आतां .... काश्यप ! तुझें म्हणणें बरोबर आहे. कोत्स ! तुझेंहि सांगणें खरोखर आहे. आतां येथें सत्यसरोवर निर्माण झालें पाहिजे. बरें तें असो. आपल्या त्या सरस्वतीच्या पुत्रोत्पत्तीची सरळ व्युत्पत्ति लावून सांग पाहूं ! बरें तर. काश्यप ! सत्य साद्यन्त सांगतों. सरस्वती नदीच्या तीरावर, उग्र तपोनिधि दधीचि मुनी ....
कोत्स ! पुन: पुन: एकच. दधीचि मुनि म्हटला कीं समजलें, स्वर्गावर वास करणारा इंद्र आणि त्याची पत्नी शची असें सांगणें म्हणजे आपलें वक्तृत्व दाखवणें असेंच आहे. काश्यप ! कोणतेंहि वृत्त कथन करण्यास आरंभापासूनच निवेदन करावें लागतें. साद्यंत, सविस्तर वृत्तांत, चित्तांत सारखा भरला पाहिजे कीं नाहीं ? हो, बरें तर, कोत्स ! साद्यंत, सविस्तर, सुसंगत कथन कर. काश्यप ! सुसंगत म्हणजे ? माझ्या सांगण्यांत विसंगतपणा असणार नाहीं. चालूं दे तर, कोत्स ! सरस्वती तीरावर दधीचि मुनि. मग पुढें .... काश्यप ! त्या दधीचि मुनीच्या उग्र तपोतेजानें इंद्राचें सिंहासन डळमळूं लागलें .... कोत्स ! शाबास, उग्र तपाचें तेज स्वर्गावर उसळलें, भारी सरस; म्हणजे ग्रहमंडळ भेदून, सूर्यमंडळ ओलांडून वरतीं गेलें, बरें पुढें .... वक्त्याच्या सांगण्यावर विश्वास न धरणारा श्रोता, पातकांचा भोक्ताच म्हणावा लागतो. काश्यप ! मग देवेंद्रानें ... हं, हं, आलें लक्षांत, महेद्राने, त्याचा तपोभंग करण्यास, मेनका अप्सरा .... काश्यप ! उतावळेपणा शहाणपणाला दूषणास्पद आहे; मग त्यानें अलंबुषेला भूलोकावर पाठवली .... कोत्स ! नवीनच नटी आली तर रंगभूमीवर, नवनवलांत, नयनोत्साह असतोच; मेनका, उर्वशी झाल्या वाटतें वृद्धानारी पतिव्रता. बरें चालूं दे, महेंद्राचे सिंहासन डळमळूं लागलें म्हणजे इंद्रपद हालूं लागलें; पुढें चालूं दे ... अप्सरांचे नृत्य बंद उरलें ना ? काश्यप ! श्रेष्ठांचें गुणवर्णन कनिष्टांनीं करावें हा स्पष्ट शास्त्रार्थ आहे. हो, हो, कोत्स ! श्रेष्ठ, असेंच ना ? बरें, चालूं दे पुढें. काश्यप ! श्रेष्ठांचें गुणवर्णन कनिष्ठांनीं करावें हा स्पष्ट शास्त्रार्थ आहे. हो, हो, कोत्स ! श्रेष्ठ शब्दाचा विग्रह कसा लावतात ? श्री म्हणजे लक्ष्मी, हिचे इष्ट, ते श्रेष्ठ, असेंच ना ? बरें, चालूं दे पुढें. काश्यप ! मग त्या अलंबुषेच्या स्वरुप लावण्यास भुलून .... काय, कोत्स ! दधीचि मुनीनें पाणिग्रहण केलें ? गंधर्व विधीनें का ब्राह्मविधीनें ? पण यांत सरस्वतीचा काय संबंध ? काश्यप ! श्रोता सावधान नसला म्हणजे वक्त्याचें अवधान चुकत असतें; मग सांगण्यांत समाधान तरी उरतें कसें ? स्वस्थ ऐक. त्या अलंबुषेचें रुपलावण्य पाहून दधीचि मुनीचें वीर्य, सरस्वती नदींत पतन पावलें. आणि त्यापासून सारस्वत नामक पुत्राचा प्रसव झाला. कोत्स ! भारी सरस. अलंबुषेच्या रुपयौवनास पाहून दधीचि मुनीचें वीर्यपतन, आणि सरस्वती नदींत पुत्राचें जनन, हें कथन तर सुज्ञ लोकांचें मनरंजनच करील; पण एक सांग, आपली ती अलंबुषा, आणि सरस्वती नदी यांचा संबंध कोठें ? काश्यप! अलंबुषा अप्सरा सरस्वती नदींत जलक्रीडा करतांना दधीची मुनीच्या दृष्टीस पडल्या. कोत्स ! आतां मात्र जुळलें खरें. सरस्वती नदींत पुत्र जन्मास आला म्हणून सारस्वत नाम पावला; बरें, एक सांग, मोहिनी देवीस पाहून महादेव शंकराचें वीर्यपतन झालें, अशी कथा आहे ना, मग त्याचे पुत्र का कन्या निपजल्या ? तसें नाही असणार, त्याचें वीर्य पृथ्वीवर पतन पावलें, तें जर भागीरथींत पडलें असतें तर भागीरथ नांवाच पुत्र जन्मास आले असते. जल वीर्य संमीलन यांत गर्भोत्पादन शक्तीचें चालन असतें. मनुष्याच्या रक्तांतहि जलतत्वच असतें, यांत निसर्गाचा वादविवाद बंद झाला .... मग पुढें. काश्यप जरा स्वस्थ ऐक. मग सरस्वतीनें त्या पुत्रास आणून दधीचि मुनीस भेटवला .... हं, हं, कोत्स ! अलंबुषेच्या अंगसंगापासून मुनीचा तपोभंग, यांत कांहींच व्यंग नाहीं, केवळ वीर्यपतनापासून नदींत पुत्राचें जनन, हेंहि मनन करण्याचेंच, आणि त्यावर प्रत्यक्ष सरस्वतीचें दर्शन, मग .....
बरें एक सांग, ती सरस्वती मनुष्यरुपानें आली ती मयुरावर बसून आली, का भरजरी पीतांबर नेसून आली; काय सारखें तरी लावून सांग; सुज्ञाचें सांगणें, अज्ञ लोकांचें ऐकणें, यांत आश्चर्य मानणें, मूर्खांत गणणें, आणखी काय ?  काश्यप ! इतका वाद कशाला, सर्वांत चक्षूर्वै सत्यं असें आहे कीं नाहीं, प्रत्यक्ष गोष्टीला प्रमाणाची गरज नाहीं, उद्यां त्या पुत्राचा उपनयन संस्कार, सर्व ऋषींचा सत्कार होणार आहे, आम्ही तो चमत्कार पाहूं, यांत वादविस्तार तो कशांकरतां कोत्स ! भारीच चमत्कार, पण हें वृत्त तुला कसें कळलें ? काश्यप ! प्रसिद्ध गोष्टी, सृष्टीवर सहजच प्रगट होतात. सारस्वतीचें मस्तक, दधीची मुनीनीं अवघ्राण केलें तेव्हां गगनांतून पुष्पवृष्टि झाली, स्वर्गावर दुंदुभी वाजूं लागल्या, या गोष्टी सर्वश्रुत आहेत, यांत अद्भुत असें कांहीच नाहीं. कोत्स ! सर्वश्रुत गोष्टींत अद्भुत, असंगत असें कांहींच असत नसतें; केवळ वीर्यपतनापासून नदींत पुत्राची उत्पत्ति, सरस्वती मनुष्य रुपवती, या कीर्ति दुंदुभी स्वर्गावर वाजतीलच, निसर्गदेवी मात्र अधोगति पावणार, इतकेंच. काश्यप ! निसर्गाच्या नियमाविरुद्ध घडलेल्या कथा आपल्या श्रवणपथांत गेल्या नसतील. इंद्राचें आणि सूर्याचें वीर्य एका वानरीच्या मस्तकावर पडल्याने वाली आणि सुग्रीव नावांचे बलाढ्य वानर जन्मास आले. या गोष्टीस थोडेच तप गेले आहेत.   

कोत्स ! थोडेंच तप नाहींत. तपस्वी ऋषींनी जप करतांना या गोष्टी लक्षांत आणल्या पाहिजेत, पुराणांवर विश्वास न ठेवल्यास विश्वच विराम पावेल हे खरें. सागर मनुष्यरुपानें येऊन भार्गवरामास आश्रमास स्थान देतो; पृथ्वी गाईच्या रुपानें स्वर्गावर गमन करते, हिमालय पर्वताचा पुत्र, मैनाक धनुष्य घेऊन रणांगण नाचवतो, पण नदी मात्र पुत्रवती झाल्याची किर्ति श्रुतींत आली नव्हती. पुराणें ! पुराणे ! काश्यप पुराणग्रंथांवर मात्र आपला कटाक्ष, वेदग्रंथांत सारें निसग नियमबद्ध ? पृथ्वी, उषा, या देवता, सूर्यनारायणाबरोबर सोमरसाच्या मेजवानींत भाग घेतात. हें सुसंबद्ध-स्त्रियांची मर्यादा, वेदांनी बरीच रक्षण केली आहे -

" दिव्या पृथिव्या: उपसा सूर्येणच सोमं पिबंतम । " - ऋ.मं. ८-३५.

कोत्स ! वेदग्रंथांतील काव्यवाड्गमयाचा अर्थ, आपल्यासारखे ज्ञानी पुरुष असाच करतात ना ? काव्यग्रंथ आणि इतिहासग्रंथ यांचे ग्रंथ निराळेच असतात. काय निसर्ग ! काय स्वर्ग ! आणि काय परमेश्वर ! काश्यप ! आतां वादविवाद कशाला, हे पहा आपले सहाध्यायी येऊं लागले. पण काश्यप, निसर्ग हाच परमेश्वर हें मात्र पूर्ण लक्षांत ठेव हो ! बरें तर -

साकी

शान्त किरण तम हरण तप न हा उतरे सागर जिवनीं ।
उग्र तपा तापुनी जाहली, श्रमिता, शुचिता अवनी ॥
आतां चल जाऊं । मुनीचें सुत कौतुक पाहूं ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-23T08:58:47.8070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

pseudoallele

  • पु. Gen.(one of two or more closely linked genes that appear to act as a single member of an allelic pair) आभासी युग्मविकल्पी 
RANDOM WORD

Did you know?

चातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.