उत्तर खंड - शीष्यप्रबोधो

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


शुध्दोस्मि च भगवान्मुक्तो नेदं ब्रह्मेतिवेदम्यहं ।
परमत्मकं विश्वं ज्ञातयत्तदिदंस श्रृणु ॥१॥
एवं सर्व ही निर्धारु । बोलिला श्रीसत‍ गुरु । हा येवढा ग्रंथु सागरु । उलाठीला ॥१॥
जेथील तेथें असावें । उपाधि आटलि स्वभावें । हें आत्मपदवी दैवें । देहा आलीं ॥२॥
मोडलें अधर्माचें घाट । पानथळि स्वधर्माचि वाट । तेथ रगडलें षराटें । संशयाचें ॥३॥
अहंभावादि चोरटे । जालिं याचिं तळपटें । काम क्रोधादि सागें येवाटें । निपातले ॥४॥
मधुमीक्षयाचि दाटी । यां स्वपदाचि जालि आटि । अज्ञानें उपांटी । धरिलि तेथें ॥५॥
वासनाशिळेचा घाटु । तोडुनि केला सपाटु । संसारसरितेचा पाटु । शोखोनि गेला तो ॥६॥
मुगी मार्गाचां लांबिठा । जाला घोळनिचा पाठा । तेथ कोन्हिहि अव्हाटा । जाउ नेणें ॥७॥
याचें अंगीं आत्मकुंठ । झडले त्वंपदाचें पुठ । जोडली ब्रह्मपेठ । एकदेशी ॥८॥
तेथ स्वयंता व्यापारु । परि नुकळे कर्माचारु । कां जे घॆतां देतां ईश्वरु । स्वयमात्मा तो ॥९॥
असी हे येवढी दशा । शिष्या जोडली सह्सा । तर्‍हिं प्रकाशे या चि आरसा । गुरुगौरव तो ॥१०॥
हे संत जीव सदनांथी । असुंनि वत्तनें स्वयं पंथी । तर्‍हिं गुरुगौरवो आथी । अतिमानें ॥११॥
त्वपद तत्पदें भेदु । ग्रासुनि उरे सदानंदु । तेथ गुरु शिष्या अनुवादु । कोण करि ॥१२।
आधि वेचावें गुरुपण । पाठिं शीष्या निरुपण । हे सभावता लक्षण । ब्रह्मनिष्ठाचें ॥१३॥
शीष्यु गुरुर्त्वेसी वेचला । तो मज कैसा गमला । जैसा येकें येकु भाजीला । दोघाम नुरि ॥१४॥
कीं शरीरेंसी कालज्वरु । किं अनिळेंसी कापुरु । तेवी शीष्येंसीं श्रीगुरु । अनुग्रहिं नुरे ॥१५॥
हे ना घृतेंसी आहुति । जैसी हारपे हुती । तैसें गुरु शीष्य अमूर्ति । लीन जाले ॥१६॥
नाहि उपदेशुं तंवरी । गुरुशीष्यु हे कुसरी । भेटी जालीयां उरी । कैचीं दोघां ॥१७॥
परी संतशीष्याचा भावो । केवी जाईल गुरु गौरवो । कां जें सर्वेपरी देवों । गुरु ची शीष्या ॥१८॥
हा विचारु घालुनि पुढां । शीष्यु उठे लवडसवडां । सवें चि शंकेंचें कडा । चाचंरु पाहे ॥१९॥
नमस्कारुं करुं यावरी । तै हा ह्मणैल धरीली उरी । जरी मीं नमस्कारु न करी । तरी प्रेम न धरे॥२०॥
सर्वासी हें चि कारण । याचें ठेउ शीरीं चरण । हा रुसील तर्‍हिं ध्यान । न संडु याचें ॥२१॥
अधम दुष्ट कपट चांडाळ । ते घेउन त्या शब्दाचें बळ । पाठीं वंचले समूळ । श्रीगुरुनाथा ॥२२॥
तैसा मी अधम शीष्यु नोहे । जे गुरुभक्ति वंचला राहे । धर्मु चालनें तैं याहुनि कोण आहे । उत्कृष्ट धर्मु ॥२३।
तर्‍हि हा मायावि दुसरा । तर्‍हिं निगों नमस्कारा । तवं उदैला शरीरा । सात्विकभावो ॥२४॥
सन्मुख राहोनि लल्हाटिं । निहित उभयें पानिपुटी । शिघ्र चाल उठी बैठी । हा चि तयां ॥२५॥
नमस्कारु करी सांष्टांगें । प्रेमप्रदक्षणा भ्रमतु वेगें । स्तुति करीतु सर्वागें । स्फूरण दीसे ॥२६॥
जयाची श्रीगुरुराजा । अवतरलासी अनाथकाजा । तुझेया प्रकाशतेजा । निवळलें आह्मां ॥२७॥
अनादि वस्तुचां पोटीं । जाली प्रपंचाची दाटी । अविद्या मार्जली दीठी । प्रत्यक्ष देखों ॥२८॥
जाला तुझा प्रसादु । जीवदशा नेला भेदु । देखो सर्व सचिदानंदु । येक आत्मा ॥२९॥
आनंदपूर्ण सगुणा । दिशाभसलक्षण । सदसुसंत निर्गुण । अभेदु आत्मा ॥३०॥
सर्व कर्त्तव्याविहिनु । देहिचा होउनि विलक्षणु । माया गुणातीत ह्मणौनु । निर्गुण होये ॥३१॥
सवे चि प्राणाचे परी । थीरु नव्हे शरीरीं । भासु दावी यापरी । साभासु होये ॥३२॥
समस्त अवणवें नटतु । देहविकारे वर्त्ततु । जेथील तेथें धरी हेतु । तो सगुण होये ॥३३॥
पाहतां पाहीजे तैसा । हा आत्मा चि हा भर्वसा । असा माझेया मानासा । दृढावो जाला ॥३४॥
असा गुणागुणेंसी पूर्णु । पूर्वारुप पुराणु । तरि जि पाहातां आनु । प्रपंचु नव्हे ॥३५॥
येक ह्मणें प्रपंचु नित्यु । दुजा ह्मणे अनित्यु । हा भेदबुधी सत्यु । वादु होये ॥३६॥
प्रपंच नित्यु हा बोल । भेदवादकां सखोल । ज्याचा बोधु निर्वोल । आत्मविषईं ॥३७॥
आणि दुजा देखे असें । जे प्रपंचु प्रत्यक्ष नाशे । तेंथ नित्यपण कैसें । संपादैल ॥३८॥
असें दोन्हि वाद स्थळि । परस्परें घेतली फळी । एथ विचंबली नवाली । आत्मसुखाची ॥३९॥
तरी जी देवा सद्रुरु । जो शंकरसंप्रदाई नरु । तो उभये विचारु । येकु देखे ॥४०॥
आत्मा गोठला प्रपंचु । येणें नित्यु साचु । आकाराचा दीसे वेचु । अनित्यु असा ॥४१॥
हा ब्रह्मभासु असत्यु । यास्तव नित्यानित्यु । ब्रह्म मुरालें तरी सत्यु । सर्व प्रकारें ॥४२॥
प्रपंचें प्रपंच देखावा । प्रपंचें प्रपंच नेमावा । तैं भेदासि विसावा । नव्हे कैसा ॥४३॥
आत्मेनि आत्मा देखीजे । आत्मेनि आत्मा नेमिजें । तै या भेदाची बीजें । बोलजती ॥४४॥
जी जो प्रापंचिकु प्राणि । तो या प्रपंचातें माणि । निर्धारे त्याचा वचनि । प्रपंचु साचु ॥४५॥
आत्मिष्टु आत्मा चि जाणें । तो बैसें तेणें चि प्रमाणें । निर्धारे आत्मनिष्टाचें वचनें । आत्मा सर्व ॥४६॥
जेवि प्रकाशे प्रकाशा देखीजे । कां अंधे आंधारां बुडिजे । येथ दृष्टांतु आनिजे । समर्थु येकु ॥४७॥
पूर्णप्रकाश तरणी । प्रकाशतां नयेनी । मुख्य प्रकाशावाचुनी । अंधनेत्र ॥४८॥
तैसा चि अंधाचा बिढारी । सहस्रकरुहि प्रकाशु न करी । मिं बोलिलों तयापरी । सत्यवचन ॥४९॥
जें ज्यां देहिं संचरे । ते चि त्याचि उतरें । भूत संचारे घुमारे । बोले तैसें ॥५०॥
हे माया चि दुसरी नोहे । तरी जीवदशा कोठें आहे । एवं विश्वही ब्रह्म लाहे । ब्रह्मदृष्टा तो ॥५१॥
पाहा यां सर्व ब्रह्म निर्धारें । नाहि गोठलें प्रपंचाकारें । येथ पाहातां विचारें । स्मरलें येक ॥५२॥
जो जळाचा मेळु । तो तरंगभयें सकळु । परि जेथ खळाळु तेथ रोळु । तरंगाचा ॥५३॥
कीं ना जो जीतुका मेरु । तो अळंकाराचा थावरु । परी जो सृष्टी व्यापारु । तें चि प्रमाण ॥५४॥
तैसा चि जेवढा जळधरु । तेवढा जळाचा मद्रुरु । पण जो वरुशे धाराधरु । ते चि तो ये ॥५५॥
हो कां जितुकी मृत्तिका । तितुकीही रेणु कणिका । परी नभी संचरे ते टीका । रेणुची होणे ॥५६॥
अथवा जो मलयानिलु । तो चि प्राणाचा मेलु । जो देहि स्वासो उस्वासें परि बलु । तो चि प्राणु ॥५७॥
तैसा जो अहंता आटोपु । तो चि जाला जगद्रुपु । येरु निर्गुण अमुपु । जैसा तैसा ॥५८॥
जितुका अंबुनिधी जळितु । तितुका उठे आवर्तु । कां गोवे तो चि प्रवर्तु लवणाचा होये ॥५९॥
तेवि ते अहंताविकारें । कांहिं गोठलें जीवाकारें । हे मज कळलें निर्धारें । ब्रह्मिचे जीव ॥६०॥
सव्यासव्यें परापर । जीव ब्रह्मि चि निरंतर । कालत्रईहि बाहिर । न मनावे हे ॥६१॥
लवण सिंधुचा भांडारीं । पडलें नुरे स्वादाकारीं । तेवि वेचलेहि बाहिरी । न येती जीव ॥६२॥
नभाभीन्न वाता जैसें । कोठें कांहि ठावो नसे । ईश्वरीं मानावें तैसें । चराचर ॥६३॥
अहंताविकार तदलक्षण । मायाप्रपंच नव्हे आन । तै अविद्याभूतें जीव भिन्न । केवि होति ॥६४॥
आत्मा जाणिजे भूतिं । तैं भेदाचि जालि शांतिं । नेणतां तर्‍हिं नव्हती । तया वेगळें ॥६५॥
हेमासी लेणें नेणें । तर्‍हिं तें असे सुवर्णं । का हुतु नेणतां हुताशनें । आथीले दीप ॥६६॥
सुत नेणतां कापडीं । आहे सुताची मोडी । कीं मृत्तिका नेणतां भांडीं । दुजी नव्हती ॥६७।
तरंग नेणति जळ। तर्‍हिं तें जळेंसी सकळ । तरुसी नेणतांहि फळ । तरुचें असे ॥६८॥
कणिका नेणति तुप । तर्‍हिं त्या आहेति तद्रुप । क्षारु जर्‍हिं नेणे आप । तर्‍हिं ते चि गोठलें ॥६९॥
ऐसें हि देखोनि आपुली बुधी । असुं देणें आत्मसीधी । जें तिचें आधारें आत्मविधी । वोढोनि घेणें ॥७०॥
ते चि बुधी अविद्यासंगे । माजलि घेइल वावुगें । तैं आसुषसंयोगें । चुकि चि पडे ॥७१॥
जेवी येका अज्ञी पासाव । धुमु ज्वाळ दोनि भाव । तेवी येक चि देहि व्दिभाव । विचार उठति ॥७२॥
धुमाकार बुधी ऐसी । ते नचळे आत्मप्रकाशी । दावि आंधारी जैसी । प्रजन्यकाळीची ॥७३॥
धुमु आछादि पावका । तो स्वमूळाहि नव्हे निका । मां नेत्र झांपि सकळैका । नवल काये ॥७४॥
ते चि हुताशी दिप्ति कळा । उजेडा आणि स्वमूळा । मां प्रकाशु करी सकळा । नवल काई ॥७५॥
आणिक भारथी ऐसा निर्धारु । जें धूम मार्गु माहाघोरु । दिप्तमार्गु उदोत्कारु । नेमु ऐसा ॥७६॥
कृष्णपक्षु दक्षणायेण । जळवृष्टि रात्रिं मरण । हा धूममार्ग येमभुवन । प्राप्त करी ॥७७॥
आतां शुक्लपक्षु उत्तरायेणी अहनि। मृत्य होये स्वस्थानि । हा अर्चिमार्गु देवभुवनि । वास्तव्य करवी ॥७८॥
हो जी स्वामि श्रीगुरुनाथा । या दोंहि मार्गाची कथा । हे ब्रह्मनिष्ठां वेथां । कायी लागे ॥७९॥
तो भलता अहनि मरो । कोण्हीं जाळों कां पुरो । क्रिया आचरो नाचरो । कोण्हि त्याची ॥८०॥
उर्धगती कां अधोपतन । हे त्या नाहि भर्वसेन । तर्‍हिं कर्माचें संरक्षण । करणें चि तया ॥८१॥
जेवि चुकलवे दग्धांबरा । कां दग्धबीजें न येति अंकुरा । तेचि देहांति ज्ञातारा । उरी नसे ॥८२॥
प्रयंका पलव फुटते । अंगार इंधणें जन्मतें । तै प्रबुध पावतें । पुनर्देहातें ॥८३॥
गत्या अवगति कांहीं । हा भोगु कर्मदेहिं । तरि तो पूर्विची होमु एहिं । प्रबुधी केला ॥८४॥
असो हें प्रमाणें तिनी । नेमली जीवाचे स्थानी । पावन मिळनी आणि । स्वभावता ॥८५॥
जीव ब्रह्मीं साचार । ब्रह्म जीवा सबाह्यभ्यंतर । पावन मिळनी उत्तर । नेमे येथें ॥८६॥
व्यापकीं पावन सत्य । मिळनी वस्तु नित्य । येथ ठेउ निमित्ये । दृष्टांतावरी ॥८७॥
घटाचें गगनी पावन । घटा व्यापक गगन । परि तें उभयता भिन्न । ऐक्य नव्हे ॥८८॥
कां जळिं पावन सीळा । तेथें व्यापकदशा जळा । तो पाषाण करितां वेगळा । कोरडाची ॥८९॥
असें येकयेकासि भिन्न । ते हें व्यापकिं पावन । यस्तव जीवां प्रमाण । क्रिया कर्म ॥९०॥
दानदमन क्रिये कर्म । एथ सत्य धर्माधर्म । फल कल्पावें हें वर्म । पावन पक्षि ॥९१॥
जे जीवाची मिळणी । तें दृष्टांतें देउं धरुणि । जेथ जीवा नित्यस्थानी । नेमली वस्तु ॥९२॥
जैसें गोठलें लवण । जळापासाव दीसे भीन्न । ते श्रृष्टी वर्त्ततां हि जळावांचुन । न मिळे कोठें ॥९३॥
नसुधे मीठ पाहातां । कोठें नसे सलोळता । जळा लवणा भिन्नता । इतुकी आहे ॥९४॥
परि जालेयां दोहिंचि मिळणी । मिठ नुरे दुजेपणि । तेवि ब्रह्मविद ब्रह्मस्थानी । मिळती जीव ॥९५॥
यास्तव ज्ञानाध्यान साधन । याचे मिळणपक्षि प्रमाण । कां जे ब्रह्मीं येकपण । मिळणी दीसे ॥९६॥
जो ब्रह्मीं चि सोये नसे । तो वेगळेंपण आगिं वसे । ब्रह्मप्राप्ति समरसे । ब्रह्मी जीउ ॥९७॥
आतां जीउ ब्रह्मीचे नित्य । ब्रह्म जीवां सत्य । ए उभय नित्यासी नित्य । एक घडॆ ॥९८॥
ब्रह्म नित्य ठांईचें । जीव विकार तेथीचे । कारण कार्ये कारणाचें । स्वयें सीध ॥९९॥
जळीं तरंगाचा वासु । तरंगा जळ चि पैसु । जळ होणें हा हव्यासु । तरंगा कासा ॥१००॥
कां तुपाची कणिका । तुपां चि मध्यें सर्पिका । मां तुप जोडे ते असा कां । स्मरु धरील ॥१॥
कां पावकाचा दीवा । तो पावकिं चि जाणावा । पावकु जोडो हा हेवा । तया कासा ॥२॥
कीं सुताचा उभारा । रुप जाणें अंबरा । मा सुत जोडों येवो थारा । सीणें कां ते ॥३॥
कीं सूर्याची प्रभा । सूर्यबिंबिचि शोभा । सूर्यभेटिच्या लोभा । धावे कां तें ॥४॥
कीं नादु चि एकधा । बोल आले भेदा । तेहीं गीवसावें नादा । असें कैचें ॥५॥
ब्रह्मजातु जीउ तैसा । ब्रह्मभेटीच्या हव्यासा । धावे तैसा पिसा । हा चि जाला ॥६॥
हे प्रपंचभाव अनेक । निर्धारीतां ब्रह्म येक । जीवमात्र सम्यक । स्वरुपेंसी ॥७॥
हे जीव ब्रह्म चि सकळ । येथ ज्ञानज्ञान किडाळ । यापर केवळ । निर्धारां आले ॥८॥
ज्ञान विज्ञान दिवे । प्रकाशुनि ब्रह्म घ्यावें । पाठिं बोध करिं धरावें । नलगे यासी ॥९॥
कर्म अकर्म ये दोन्हिं । माल्हवलि ये चि स्थानि । यास्तव मिं परतोनी । बोलिलों येथें ॥१०॥
ते माझे बोल सर्वथा । भले दुषीले अनाथनाथा । हें कळले हरलि वेथा । संशयाचि ॥११॥
तरि जी सृष्टि रचिली जेणें । तो सानु कोण ह्मणें । त्याची आज्ञा टाळणें । अधर्मु हा चि ॥१२॥
जेवीं राये सेवकां । व्यापारी नेमिली टीका । ते टाकुनि आणिका । न करावें तेहीं ॥१३॥
जें जें ज्यासी नेमिलें । तें तें चि त्यासी भलें । जे कां समर्थाचें बोले । चुकों नये ॥१४॥
आतां विधिमार्गें वेधु । विशेधु ते निरोधु । तथापि ब्रह्मबोधु । मुदल ते राखु ॥१५॥
जी स्वाचार वर्णभाग । विहित कर्म तेहि चांग । जेणें संतोषे जग । ते चि भले ॥१६॥
लोकीं अभिमान जेणे बोले । तें जें भलें निरसीलें । आजी तुह्मी मज केलें । आपणां असें ॥१७॥
तुमचे ज्ञानें मि ज्ञाता । येथें दृष्टांत देखिला आतां । जेवि दीपें दीपु लावितां । दीपु चि होये ॥१८॥
असें दीप बहुवस । परि तितुकें ही उष्ण सतेज प्रकाश । तेवि गुरुज्ञानें सर्वश । गुरुदशे येति ॥१९॥
गुरुवस्तु साक्षांतु । ये चि दशे शिष्य येतु । गुरु बोळिचि हे मातु । पारंपरिया ॥२०॥
परि विशेषु तुमचां ठाईं । ज्ञान उठे जें तें अस्माई । आतां सामान्य कोणें काई । ह्मणावें तुम्हां ॥२१॥
मति वरि मति उठि । बोलु निघे बोलापाठी । बुधी बुधीते दाटी । उपरु दावि ॥२२॥
तर्कासी तर्क सैंभ । उठति बोधा बोध कोंभ । ज्ञानासी ज्ञानस्तंभ । नेटें येति ॥२३॥
परमार्थु परमार्थावरी । लोळतु निगे बाहिरी । विचारुं विचारा सरी । आंग घालि ॥२४॥
जैसा रंभेचा उदरी । उदर पत्राच्या भरोभरी । किं कदंब पुष्पाभीतरी । पुष्पें दाटति ॥२५॥
किं कडयाच्या वळवंटी । नादु नादातें दाटीं । किं धाराधरांचा पोटी । धारेवरी धारा ॥२६॥
कीं ये कीर्णे कीर्णावरी । दाटली उठती भास्करी । किं लहरीये आंगी लहरी । समुद्रीं जैसी ॥२७॥
किं मारुताचेंनि नेटें । उर्मिवरि उर्मि दाटॆ । कीं ज्वाळीं ज्वाळ प्रगटे । खवळला हुतिं ॥२८॥
तेवि विशेखा भरणि । परि तुं नव्हेसी अभिमानी । कोण्हा न कळे आझुनि । कोण्हि दशा ॥२९॥
जाणपणाचें डोंगर । डोइए घेउनि नाचति नर । त्यासी पुजिती इतर । देवाचेयापरी ॥१३०॥
उपाधी रत्नाच्या शीळा । आंगी वाहुनी आगळा । तो या जनाचिया डोळां । दुलभु वाटॆ ॥३१॥
जन अभोळ बापुडें । चळे चाळविजे तिकडे । प्रबुधासी कोन्हींकडे । फाकुं नेंदी ॥३२॥
देवाजी मज येक स्फूरलें । जें ब्रह्मज्ञ ब्रह्मी संचलें । ते न वचती वोळखीलें । कोण्ही कैसें ॥३३॥
जो शुधवटु ब्रह्मज्ञानी । तो या प्रपंचातें न मनी । माया डंबाचें आसनि । बैसेल कैसा ॥३४॥
यास्तव आत्मसिंधु । कोण्हा न कळे ब्रह्मविदु । तो आश्चर्य आनंदकंदु । कळैल काये ॥३५॥
कुब्ज पिनु क्षतु भग्नु । असता उपाधीसा सलग्नु । तरि तो कळता ब्रह्मज्ञु । हा चि नेमला ॥३६॥
कृष्ण पीत श्वेत श्यामु । तांब्र गौर वर्णाचा नेमु । असा असता गो उत्तमु । कळों येता तो ॥३७॥
तापसी साधनी कर्मकर्त्त । ते चि ब्रह्मीष्ट हे नेमते । तरी वोळखोनि धरिजते । निर्धारेंसी ॥३८॥
भगवा जटिळु लुचितु । नज्ञु मौन्यधारी मुंडीतु । चर्माबरी भस्मनाकिंतु । ज्ञातारु तो चि ॥३९॥
ग्राम जळ अरण्यावासी । गृहस्त आणि संन्यासी । ब्रह्मविदु हा एकासी । नेमु चि असे ॥१४०॥
तो आपण चि कृपा करी । तैं चि जाणवे निर्धारी । वाचौनि दुजा नेमे धरी । असा न द्खु ॥४१॥
तो तुं देवांदेवा चिदंशा । कोन्हा न कळे काइ कैसा । अज्ञानाचा घरी जैसा । परिसु पडॆ ॥४२॥
तेवी जवळी कां दुरी येया । कोणां न कळेसी देवराया । तैं संसारु दीनीया । उपावो नाहि ॥४३॥
तर्‍हिं ब्रह्मविदांचें संगति । न कळतांहि जीव उधरति । अमृत सेवीजे नेणति । गुण चि करी ॥४४॥
असतां दुष्टांचा संगी । न करीतां बाध घडे आंगी । तरि सज्जनसंगें सुमार्गी । असतां भलें ॥४५॥
तो जे वाचे प्रबोधी । आपण ते घेईजे स्वबुधी । तै हें संसार दुर्घष्ट व्याधी । उरैल कोठे ॥४६॥
गुरुसी देवाचें महीमान । हे उपमा देतां न्यून । हें अप्रतक्ष उधरण । रोकडें चि या ॥४७॥
देव देखीले कोणें कैसें । गुरुदेवो तो प्रत्यक्ष असे । तरी ये भक्ति मनोमानसे । येणें न्यायें भर्वसें श्रीगुरुब्रह्म ॥४८॥
परी या ग्रंथाचें गुह्यज्ञानें । होईल वस्तुसी साजनें । संशयात्मकें भवबंधनें । तुटतिल हेला ॥४९॥
येथिचि घॆउनि गुह्यज्ञानें । आणि या ग्रंथातें लोपुन । दाविति आपुलें महिमान । युगमहिमां ॥५०॥
जो एणें बोधे होईल ज्ञाता । आणि मिरवि परक्षाता । तेहि तो आपुली माता । पुंश्चलि केली ॥५१॥
येणें होये ज्ञानबळि । तो गोसावीयाचि गुरु बोली । यातें न मनि तो चांडाळि । गर्भु होये ॥५२॥
ऐसा तो प्रेमभरीतु । श्रीगुरुसी करी मातु । यापुढील वृत्तांतु । तोही आतां ॥१५३॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमब्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे उत्तरखंविवरणे शीष्यप्रबोधो नाम चतुर्द्दश कथनमिति ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP