मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|उत्तर खंड| निश्चयात्मयोगो उत्तर खंड देहांक उत्पन्ननाम निश्चयात्मयोगो निर्धारयोगो माहावाक्यप्रबोधो विवर्त्तबोध ब्रह्मचतुष्टय अहिंसायोग सचिदानंदनिरुपण उपनिषदानुसरित अवसानखंडविवरणे ब्रह्मसाक्षात्कारनाम वासनानिरसननाम स्वधर्मपालन शीष्यप्रबोधो उत्तर खंड - निश्चयात्मयोगो सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी निश्चयात्मयोगो Translation - भाषांतर सत्या: प्रभुध्दा: पश्यंति दृश्यादृश्यतरं यथा । तथा दृश्यरता: श्चातें संता: पश्यंति तत्पदं ॥१॥आतां येथुनि निर्धारु । सदथि पाहो विचारु । तो वेदिं वेदांति साचारु । सिधांतु हा ॥१॥ते नाहिं छिन्नभिन्न । शोभेना आनें आन । भेदु न पवे मार्ज्जन । हें सत्य न घडे ॥२॥असें बोलिले भाळाक्ष । यासी पद्मपाणि साक्ष । तो आदिवंतु न अप्रत्यक्षु । नाहि ना हो ॥३॥हें चि भृंशुंडी ह्मणें वसीष्टा । आत्मा अपुरा ना अप्रतीष्टा । तो नाहि नोहे द्रष्टा । होउनि पाहे ॥४॥अनेग सीध सीधांति । आत्मा छिन्न भिन्न मूर्त्ति । नाहि केलि निश्चंति । मानि बापा ॥५॥यास्तव शिष्यराजा । आत्मा नोहे ना दुजा । या भेदाचिये काजा । असक्य वेदा ॥६॥कां जें तें अज अमर अगुण । तेथ मीं द्रष्टा माझें मन । पाहे दृश्य करुन सासन । हें चि फळे ॥७॥ब्रह्म निशेधा निशेध पावे । या निश्चया निश्चयो फावे । तैं त्रीपुटी मुळस्वभावें । गम्य होये ॥८॥तेथ प्रमाण हें साकार । ह्मणावेना साचार । कां जें नाहिं असत्य निरंतर । नेदखो नसे ॥९॥तें नाहिं अपुर्व पां साच आहे । आहे ते नाहि नोहे । नाहिं तें मूढ जें पाहे । प्रत्यक्षाकारें ॥१०॥तें ब्रह्मीं विश्व नाहिं । हा निर्धारु पुसोनि पाहि । पाहांतां जेथें तेथें कांहिं । रिक्त आहे ॥११॥आत्मा दुखहा सत्य । ह्मणौनि फांटां पडले भवकृत्य । सिध्य साध्य ते नित्य । अतित पुसे ॥१२॥एवं सगुणां सुन्यव पडलें । सुन्य तें पुज्यें जालें । पुज्य गुणि भरलें । तें नेंघावे कां ॥१३॥तें अपुरें ना कांहिं । नाहि चि नाइकीजे कहिं । नसतें पाहाणें पाहिं । पाहो नये हो ॥१४॥हा आत्मा कोठें चि नसे । नाहि तो साच दीसे । हा निर्धारु नाना साया सें । पुसावा पुरुषें ॥१५॥तेव्हां तेणें चि निश्चंती । उव्दंसा येईल भ्रांति । कां जे भेदाचें भीति । पाया नसे ॥१६॥एवं फळलीये युक्ति । विषयाचि राहे शक्ति । तैं इद्रियें ये चि पंक्ति । फोडिति डरु ॥१७॥तैं गृहस्त वैराग्या लोटी । गृहस्त वैराग्या पाउटी । येणें स्वप्रकाशें भेटी । हे चि सदा ॥१८॥तैं गृहस्त धर्म कोंभैले । भोग चि तद्भोग जालें । या चि सलोळता फळलें । वैराग्य ते ॥१९॥हो कां कोण्हिं कोण्हें चरणी । असोनि प्रवेशे आत्मभुवनि । तो न उपाटें तेथुनि । कवणिं काळिं ॥२०॥हो कोण्हिं उंच वर्णि जाला । हें मुदल लाभेंसी चुकला । तो दिनु या उत्तरगर्भा बोला । मध्यें कैंचा ॥२१॥मेदिं भवरुचि जे गुंतले । त्यां हें ग्रंथताट नाहि विस्तारले । रे हे शब्दसीताचे बोने । वोगरीलें सजाति पुरुशा ॥२२॥हें ब्रह्म सर्वा सगट । पुरलें उरलें येकदाट । येथ हि असोनि चावट । भेदा भरलें ॥२३॥जैसा दिनु कल्पदृमांतळिं । तो चि तोडुनी बांधे मोळी । तैं हें ची भोगी आगळी । प्राप्ती कैंची ॥२४॥चिंतामणि लाधलेयां कोण्हि । करपे पाडों पाहे प्राणि । तो दाता येव्हडे हि दिनी । काये देऊं न सके ॥२५॥ब्रह्म चि सर्व जाले । सर्वत्रीं हें चि दाटलें । हे आटे येतुलें । तें ची ब्रह्मीं ॥२६॥॥इति बोधशब्द ॥====असा बोलता परमार्थु । तो शीष्या सुचला येथीचा अर्थु । देखुनि सद्रुरु समर्थु । पुसे आर्ते ॥२७॥तो ह्मणें जी श्रीगुरु । कळला उत्पत्तिविचारु । मज मानला संहारु । या चि परि ॥२८॥कथने कथन हे चि ज्ञान । जें ब्रह्मीं नाहि जडपन । ते सूक्ष्म सपुर निर्गुण । निराकार ॥२९॥त्या पासाव हें उत्पन्न । तेथें चि सर्व लीन । याचें सर्वपरी प्रमाण । वाटे मज ॥३०॥हा देवो चि जीवां वाटला । पुरोनि पूर्ण उरला । याचा मज विश्वास जाला । बहुतें पाडें ॥३१॥परि येक गुढ माझा चित्तिं । जें परब्रह्मी हे स्थिति । कोण आधारु विभृति । सांगा मज ॥३२॥परब्रह्म ते निर्मळ । अति सपुर नव्हे स्थूळ । तेथ हें एवढें ढिसाळ । थोर केवि ॥३३॥अर्क तुळ तंतु गगन । धरुं नेणें वातेंविण । तेथ या जडातें कवण । माझें ह्मणें ॥३४॥त्या या नभाहुनी सपुर । ब्रह्म सूक्ष्म निराकार । बोलतां काहिं विकार । दु:ख पावे ॥३५॥असी वस्तु निर्गुण । विस्तारें जाली सगुण । यासी आधारु कवण । असे देवा ॥३६॥हें ब्रह्म प्रकृती । असंभावनिय व्यक्ती । जीचा रोमीं हारपती । ब्रह्मांडगोळ ॥३७॥असी येव्हडि ढिसाळें । जडें घणें माहास्थूळें । हे धरीली सकळें । कोणें देवें ॥३८॥॥इति शिष्यवचन ॥ऽऽ॥====असा प्रष्णु करी शीष्यु । उत्तर दे ज्ञानदक्षु । ह्मणें तुं विचारी अपरोक्षु । जालासी कां ॥३९॥पूर्विं चि तुज कारणें । निरुपीलि सप्तावरणें । तें बरवी प्रमाणें । जालीं तुज ॥४०॥तें सात हि भिन्ने न मनीं । दीसे परस्परे दाटणी । परि गा सप्तावरणि । येकविध ॥४१॥ते एकाहूनि येक । द्शगुना अधीक । माया प्रमाण संतिक । कोण जाणें ॥४२॥ईश्वरी अहंतेचेंनी बळें । थारलि ये ढिसाळें । जैसी सूक्ष्मावरी भ्रमती थुळें । निघें दाटली ॥४३॥जैसें चक्र मेरु सीरीं । कां भ्रमरा भ्रमे आरि । तेवी हे थूळ ईश्वरीं । अहंतायुगें ॥४४॥ना तरी वाहाटुळिचा विकारी । जड चाले अंबरी । एवं अहंतेचा सीरीं । चराचर ॥४५॥मी इतुकी निधी । जोवरी आहे आनंदी । येणें आनंदे सुबुधी । माया असे ॥४६॥मायेंचा ठाइं मिंपण । तें चि अहंकारा आवरण । अहंकारिं अहंता रक्षण । व्योमादिकां ॥४७॥ज्या पासुनि जे होये । तें चि त्यासी आधारु आहे । येणें अनुकर्मे पाहे । आधारुं भूतां ॥४८॥त्या ईश्वरा आधारु ईश्वरु । असा मानावा निर्धारु । तो परमात्मा परात्परु । साचारु ॥४९॥तो देवो अनादि अनंतु । ह्मणौनि त्यासी नाहि आदि अंतु । तो चि कारणभुतु । कार्यजातां ॥५०॥ये परि सर्व स्थावर । हे मानिं तु साचार । सर्व प्रमाणी परीकर । हें चि घडॆ ॥५१॥ईश्वरापासुनि हे श्रृष्टी । यासी ईश्वरु चि आधिष्टी । हे ईश्वराचे कृपादृष्टी । थावर असे ॥५२॥हे ईश्वरीचि सर्व घटे । आणि ईश्वरापासुनि चि प्रगटे । तैसें चि ईश्वरीं आटे । निर्धारेसी ॥५३॥॥इति ब्रह्मांडस्थावरस्थान ॥ऽऽ॥====जैहुनि जैसें रचलें । तैहुनि तैसें चि संचलें । यासी आदिहुनि इष्ट जालें । देवत्रय ॥५४॥तेहि शोभा देखुनि दृष्टी । चर्तुभाग केली सृष्टी । हें कपीलेंसो गोष्टी । रुद्र करी ॥५५॥जालें धरेचें उत्पन्न । तैं नव्हते वर्णावर्ण । हे करावया कारण । देवत्रय ॥५६॥जो भगवान सर्वेश्वरु । जो सर्वातर सर्वज्ञातारु । तेणें केला साचारु । वर्ण धर्मु ॥५७॥उंचवर्ण ब्राह्मण । ते देवाचे मुखा पासुन । ह्मणौन देवाचें वदन । व्दिज चि होति ॥५८। बाहु पासुनिक्षत्रि । तें हें पराक्रमिं सर्वत्रीं । करस्थान पवित्रि । जाणावे हे ॥५९॥हें जाले उरु पासुनी । ते वैश्व भर्वसेनी । शुद्रांचा जन्मु चरणि । नीचवर्णु ते ॥६०॥याचें कर्म धर्म आचार । याथाविध सविस्तर । ते पुढां तेरावां कथनि मनोहर । सांगावें असे ॥६१॥असें देवापासुन । रुपा आले च्यारी वर्ण । यासी केलें प्रमाण । उदक येक ॥६२॥या वर्णाचारहोनी । आणिक आचार आहाति दोनि । हे तिनि निर्वाणि । अनाचारु चौथा ॥६३॥एवं वर्णाचारु शिवाचारु । यवनाचारु अनाचारु । चतुर्विध आवरु । श्रृष्टीसी केला ॥६४॥ह्मणें शंभु माझी आज्ञा । केली ये जंबुध्दीपी स्वज्ञा । ते न करावी अवज्ञा । त्याचि तेहि ॥६५॥वर्णाचारी नेम । उदकें ची चालति धर्म । यासी शुध्द करी ते उत्तम । उदक चि हें ॥६६॥पवित्रा अपवित्र । तें उदकें चि सर्वत्र । देवो धर्मु तीर्थ क्षेत्र । पूजाकर्म ॥६७॥नित्यें नैमित्यें सकळें । चालति येकें जळें । एवं यासी उदका वेगळें । प्रमाण नाहिं ॥६८॥शिवा चारिं विभूतीं । धर्माधर्मातें वाढविति । दोधातें हि नाशीति । भस्म ना तयां ॥६९॥नेम प्रायश्चित देवभक्ति । तया प्रमाण विभूति । लिंगाचारिं प्रवृत्तिं । येणे ची चाले ॥७०॥येवनाचारी नाम उचारु । हा चि धर्माधर्मु वेवहारु । त्यासीं येणें चि पवित्रता एरु । विचारु नाहिं ॥७१॥अनाचारिं नेम । मद्या मासादिकें धर्म । येणें चि होये उत्तम । या चि ज्ञाति ॥७२॥हे चतुर्भाव भिन्नभिन्न । आपुलाले आचरण । शोभा आणि पावन । तें चि त्यासी ॥७३॥जो पारखियाचा धर्मु । तो येरां अधर्मुक । जो ज्यासी केला नेमु । तो चि भला ॥७४॥येरें दरुशणें क्षिति । आपुलाले धर्मु विचरति । ते सांघतां वित्पती । बहुत असे ॥७५॥इति चतुर्विध आचारु ॥ऽऽ॥====हे चतुर्विध आचार । श्रृष्टि मध्यें निरंतर । तुज निरुपीलें साचार । आहे तैसें ॥७६॥ह्मणौन जें आपुलां धर्मीं । असति ते चि गा सुवर्मि । कां जे असतां श्रृष्टीकर्मि । हे चि भलें ॥७७॥या आचाराहि कलसु । तो ब्रह्मबोधु सुरसु । जैसा सूर्याचा प्रकाशु । सर्वावरि ॥७८॥कां उदिमांबरी निधान । कां भोजनि सुधापान । आचारावरी ब्रह्मज्ञान । शोभे तैसें ॥७९॥आतां ब्रह्मज्ञान ते असें । जें पूर्णब्रह्म प्रकाशे । तेथें चित स्मरसें । निवालेपणें ॥८०॥ते ब्रह्मी शाश्वत असोन । येणें कर्माचें परीधान । वरी आपुलें हि पूर्णपण । सांडावेना ॥८१॥असें जैं आत्मविशई प्रवीण । ते कांहि नेदषती भिन्न । ह्मणौनि सुखदु:ख समान । त्याचां ठाइं ॥८२॥सुखदु:ख सारासार । हे देहधर्म साचार । आत्मा तो निर्विकार । देखति ते ॥८३॥सुखदुखादि सर्वत्रा । देहिं या अखंड मात्रा । यास्तव गा पुत्रा । साहाणें यातें ॥८४॥जालेयाचें सुख न मनि । गेलेंयाचें नसे हानी । असा तो ब्रह्मज्ञानी । साहे यातें ॥८५॥असेंया बुधी कर्में करी । तो अलीप्तु सर्वेपरी । जैसी लक्ष्मी धीरते धरी । दरिद्र नसे ॥८६॥जेथ आमृताचे पान । तेथें कैचें जरामरण । तैसे ब्रह्मीष्टा बंधन । असे चि ना ॥८७॥हा योगु आहाचु साना । परी अवश्य तोडी जन्ममरणा । नाशकु भवबंधना । हा चि होये ॥८८॥कर्मफळां उदासु । तो केवळु ब्रह्मप्रकाशु । असी बुधी तो कलसु । ब्रह्मज्ञाना ॥८९॥जे ब्रह्मीहोन बुधी उठे । ते बुधीसी फुटती फांटे । पाठि तो प्राणि कुवाटॆ । लागे चि तो ॥९०॥कुबुधिचिया कुवांटा । जो भरे याची फांटा । तो आत्मपद चोहटा । चुके चि तो ॥९१॥अथवा ब्रह्मी बुधी नसे । तो प्राणि अपभ्रंशे । त्यासी जडकर्माचें पीसें । लागे चि तो ॥९२॥आतां कुबुधी ते कवण । याचें पाहिजे निरुपण । तरी वस्तुविभ्रमि मन । ते ते कुबुधी ॥९३॥जे फलाशार्थवादें । स्वर्ग सुखाचेंनि स्वादें । धावें अभिलाशें व्दंदे । ते सब्दुधी नाहि ॥९४॥ब्रह्म नेमांवाचुन । सृतिस्मृतिचें प्रमाण । आणि तें हि तें पूर्ण । बुधी नोहे ॥९५॥जे आशालुब्ध अनेग । करी पश्चादि याग । ते हि बुधी नव्हे चांग । आत्मविशई ॥९६॥कां भु गो गजादिक । दानें करी अनेक । परि जे अभिलाशें फलाशक । ते बुधी नोको ॥९७॥कां भूतदया देहदमनें । माहातपें साधि साधनें । करुं धावे अभीमानें । ते भ्रंशबुधी ॥९८॥नीगे तीर्थाचीये मोडी । कां घे मार्ग दरुशनाचि गोडी । परी गा बिजरक्षक तेवढि । बुधी नोको ॥९९॥असो विवंचना हे हिं । जंवरि ब्रह्मी स्वस्त नाहिं । तंवरी ते सुबुधी काहीं । ह्मणों नये ॥१००॥जंवरीं विषयवेष्टली बुधी । तंवरी नव्हे आत्मसीधी । काये हो कवटालिता भवोदधी । पारु पाविजे ॥१॥यास्तव मांगा सर्वस । केला विषयाचा निरासु । कां जें विषयसुखें ग्रासु । बुधीसी होये ॥२॥हें मनदृम विशयविसोळा । होये इंद्रियें गिदाचा मेला । तै ते बुधीआमिसांचा गलाला । अवश्य घेती ॥३॥मागां जंबुअजादये । भूभ्रत माहाराये । ते अभिलाशीं विषय । वेष्ठित सदा ॥४॥जे भोगीतां सदा व्दिपावती । स्वर्गें हि पुरे न ह्मणती । त्याची बुधी कवणें रीती । स्वस्त होये ॥५॥जे न धाय अल्प संतोषें । ते त्रैलोक्ये धाये कैसें । ढिशाळ ब्रह्मांडाही असें । कवलु पाहे ॥६॥जो हें विषें विरुढे वनवी । इंद्रियें इंद्रिय पास उगवी । मन सबीज बुध्दी लावी । ब्रह्मभूमिकें ॥७॥असा धीरबुधिचा प्रतक्षु । तो सुखरुप शुध मोक्षु । हा चि घेतला पक्षु । नारायणें ॥८॥इति शुध्दबुध्दिनिर्धार ॥ऽऽ॥====ये बुधीचें निर्धारें । परवस्तु लाहिजे नरें । ते षट्पंथ व्दादश व्दारे । सांगो आतां ॥९॥कर्म पंथु भक्तिपंथु । ध्यान पंथु योगपंथु । ज्ञान पंथु राजपथु । षटु पंथु ते ये होती ॥१०॥येक येक पंथा दोनि दोनि व्दारे । तेहि सांगो सविस्तरें । हा शक्तिसी श्री शंकरे । मार्गु दाविला ॥११॥प्रसीध विहित विचारें । हे कर्मपंथीचि दोनि व्दारें । पूजा व्रतें असें जे जे निर्धारीयें दोनी व्दारें । भक्तिपंथीचिये ॥१२॥मुर्त्तिकल्पणा देह समाधी । ये येणे ध्यानपंथु पावे सीधी । ईश्वरार्पण निराशबुधी । ये यौगपंथी व्दारें ॥१३॥तत्वार्थु प्रपंचनिरासु । हा ज्ञानपंथु सुडंसु । अहेतु ब्रह्मप्रकाशु । राजपंथी शोभे ॥१४॥बारा व्दारे सा पंथ । सर्वा हे चि समर्थ । यांतु जे होति हित्तार्थ । ते चि घेणें ॥१५॥प्रथम पंथु पायेवाटु । दुसरा प्रव्हाणिकु नीटु । तीजा रथीकु चोखटु । राजवस्तिंचा ॥१६॥चौथा सुखासनिकु । पांचवां दंळिव ग्रामिकु । सठा थानु स्वस्तिकु । वोळखावा ॥१७॥येकाहुनि येकु थोरु । हितकारकु तो सुंदरु । जेणे चुके हा संसारु । तो चि घेणे ॥१८॥हा पंथुनिर्धार चींती । असें देवो तुझां हाती । जें यईल प्रतिती । तें मानी ॥१९॥॥इति पंथव्दारनिर्धार ॥ऽऽ॥====सांगीतलें कां सांगने । हें विचारुनि घे मनें । नसुधें माझें चि वचनें । विश्वासो नोको ॥२०॥शाब्दिका मुष्य श्रृतिस्मृति । सुचना केली नेणो कीति । परी यांतील जे ज्ञानसंपती । ते चि घेणे ॥२१॥शुध शब्दाचिये पाती । जे जे अनुमाने बैसती । तें तें धरावें हाती । सुविध जनी ॥२२॥प्रत्यक्षा नसे निर्धारु । तो हि करावा निरोत्तरु । रज्जु देखोनि सर्पाकारु । न मनावा सर्पु ॥२३॥शुक्ति नेघावी रौप्येभ्रमें । गांठि न बंधावें मुलामें । तैसी चि उपमि तेउतें । पाहोनि घ्यावे ॥२४॥जे जे सत्यार्थीं निर्धारें । ते ते घेणें चातुरें । हे आज्ञा सिधेंश्वरें । पूर्वि च केली ॥२५॥सत्सिध वस्तु इत्येर्थु । तेथीचा स्वामि समर्थु । तो सिधेशु सत्यार्थु । पूज्य सर्वा ॥२६॥तेणें मायाधिपें ईश्वरें । विश्व उध्दरावें निर्धारें । ह्मणौनि बोले उत्तरे । पाचां मुखी ॥२७॥तेथीचा बोधु सुदेशी । करुनि दिजे तुह्मा पासी । ह्मणौनि न भरावें अन्यारसीं । त्रिबंक ह्मणें ॥२८॥इतिश्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पुर्णानंदे अवसानखंडविवरणे निश्चयात्मयोगो नाम व्दितीयकथन मिति ॥२॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP