उत्तर खंड - ब्रह्मसाक्षात्कारनाम

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


पूर्णात्पूर्णतरं श्रुध्दं पूर्णें पूर्ण विराजते ।
पूर्णमेवांतरं बाहयं संपूर्ण पश्यतो मुने: ॥१॥
आतां आत्मा निक्षेपुन । तुज सांगों येथून । हो हें सर्वाचें कारण । आरंभले ॥१॥
हे या ग्रंथाचि दशा । आणु कथन ब्रह्मरसा । जै सीमं आत्मप्रकाशा । ते हे कथा ॥२॥
हा निवार्णाचा खेळु । असे मांडला परीबळु । येथ मनाचा पायाळु । घेतां पाहीजे ॥३॥
सर्वाही मधें चांग । मांडला हा प्रसंग । परि आधि भुमिकाचा योग । प्रगट करुं ॥४॥
प्रथम दशा क्षिप्ता । दुसरि गतायाता । तीसरी श्रेष्टता । सुलीनता चौथी ॥५॥
सांगो क्षिप्तेचें लक्षण । निरुतें जाणे ब्रह्मज्ञान । परि ब्रह्मस्वरुपी मन । थोर नव्हे ॥६॥
पाहातां ये क्षिप्तदशे । कोठें विश्रांति नसे । येथें दृष्टांतु असे । अलोलिकु ॥७॥
जेवी स्थंबि बैसानि वायेसु । करिं सागरी प्रवेशु । गोंदळु जालेया बहुवसु । तेथुनि उडे ॥८॥
तंव भवतें जळ असे । पुनरपी स्थंबी येउनि बैसे । सवें चि उडॆ हव्यासें । तो जळ चि देखे ॥९॥
जळा त्राणें झडपीत । सवें चि स्थंबावरी येत । यापरी कष्टत । ते क्षीप्त दशा ॥१०॥
तैसा प्रपंचि ठाउ नसे । ब्रह्मी चीत न बैसे । जाणतां ये क्षीप्तदशे । घेउं नये ॥११॥
आतां गतायाता भूमिका । तिची असी असे टीका । जे उभये सुखा । घेउं धावे ॥१२॥
ब्रह्मिं चित वसे । प्रपंचीहि स्मरु असे । हे खेळनें जैसें । खुते फळीचे ॥१३॥
कां पक्षु फळातें चुंबितु । उडोनि स्वादु घॆतु । न संडी फळाचि हेतु । उठे बैसे ॥१४॥
असें गोडीये गुंतें । धरी सांडी मागुतें । परी मानसें सचेते । तेथें चि लाधे ॥१५॥
जेवी वर्षाकाळीं अनावृष्टी । नभिं जनाचि दृष्टी । कां दुर्भिक्षकाळिं गोष्टी । धान्याची जैसी ॥१६॥
कि रोगिये निवृत्ति रोगा । किं दुर्धष्टमार्गी मार्गस्ते संगा । किं उतरागमे उतरनार्थ गंगा । नावे लागी ॥१७॥
तेवी प्रपंचवस्ती ब्रह्मवर्ते । तयाचें चित्त अखंड गुते । जाण येणे दृष्टातें । गतायाता ॥१८॥
ति चि दृशा सन्मीळा । जे ब्रह्मीं असोनि निश्चळा । जैसा मकर मळू जळा । सांडो नेणें ॥१९॥
तैसा ब्रह्मीं स्वचितु । आणि इकडील सर्वही हेतु । प्रपंचिहि वर्त्तता तद्रतु । तेणेंसी असें ॥२०॥
सोरठी डोले आवडी । परी शाश्वत लक्ष दुडी । कां कामिनी दुर्वाडी । हेतु तें पुरुशीं ॥२१॥
किं धेनुचि लक्ष बाला । पक्षिणिलक्ष वीसोळां । की लोभी लोहेवेगळा । हेतु तेथें ॥२२॥
साधक लक्ष साधनि । पाठकु जैसा पठणिं । कां आगमिकाचिं विधानि । हेतु जैसी॥२३॥
तैसा सर्वाचारीं असे । पण येथीचा कांही चि नसे । कां जे ब्रह्मीं निवाले कैसे । उठावेल चित ॥२४॥
ते हे श्रेष्टता गहन । चौथी दशा सुलीन । जे ब्रह्मी हारपौन । हेतुसहित ॥२५॥
गंगा सागरिं संचरे । कां कापुर पवनीं वीरे । कां इंद्रियविकार सरे । सुषुप्ती काळी ॥२६॥
असी लीन तद्रुपा । इसी रुप नव्हे बापा । मन चि वीरे मांसाक्षेपा । कोण ठावो ॥२७॥
ते हे भुमिका रक्षुनि । सादर होये निरुपणी । ब्रह्म देखसी ते स्थानि । निश्चळ राहे ॥२८॥
॥इति चत्वारो भुमिका ॥ऽऽ॥
====
मागां केली जे गोष्टी । ते प्रकाशु दृष्टी । जेणें आदिष्टीली श्रृष्टीं । तो दाखउं आतां ॥२९॥
शुध्द अहंकाराचें लक्षण । तें करुं निरुपण । जों पाहातां नयेन । धाती तुझे ॥३०॥
हा अविध्येचा कुंवासा । हा चि प्रपंचाचि दशा । देहमात्रा सर्वसां । चाळि तो आत्मा हा ॥३१॥
हा सूत्र स्वरुपा । हा चि माया आणि रुपा । हा शुध्द चि पडपा । असा आला ॥३२॥
हा चि पिंडिं ब्रह्मांडी । येणे देहाच्या घडमोडी । याचें लक्षण मध्यखंडी । वोजा केलें ॥३३॥
हा मूळ येकाक्षरु । हा त्रिविध निरंतरु । याचा केला निर्धारु । आदि खंडी ॥३४॥
चंद्र सूर्यो तारादिकें । ये त्यामध्यें खद्योतकें । याच्या प्रकाशा परनिकें । तें चि दिसे ॥३५॥
घन जड पोकळ । दिसे तो हा चि सकळ । पाहातां कांहिं या वेगळ । असे चि ना ॥३६॥
सत्छिद्रता गगन । भरिव ते याचे लक्षण । हा पूर्णात्पूर्ण पुराण । परवस्तु हा ॥३७॥
याहि मध्यें कारण । पूर्ण ब्रह्मींष्टाची खुन । शीव संप्रदाइं हें चि प्रमाण । बीज योगी याचें ॥३८॥
येथ लक्षणेंसी अहंकार तिनि । तेहि दाखउं निवडोनि । तें आइक आतां येथुनि । उकलु करु ॥३९॥
जें श्यामशुध नि:कळ । तें तामस स्वरुप तमाल । यामध्यें जे गोधूळ । ते राजप्रभा ॥४०॥
जें चोखाळ शुध श्वेत । ते सत्वरुप साक्षात । असें दाटले देखती महंत । या चि डोळा ॥४१॥
शुध सात्विकु निर्मलु । तो स्वभावें धवळु । सपिंजरु चोखाळु । राजसु तो ॥४२॥
तामसु जो याचें मूल । तो कृष्णरुप केवळ । ज्यामध्यें कलोळ । करिति सर्व ॥४३॥
तैसें चि पाहाति याभीतरी । जे रत्नकण सदाट अंबरी । ते आदिहेतु ईश्वरीं । येणे लक्षणे ॥४४॥
तरि हें महतत्व चि भर्वसेन । कां जें माये ईश्वरापासुन । हेतु प्रगटलि ते आन । बोलों चि नये ॥४५॥
अथवा याहि वेगळ। जें भरले देखे अंत्राळ । ते हि ते चि केवळ । जाणिजे नेमें ॥४६॥
येथें कीतेक गुंतले । तेही ब्रह्मीष्टी देखीले । याही पर पाहो ठेलें । परम ज्ञातें ॥४७॥
याचि पूर्णता देखुनि । सुखावले पमर ज्ञानी । तें चि गुह्य मानुनि । ठविलें तेंहि ॥४८॥
॥ इति अहंकार महतत्त्व लक्षणं ॥
====
ईश्वर तनु या अतीत । परमात्मा पूर्ण नांदत । अनेक दीप्ति उठत । तव्दिकार ते ॥४९॥
याही मध्यें सदोदीत । हा आपुलें छंदें हेलावत । दाटलें विश्वभरीत । चैतन्य तें ॥५०॥
येणें गगन भरीव । या चि मध्यें सर्व जीव । सबाह्य अंतर सर्व । हें चि दाटले ॥५१॥
॥इति पूर्णप्रकाश ॥
====
हा आत्मा येणें मानें । दाटला असे पूर्णपणें । हा पाहावेया बाहिज्ञानें । उठलिं असी ॥५२॥
दृष्टीपटले उठती । तेणें चि भूललें नेणो किती । येक नेत्रा झुळका घेति । गाळोंनियां ॥५३॥
येक दृष्टीचेंनि भरें । घॆति उर्ध चपळ बारें । कां नेत्रासमीप चक्र फिरे । तें चि मानें येकां ॥५४॥
कां तर्णितेजाचे उद्रा । घॆति नभिचे त्रिमिर । बिंबें बिंदु तुषार । घेति येक ॥५५॥
दावानळु दाटे पर्वती । तैसें चि येरु पाहाती । येक धुमाकार आणिति । दृष्टीमध्यें ॥५६॥
मनें चिंतिला ये वेळें । लक्षी पसरति बुबुळें । ते चि घॆति डोळे । भरुनिया येक ॥५७॥
उठती नेत्रां असीया झुळुका । तो चि आत्मा मानें येकां । येक मानिति मयेकां । क्रुती दीसे ते ॥५८॥
कां भूमि वनि डोगरी । हेलावे तेजलहरी । ते सदोदित ह्मणौनि अचातुरीं । घेतला फुजूं ॥५९॥
नातरी खोविलें दीठि । वर्त्तुळ दिसे नभाचे पोटीं । ते सुन्य ह्मणौनि दीठी । ठेविलि येकी ॥६०॥
यांत दीसे सूक्ष्माकारें । पाहाति त्याही अंतरे । कितेकाचि निर्धारे । बुधी येथे ॥६१॥
असे श्वेतबींबा भीतरी । कृष्णचक्राची भवरी । व्यजन दीसे त्या माझारी । या अंतरी कांहि येक ॥६२॥
असें घेती देह ज्ञानी । तैसे चि येक पाहाती गगनी । येक घॆति दाटुनि । दाटलें तंतु ॥६३॥
व्योमी रथचक्राकारीं । पाहाती त्यांचा गर्भव्दारीं । आकृति दिसे सामोरी । तो चि घॆती ॥६४॥
निशीमध्यें खद्योतक । तैसें नभी पाहति येक । येकामानें संतिक । नभमंडळ ॥६५॥
गवाक्षिं भरले रेण । तैसें येक पाहाति गगन । येक घेती श्वेतवर्ण । पोकळिमध्यें ॥६६॥
कां त्राहाटिलें दृष्टी । नभी देखती श्रृष्टी । ते वस्तु हे गोष्टी । आइकुं येकाची ॥६७॥
कां धनगर्भि तडीता । तेवी धावती दृष्टीलता । तो विश्वासु बहुतां । मानला असे ॥६८॥
ठाईं ठाईं तेज स्फुरीत । पोकळीमध्यें देखीजत । तें मानुनि शाश्वत । बैसले येक ॥६९॥
सदाट कनिका भ्रमाति । यातें चि येक मानिति । येक प्राणु घेति । गगनगर्भि ॥७०॥
ठोका लागे कां मानें चेकळे । निधाउनि भरति डोळे । ते चि येक निर्मळ । मनें मानिति ॥७१॥
असी जे रत्नपींजरी । लक्षी भासे अंबरी । ते साच सर्वेपरी । माने येकां ॥७२॥
येक आंधारां बैसोनि । पाहाति प्रकाशु नयनी । येक महीतेम लक्षुनी । घेती ज्वाळा ॥७३॥
दृष्टीपास नागजाळ । लक्षीं धावतां ये चपळ । याचे अंत:करण निर्मळ । मानिति येक ॥७४॥
हे थावरुनि दिठि । येक आनिति निहटी । मग पाहाती त्याचा पोटी । हिरण्यगर्भु ॥७५॥
दिठि ठेउनि विराटपुरी । महोरगा कृतीवरी । मूर्त्ति लक्षीती साजीरी । श्रीहरीचि ॥७६॥
इंद्रजाळाचे आकृती । मध्यें सुकपक्ष लक्षीती। तो जीव हंसु मानीति । किति येक ॥७७॥
येक उगवतां तरणी । पाहाती प्रकाशु खोउनि । आकृती दीसे नयेनी । तें चि घेती ॥७८॥
उठे दीपाची आकृति । यांत चि येक मानिति । येक जीवातें पाहाती । जीवभूतेंसी ॥७९॥
मधुमक्षिकाचे परी । तेजे धावती अंबरी । ते जीव हे निर्धारी । नेमिलें येकी ॥८०॥
पण या नेत्राच्या झुळुका । हे नव्हे जीवभूमिका । पूर्णप्रबोधी टीका । ना ठेविली येथें ॥८१॥
अहंकाराचें भरणी । जीव दाटले दाटनी । या जीवाची आदि खानि । तो चि असे ॥८२॥
घन जड पोकळ । हे जीव बीज सकळ । जें दाटले तमाळ । ते ये जीव ॥८३॥
प्रबुध वचनें प्रांजळें । जीव दाटले तमाळ । ते देखती हे ची डोळें । श्रीगुरुकृपे ॥८४॥
असो येक मतिभ्रम्श । ते पाहाति छायापुरुश । खपुष्पिं विश्वास । येका पुरुषाचें ॥८५॥
येक होउनि प्रविण । पाहाती जळीं रिगोन । येक ध्याति आनौन । ध्यानि मूर्ति ॥८६॥
असी देखणि पनास । ते तुं मानि रे उव्दस । मिथ्यादृष्टि मानस । गोउं चि नये ॥८७॥
येथ पर्यंत लक्षिति । तें सर्व मतें आरुती । परी गा तत्वत नेणती । पूर्ण आत्मां ॥८८॥
कोण्हा येकाच्या गोष्टी । ब्रह्म न दिसे दृष्टी । ते विचाराची श्रुष्टी । मध्यें घेणें ॥८९॥
तरी हे भूतें अपुरीं । देखीजति दृष्टीभरीं । आदि अहंकाराची थोरी । कोण जाणें ॥९०॥
हें अपुरें पूर्ण दीसे । पूर्ण तें नेदखावें कैसें । मतिमंद बोलति तैसें । घेऊं नये ॥९१॥
जे उदास भरणि भरलें । या विश्वासासी उरोनि पुरलें । लटिकां बोलिं प्रर्वत्तले । ने देखतां चि येक ॥९२॥
ह्मणौनि ये वांवसि बोलणि । ते नाइकावी गा श्रवणि । तंव शीष्य कर जोडोनी । विज्ञप्ति करी ॥९३॥
देवा जी मी पूर्ण जाला । सर्व संशयो निरसला । तरि मागां बोलति त्या बोला । निर्धारु करा ॥९४॥
जे श्वेताबिंबा माझारी । कृष्णचक्राची भवरी । हे का इये शरीरीं । तें दावा मज ॥९५॥
तवं बालिले उत्तर । आइक तें सागैन सविस्तर । तरणि तेजाचें बिढार । असे येथें ॥९६॥
जेणें आधारें चळति देहे । तें अपूर्व वस्तु आहे । प्रत्यक्षा प्रमान करुणि पाहे । स्वरुप लक्षणें ॥९७॥
जेणें हें ब्रह्मांड कवटें । जे ये ब्रह्मांडी न संटे । प्रगटलेयां भेटॆ । सर्व काहिं ॥९८॥
चंद्रार्क अग्रि तारा । हरिहर ब्रह्मादि सुरां असुरा । जीवयोनी चराचरं । रुप जेणें ॥९९॥
सरिता समुद्रा पर्वत वनें । याचा निवाड कीजे जेणे । वेद शास्त्र पुराणें । जेथुनि निगती ॥१००॥
असें तें पूर्ण पाहिं । तया वांचुनि नकळे कांहिं । या सर्वांते निवडी तें नाहिं । दुजें कोण्हि ॥१०१॥
तें हें सर्व चि संचलि । जे हे परवस्तु दाविलि । ते उचंबल दाटली । तिहि लोकीं ॥२॥
या निर्मळा उभया शक्ति । पाहातां याचि येकी च गति । यासी जेथुनि उत्पत्ति । तें स्वरुप सार ॥३॥
येथुनि हें जग प्रकाशें । तें मूळ देवत आहे असें । ज्याचेंनि गति असे । ईश्वरादिकां ॥४॥
जें स्वरुप पाहातां । शंका उपजे मन्मथा । येरां सुंदर्याचि कथा । काये तेथें ॥५॥
महदादि जीवजात । जेणें आधारें चळत । हाताईते होत । जया करितां ॥६॥
या प्रकाशाविण पाहिं । येरे ज्ञानें काज नाहिं । हें विवळलें जे देहीं । ते चि ज्ञाते ॥७॥
जे वस्तुचि सारणि । वोळली धावे त्रीभुवनी । सर्व ज्ञानाचि सीराणि । जेणें विण ॥८॥
तें सर्वत्री सदा सर्वस्त । परी गा याचें ज्ञान शुध स्वस्त । पाहातां प्रकाशले ये समस्त । जेणें व्दारें ॥९॥
असें सार चराचरिं । तु ह्मणसील असैल दूरी । तरी हां संशयो न धरी । कोण्हें विशईं ॥१०॥
ते हें तुझें तुज चि जवळें । आहे निर्मळ निराळें । तेणें तें चि निवळे । सोहज्वळ ते ॥११॥
त्याचि वोळखि आतां असी । जे श्वेत स्वरुपाचि राशी । तें निर्मळ तेज समस्तांसी । अखंड दिसे ॥१२॥
तया मध्यें निर्धारी । कृष्ण चक्राचि भवरी । तमाळनीळ त्या माझारी । निराल बिंदु ॥१३॥
त्याचांही उदरी सार । आहे स्वरुप सुंदर । जे पाहातां परिकर । मन निवे ॥१४॥
असें तें चक्रगर्भ चक्रोदर । चक्रमध्ये चक्रसार । चक्रें चक्र चि सुंदर । पाहोनि घेणे ॥१५॥
तेणें तें चि देखावें । तेणें तें चि युजावें । तेणें तें चि ध्यावें । सुधें करुनि ॥१६॥
तें सर्वत्रीं सर्वत्र वसें । तेणें तें चि प्रकाशे । बिंब चि बिंब भासे । सुबिंब ते गा ॥१७॥
ते दृष्टीसी दृश्यपण । प्रकाशें प्रकाशलि खुण । पाहाणें पातें जाण । त्याचें चि तें गा ॥१८॥
परि हेंहि पूर्ण प्रबुधें । करुनि नाहिं घेतलें सुधें । ज्यासी आनंदु आनंदें । अखंडमान ॥१९॥
मागील वोफळ देखणें । ते ही त्यजावें सुजाणें । जेवी नानवटी चाली नाणें । बाहिमुदें ॥२०॥
त्याचा विटाळ मानुनि । भलें त्यजावी दुरुनी । अशौच्यें ब्राह्मणी । वर्जिजे तैसें ॥२१॥
जेवी शवपाकाची पाती । स्वाचारमनें नातळती । कां दुर्गंधी वर्जिती । भ्रमरादिक ॥२२॥
आकार आणि आभास । भरलें देखसी सर्वस । तर्‍हिं येथे मानस । गोऊं नोको ॥२३॥
शिशुगृहाचे परी । जो असे सर्वाचारीं । तो न लिंपे निर्धारी । गृहकृत्या ॥२४॥
जळें सिंधु पूर्ण होये । परी तृसिका उपगा नये । हें लवण भक्षिता काये । जाईल तृशा ॥२५॥
अपूरें पाहाणें नोहे शुधें । ते वाळावें बाहिरमुदे । निश्चयें घेणें प्रबुधें । पूर्ण प्रकाशु ॥२६॥
॥इति बहिर्ज्ञान प्रकाशु ॥
====
हो कां हें चि निर्धारे चीति । असें देवों तुझां हांति । तु पाहे पुडती । त्या स्वरुपाते ॥२७॥
जें पाहातां या डोळां । भरलें येईल अवलीळा । ते वस्तुचा गळाळा । दृष्टी घ्यावा ॥२८॥
जेथ मन समूळ बुडे । बुडालें कादाहि नुपडॆ । असें तें आमचें नि तोंडें । पारखुनि घेईं ॥२९॥
असो हा विलंबु काइसा । माझेया बोलाचा आरिसा । करुनि पाहे प्रकाशा । तुं चि तुझ्या ॥३०॥
जेथ लक्षा लक्षि राहे । पाहाणें अपाहाणें न साहे । असें सर्वपरीं आहें । सर्वही तें ॥३१॥
लक्षी मुद्रा ध्यान । अवस्ता समाधि साधन । या सर्वातें डावलुन । दिसें तें पाहे ॥३२॥
जेथ भरतां चि दृष्टी । होइजे समूळ संतुष्टी । ज्यासी तलु माथा उदर पुष्टी । असे चि नां ॥३३॥
नांदें सबाह्यें भ्यंतरें । नकळे सन्मुख पाठीमोरे । जगी भरे पुरे उरें । तो चि पाहे ॥३४॥
हा डोळसें देखावा । जातीअंधें ही पाहावा । सर्व इंद्रियें भोगावा । हा चि आत्मा ॥३५॥
या सर्वागाचें करुनि चक्ष । हा चि पाहाणें प्रत्यक्ष । आपुलें मन साक्ष । देईल ते घ्यवें ॥३६॥
मन प्राण विषयें । ज्ञान कर्म इंद्रियें । येणेंसी दीसे तो होये । पूर्ण आत्मा ॥३७॥
जो रोमरोमीं आपुलां । तैसा चि अंतरबाह्य संचला । असा देखसी दाटला । तो चि आत्मा ॥३८॥
येक निर्धार मानि । घे प्रपंचातें गाळुनी । प्रपंचु हें चि परी नयनी । पूर्ण पाहे ॥३९॥
तरंगु तोया ऐक्यता । तो तरंगु तोयेपणें घेता । हांवां झोंबिजे तों रिता । हातु निगे ॥४०॥
प्रकाशु कीति वेचावा । समूळ दीपु चि कां नेघावा । तेवी आत्मा देखावा । सर्वासहितु ॥४१॥
ब्रह्म प्रपंचु ये दोनि । दीसे दृष्टी दोंपणि । जो नाहिं देखीलें नयनी । पूर्णब्रह्म ॥४२॥
तेव्हां ब्रह्मीं देखीजती जीव । जीवी ब्रह्म चि सर्व । जीव ब्रह्म व्दीभाव । नुरति तेव्हां ॥४३॥
अल्पबुधी भेदु दीसे । परी सर्वत्र हा चि असे । ना तरंगमाळिके जैसें । आपतत्व ॥४४॥
पाहातां ब्रह्मापासुन । प्रपंचु न दिसे भिन्न । कां प्रपंचनिर्धारीं आन । ब्रह्म नसे ॥४५॥
अग्रिं मूळीं पाहिजे । तो वृक्षा भेदु नेदखीजे । पल्लव पत्नीं निर्धारीजे । तो चि वृक्षु ॥४६॥
जैसें पाहावे त्यापरी । हें येक चि गा निर्धारी । सव्यासव्य अंबरी । तंतु जैसा ॥४७॥
आरे करीचिया कांकणां । कां आणावें दर्पणां । स्वयें देह आलिंगना । कोठें जावों ॥४८॥
जो आहे सर्व समुदावो । तों चुकावा ना हा ठावो । असा निरंतर देवो । धरुनि राहे ॥४९॥
हा तु हें गे हें चि कर्म । हा मी हें गे चि वर्म । हे चि देह हें चि धर्म । हें चि पाहे ॥५०॥
हें विस्तारु हें चि बिज । हे वस्तु हे चि वनिज । घेणें देणें कार्य काज । हें चि सर्व ॥५१॥
हे चि सर्व संचले । जीवाकारें वाटलें । उरलें तें दाटलें । सदोदित ॥५२॥
तें हें पूर्ण पुराण । भरलें कोंदलें गगन । यांतुन घे निर्गुण । सूक्ष्मदृष्टी ॥५३॥
हे दीव्यवस्तु प्रत्यक्ष । पाहातां हे चि दिव्यचक्ष । हें चि दृष्टी हें चि लक्ष । पालटु कैचा ॥५४॥
जें निरसीलीं सकळें । तुं पाहे त्या वेगळें । जेणें हें अपुरें बुबुळें । पूर्ण ध्याती ॥५५॥
हें चि अनुभविं कारण । घे अविनाश गाळुन । जेथें निवैल अंत:करण । अगाधपणें ॥५६॥
जें निर्मळ आणि सपूर । दाटलें असे निरंतर । तें चि घॆ गा येर । पाल्हाळ नोको ॥५७॥
जें हालेना चाले । डोले ना खोले । जें वर्ते विवर्ते बोले । असे नव्हे ॥५८॥
ज्यासी आद्यवंतु ना सेवटु । उंच ना तळवटु । जो येकटु ना घनवटु । सर्वसरिसा ॥५९॥
जया पैसु ना गर्भु । जो छिंन ना स्वयंभु । तो हा सवहि सुलभु । निश्चयात्मकु ॥६०॥
जेथ वर्ण ना व्यक्ति । जेथ प्रकाशु ना दीप्ती । जेथ भावेंसी भक्ति । दखिजेना ॥६१॥
ते हे सर्वत्री दाटलें । तुज वाटेल कोंडलें । तें हें देखावें संचलें । प्रकाशरुप ॥६२॥
सागराचा मध्यस्थानीं । जळचरां सर्वत्र पाणि । असें देखसी तैं मानि । परब्रह्म ॥६३॥
नेत्र मुरडोंनि पाहिजे । तर्‍हिं हि यातें चि देखिजें । जेथें बुडौनि तरीजे । भवार्णवु हा ॥६४॥
मनां मन साक्ष करी । सर्वा श्रेष्ठ तें चि धरी । पाहे पां ज्या भीतरी । सर्वत्र दीसे ॥६५॥
काळ वेळ विवर्जित । हेतु दृष्टांत रहित । साधी साधना अतीत । ते चि घे गा ॥६६॥
घेणें तें नव्हे अपूरें । त्यजावें तर्‍हिं न सरे । उगयां तर्‍हिं बा रे । तें चि असे ॥६७॥
जेथीचि जालयां वोळखी । सरे प्रपंचाचि उखी । असें तें सेवीतां सुखी । कोण नव्हे ॥६८॥
आकार आभास टाळोन । प्रकृतितें वाळोन । गगनातेंहि गाळोन । सार घ्यावें ॥६९॥
जें गाळितां न खिरें । जें टाळितां न सरें । जें भरे पुरे उरे । तें चि घ्यावें ॥७०॥
आतां तुं चि क्रिया तुं चि कर्म । तुं ची प्रकृति तुं चि ब्रह्म । तुं चि देह तुं चि धर्म । तुं चि सर्व ॥७१॥
असें सांगता समान । दौघे जाले तल्लीन । बोल गेला विरोन । तें चि ठाईं ॥७२॥
गुरु शिष्य संवादि । जाली समता शुधबुधी । दोघां हें चि समाधि । निर्विकल्प ॥७३॥
गुरु शिष्य दोघे जन । आंगी तें चि अवतरण । यां चि परी नांदवन । तया दोघां ॥७४॥
प्रेमे कंठ दाटले । दोघे निवांत राहिले । कीं ब्रह्म सीयरें संचरले । तया दोघां ॥७५॥
कीं ते ब्रह्मसुखे कोंदलें । कीं ते ब्रह्मवारें व्यापिलें । येकसरीसें ॥७६॥
कीं ते ब्रह्मरसाचि गोडी । घॆतां न माये तोंडी । कीं ब्रह्मबोधे वेडीं । घुमारलिं दोघें ॥७७॥
सर्व इंद्रियें अचेष्टे । राहिलि निवांते ततष्टें । तें ब्रह्मसुखें संतुष्टें । सुखावली ॥७८॥
ते श्रीसिध्देशाचे कृपे । ल्याले ब्रह्मीचि पडपे । त्रींबकु ह्मणे तदृपें । होऊनि ठालिं ॥७९॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमब्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे विवरणे ब्रह्मसाक्षात्‍ कारनाम एकादश कथन ॥ मिति

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP