उत्तर खंड - देहांक उत्पन्ननाम

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


ऊँ सचिदानंदात्मने श्रीसिध्देशायनम: श्रीसरस्वत्यैनम: दिव्यंतरिक्षभूमौ च बहिरंतश्च मे विभु: ।
योवभात्येव भासात्मा तस्मै सर्वात्मने नम:॥१॥
तदात्मान मनाद्यंत मोक्षो भवति तत्छृणु । स मोक्षो नात्मा कथितंस्तत्वज्ञैरात्मदर्शिभि: ॥२॥
यावत्प्रबोधो विमलो संक्षेपेन मयोच्यते । येन शास्त्रविचारेण ब्रह्मतत्वं विबुध्यते ॥३॥
सजयति जगश्रृंगारा । जगद्रूपा जगदीश्वरा । जगतारका माहेरा । अनादि सिधा ॥१॥
तुं केवळ सर्वबंधु । स्वयें स्वप्रकाश नित्यशुधु । तुं तुज अंतादिमध्यु । तुं चि पुर्णु ॥२॥
तुं जगमूळ जगव्दिज । तुं चि आधारु तुज । तुझें कारण काज । तुं चि बापा ॥३॥
तुझें स्वरुप गहन । कोण घेतें प्रमाण । देवा जि तुजवाचुन । कांहिं चि नसे ॥४॥
जी हें सर्व तुझें अंग । असें म्यां देषीलें चांग । तुं येकु चि परिग । भुलिसी देसी ॥५॥
तुं विश्वरुप साचार । असें देखे निरंतर । आगा हें तुझें चि शरीर । अनेक जालें ॥६॥
वर्त्तुळ लंब सान वाड । कुब्ज पीन घन रोड । थीर जंगमादि जड । रुप तुझें ॥७॥
नाना नेत्र नाना श्रवण । नाना जिव्हा नाना वदन । नाना दीप्तदर्शन । तुझें बापा ॥८॥
नाना पाणि नाना पाद । नाना शीष्ण नाना गुद । नाना उदरें नाना भेद । अभेद तुझें ॥९॥
अनेक शिराणि रोमणि । अनेक त्वचानेक रुपाणि । अनेक गंधविलेपाणि । अनेक प्रभा ॥१०॥
एवं जगदैक साक्षांत । जगत्प्रकाश जगत्स्फूरित । तो तुं सर्वतंतु सर्वगत । सर्वातर साक्षरुपु ॥११॥
हें तुझें उदार्य चराचर । तुझा चि आंगि साचार । हें हो तुं चि नानाकार । घेउनि अससि ॥१२॥
एवं निदनिस्कंप । देखो तुझें चि स्वरुप । तरी गा आह्मां ही पडप । हें चि होये ॥१३॥
असें रुप नानाकार । जों मि पाहे साकार । तो आश्चर्य थोर । जालें येक ॥१४॥
या स्वरुपा अंतर्गत । देखिलें निर्गुण सदोदित । एवं उभय मिश्रित । तुं चि होसी ॥१५॥
हो हें काई चि प्रगटॆ । दृष्टीसी दृष्टी दाटे । मन चि मन घोटे । असें जालें ॥१६॥
बोधु बोधार्णवीं बुडे । सुख सुखावरी उलंडे । न कळे प्रेम कोडें पाडें । कैसें काय ॥१७॥
वासना सांडीला ठावो । होये व्दैताचा अभावो । सुन्यें साकार देवो । स्वयें दिसे ॥१८॥
तेथ हि केलें विदांन । या उभयातें लोपुन। अदृश दृश्यमान । अतीत होये ॥१९॥
अतीत ह्मणे सर्वसा । तरि येणें चि दाटलिया दीशा । जेथ तेथ जैसा तैसा । हा चि दिसे ॥२०॥
सुन्य म्हणतां सगुण । सगुण ह्मणतां हि निर्गुण । उभया पक्षां विहिन । वेगळा हि नव्हे ॥२१॥
नेणें चि वाये कैसें । या देवाचें रुप दीसे । एकविध बोलतां पिंसें । लागलें बोला ॥२२॥
आतां हा आहे तैसा चि असो । आह्मा काईसा अतिसो । या देवाचें रुप उमसो । न ल्हाउं आह्मिं ॥२३॥
हा कोणें निर्धारें आकलुं तो तो निर्धारु चि होये पांगुलु । कोणें हि भेदें मलु । नलगे यासी ॥२४॥
आता कां साकारु । हा चि सर्व ही साचारु । येथ काय निश्चय धरुं । कोणते निर्धारु । काय निरसुं ॥२५॥
हा सर्वत्रिं साचारु । कोणते यात्रा करुं । कोणतें निर्धारु । रुप याचें ॥२६॥
कोणतें घेऊं दर्शन । कोणाचें करुं भजन । मंत्र स्तोत्र पठण । कोण नेमे ॥२७॥
चालों कोण येक भक्ति । हातिं धरुं कोण येक मुक्ति । हा लाभे असी युक्ति । कोण असे ॥२८॥
येणे देवेंसी असीजे । तै चि विश्रांति पावीजे । नाहि तरी बुडीजे । भवार्णविं ॥२९॥
ये भवादिचे भेदावर्त । केदनार्थ असंख्यात । येथ तारक देवत । ईश्वरु चि हा ॥३०॥
या भेदाचा भावो । आगा आणि हा देवो । तरि गा नमन चि वावो । नसतां दुजें ॥३१॥
तुं सर्वत्र साचारु । राहे मिं तुं हा स्मरु । दुजेंविण नमस्कारु । कोण असे ॥३२॥
तुं चि निश्चय सकळ । जर्‍हिं हे हेतु लाहे बळ । तर्‍हिं हिं नमस्कार निर्मळ । मन मैलें ॥३३॥
देहीं न साहे एतुलें । प्रेम उचंबळे दाटलें । कां जें सीधत्वा हि शोभले । हें चि दिसे ॥३४॥
स्वशरीरा मर्दन । तें भेदां काये लक्षण । इंद्रियें संवादी आण । वपु नव्हे ॥३५॥
भेदु नसतां हि ये तुळें । भावा ये तें चि भलें । येणे न मनें विळसलें । नाहि पूर्ण ॥३६॥
ये परिचें अभिवंदन । हे चि किजे याचे ध्यान । तैं मनाचें उन्मळन । दुजें नाहि ॥३७॥
न लगे वासना जाळावी । ना यें इंद्रियें मारावीं । देह दमनाचि गोवी । न पडे येथें ॥३८॥
हा सहज चि लाहिजे । उपाधि ते काये कीजे । समता बुधी ध्याईजे । या देवातें ॥३९॥
आतां सर्वेसी साचारु । हा चि माझा नमस्कारु । या बुधी पुढारु । सांगों कथा ॥४०॥
असीं देउनि प्रमाणें । उत्तरखंडीचि कथनें । सिध्दि नेउं ज्ञानें । पूर्णतें चेवि ॥४१॥
आतां येथुनि हें चि करुं । सांगों आत्मनिर्धारु । परि देह अंकाचा विस्तारु । आधि दाखउं ॥४२॥
तरि हें आश्चर्य आहे । जें ईश्वरु चि फुटला देहे । अहंतामळें मोहों । विस्तारला तो ॥४३॥
गुरुं ह्मणति शीष्या पाहे । अभिमुख होउनिया राहे । तुज सांगणें आहे । अपूर्व येक ॥४४॥
मध्यखंडिचा विचारु । केला देह अंकाचा नीर्धारु । तो पश्चिममार्गु पूर्वाचारु । मांडला आतां ॥४५॥
मुलिहोनि अग्र पाहीजे । यासी पूर्वमार्गु बोलिजे । अग्रींहोनि मुळ घेईजे । हा पश्चिम मार्गु ॥४६॥
ब्रह्मीहोनि जीवार्थु । गणिजे तो पूर्वपंथु । जीवापासुनि ब्रह्म हेतु । पश्चीमु हा ॥४७॥
जीवीं पूर्व शोधावा । प्राचि आंगें अनुष्टावा । जो ब्रह्मींचा जीउ करावा । ब्रह्मरुपु ॥४८॥
असो जे शंकराची वाणि । तें चि तुं साच मानि । देह अंकाचि मांडनी । परीस आतां ॥४९॥
नवा अंकाचा विस्तारु । विस्तारला जगडंबरु । ते कथा विचारु । संकळीत सांगो ॥५०॥
पूर्वि वस्तु निराकार । नाहि शून्य शरीर । तें पूर्ण निरंतर । नाम रहित ॥५१॥
तेथ पूर्णपणें ईश्वरु । जाला नामासी अधीकारु । परि एकत्वें साचारु । एकु अंकु ॥५२॥
त्या ईश्वरा मिं ह्मणतां । ते चि मुसावली अहंता । दुजें देह उभयता । प्रकृति होति ॥५३॥
त्या माया अविद्या दोनि । येथवरी आदिहोनि । ते हि मिं ह्मणतां तेथुनि । तिजें उठे ॥५४॥
तो सर्वाचें मूळ परमेश्वर । तिजा देहो अहंकारु । येथुनी त्रिपुटी विस्तारु । गुण कर्म देवें ॥५५॥
ते हिं पाहातां आदिनाथा । उठला ऊँ कार चौथा । तो विश्वरुप सर्वथा । अंक देहो ॥५६॥
तेथ चतुर्विध भेद । मात्रा अवस्तवाचा वेद । एवं च्यारि च्यारि सुविद । देखति यातें ॥५७॥
देहीं पाहे पुरुषोत्तमु । तेथ उठला सर्वेश्वरु पंचमु । तो पांचें पंचकेंसी उत्तमु । पंचमा देहो ॥५८॥
यें तों कळलि प्रसिध्यें । असो हें हिं विलोकिलें आनंदें । तो सटा अंकु भेदें । हिरण्यगर्भु प्रगटला ॥५९॥
तेथुनि शडविध सर्व । तत्वें शास्त्रें कर्मे देव । कोश विकार भाव । वोलखावे ॥६०॥
येथहि दे ऊँ घालि दिठि । तो सप्तमु अंकु विराट उठी । सातां सप्तकाचि परीपाटी । असे तेथें ॥६१॥
पातालें व्दीपें स्वर्गें वनें । समुद्र धातु आवरणें । यें सात सात गणनें । आलिं असति ॥६२॥
देहिं पाहातां आदि देवा । उठला खेचराचा मेळावा । ते अष्टयोनि भैरवा । मुख्य करुनी ॥६३॥
हें हिं जो पाहे व्यापकु । तव उठला नवमु जीवांकु । येथ नवंकै विवेकु । थोरु असे ॥६४॥
खंडें व्दारें नाडी गुण । भक्ति भेद देहेंवान । नवप्रकारीं अशन । असे जीवां ॥६५॥
धान्यें त्रुण काष्ट फळ मूळ । मृदा मांस रक्त अमंगळ । प्रत्याकारें सकळ । आहार जीवां ॥६६॥
समर्थ देही देहें भिन्नें । अहंतामलें जालिं क्षीणें । येथ दृष्टांत प्रमाणें । सांगो तुज ॥६७॥
जो जो कार्यासी उमसे । तो तो कारण विभ्रंशे । जेवि पौर्णिमे पासुनि अंवसे । चंद्राचें बिंब ॥६८॥
उठे निज मळु जळा । तो चि करी सेवाळा । तेवि त्या ईश्वरा अमळा । अहंता वाढे ॥६९॥
येकाहोनि येक वाढे । जड होये अति पाडे । जेवि बिजांचें झाडें । विस्तारति ॥७०॥
हेम भूषणांते लाहे । तौ पाति चडे हिन होए । तेवि या परी देहें । मल जडे होती ॥७१॥
दशमदेहो नव्हे पुढें । दशमु अंकुहि न घडे । गुणाकारें बहुतें पाडें । हे चि विस्तारले ॥७२॥
देवो पुढें न घली मन । खुंटला विस्तारु आन । यास्तव जीवा पासुन । जीव होति ॥७३॥
मागीला आंठा हि देहीं । या भुतां असें जन्म नाहीं । माहा प्रळया वांचुनि तेंहीं । नाईकीजे मृत्यु ॥७४॥
पुढें श्रधा नुरे नावा । पन अहंता थारलि आदिदेवा । यास्तव जीवा पासुनि जीवा । विस्तार होति घडे । शीघ्र मृत्यु ॥७६॥
जें होये ज्या पासुनि । ते मूळेंसी ते स्थानीं । आहे पाहे भर्वसेनी । विचारुनि ॥७७॥
प्रकृति अंकु दुसरा । तेथें असनें ईश्वरा । अहंकारु अंकु तीसरा । तेथे देवो प्रकृतिंसि असे ॥७८॥
चौथा देहो वोंकारु । तेथ देवो प्रकृति अहंकारु । या परी विचारु । सर्वाचा असे ॥७९॥
इति अंकदेह उत्पत्तिनिर्धार:॥ऽऽ॥
====
हें पूर्वमार्गिचें चोज । वोजा सांगवलें सबीज । आतां पश्चीमेचें गुज । ते हिं परीस ॥८०॥
प्रथम हें जीवज्ञान । जीवा जीवाचें भजन । त्या जीवयोनी वाचुन । प्राप्ती नाहीं ॥८१॥
दुजें ते खेचराची सेवा । खेचर ए ज्यां भावा । खेचरगति त्या जीवा । भर्वसेनी ॥८२॥
तिजें तें विराटीचें ज्ञान । तीर्थक्षेत्र सेवन । स्वर्गादि पुरे पावन । तया असे ॥८३॥
चौथा हिरण्यगर्भु देव मूर्त्ति । भक्ति भवें जे त्या भजति । त्या प्राणियांते तेची गती । भर्वसेनी ॥८४॥
पंचमा देहिचें भजन । पंचैकृत पंचैकरण । अपवर्ग स्थान । प्राप्त तयां ॥८५॥
षष्टमु तो ऊँ कारु । कळे मातृका विवरु । तैं मोडे अंकुरु । बंध मोक्षाचा ॥८६॥
सातवां तो असा निर्धारु । जाणे त्रिपुठी विवरु । तेणे संस्रुती संसारु । स्वप्रा नये ॥८७॥
प्रकृति तें अष्टम स्थान । हे ज्ञेयज्ञप्तीचें लक्षण । पूर्णस्थितिचें सासन । आंगी बैसे ॥८८॥
नवमु ईश्वरु सर्वसाक्ष । ते हें ब्रह्म अपरोक्ष । तदृप प्रत्यक्ष । होने येथें ॥८९॥
इति पश्चिममार्गु ॥ऽऽ॥
====
पूर्विली खंडें दोनि निरुती । आधि दाखउं उत्पत्ति । पाठिं नेमु सर्व स्थिति । ग्रंथामध्यें ॥९०॥
यावरी प्रळयो दाउन । करुं खंड संपूर्ण । परी येथीचें हें असे ज्ञान । अनारीसें ॥९१॥
उत्पति स्थिति संहारु । ये चि कथनी निर्धार करुं । कां जें ब्रह्मनिरुपण पुढारु । बोलनें असें ॥९२॥
पुढां या कथनापासुन । आहे ब्रह्मनिरुपण । यास्तव सांगो संहरण । ये चि कथनीं ॥९३॥
आतां येकें येक भाजनी । ते आईक चित्त देउनी । या अंकाची मांडणी । मोडोंनि देवों ॥९४॥
भूतें ना मी ह्मणें व्यापकु । तें चि क्षोणि आटे येकु अंकु । तो नवमु भूतजीव समूह सकळैकु । नाशु पावे ॥९५॥
आठवा अंकु ईश्वरें । मी नोहें असें अंकुरे । तो नाशु पावती खेचरें । ते चि क्षेणि ॥९६॥
सप्तमु हा प्रथम देहे । भाविजे तो विराटु मी नोहे । तैं थूळ शरीरे लाहे । नाशु पावे ॥९७॥
नव्हे मी हीरंण्यगर्भु बीजीं उठे । तों सांतुळु येकु आटे । देवो समुदावो तुटे । सूक्ष्म भाग ॥९८॥
हें हिं न करी व्यापकु । तों निघे पाचांतुनि येकु । तत्वविचारु सकळैकु । मोडॆ तेव्हां ॥९९॥
तेव्हां देहां चौ चि उरी । त्यांतु येका चि हेतु सरे ईश्वरीं । तो प्रणवु मातृका विकारी । लोपु पावे ॥१००॥
पाठिं अहंकार देह तिसरें । हे हिं नकारिजे ईश्वरें । तो तें त्रीपुटीं आटे पुरें । उरती दोनी ॥१॥
हे मी ना ह्मणतक्षणी । होये प्रकृतिचि हानी । पाठि उरें निर्वाणि । ईश्वरु तो ॥२॥
तो ईश्वरु साक्षभूतु । सांडी आपली हेतु । तर्‍हिं उरे अतीतु । पूर्णपणें ॥३॥
ये परीचा संसारु । हा तु मानि गा साचारु । या प्रळयाचा निर्धारु । असा आहे ॥४॥
असो तो ईश्वरु चि अकस्मातु । सांडी आपुली चि हेतु । तेव्हां चि पुरे संकेतु । सर्व देहाचा ॥५॥
जैं मुख्य मूळविसरे । तै तो तरु कोठे उरे । ते विश्वरुप नकारे । सर्व ही आटॆ ॥६॥
आनिक तो देवो जेथवरी । उठली देहें नकारीं । हा संहारु तेथवरी । नेमस्त होये ॥७॥
जेथुनि हेतु धरी मागुती । तेथुनि पुढां उत्पत्ति । निर्धारें होए हे निगुती । साच मानि ॥८॥
॥इति अंकदेहप्रलय: ॥ऽऽ॥
====
तिहिं खंडि अनारिसिं । तिं प्रकारि उत्पत्ति कैसी । तुं हे असें मानिसि । तरी आइक सांगों ॥९॥
जेणें जैसें देखिलें । तेणे तैसें चि सांगीतलें । ते बोल देखोनी बोलिलें । आह्मिं येथें ॥१०॥
पाहातां सर्व प्रमाण । तिहिंचे येक चि वचन । कां जें देवाचें मीपण विस्तारले ॥११॥
देवासी मिं ह्मणतां । रुपा ये अहंता । ते चि गुणनिर्मिता । वोळखावी ॥१२॥
तर्‍हिं या सर्वा साचारु । अंतामध्यें ईश्वरु । या रुपाचा आकारु । तें चि ठाईं ॥१३॥
असो येथुनि पुढां सकळ । बोलों येकविध प्रांजळ । हे खंड होईल निर्मळ । निर्धार विशई ॥१४॥
तो सर्वसाक्षात्कारु बोले भैरवाचा कुमरु । कां जें प्रसन्न देवो सिधेश्वरु । शक्ति सहितु ॥१५॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडविवरणे देहांक उत्पन्ननाम प्रथम कथन मिति ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP