उत्तर खंड - अवसानखंडविवरणे

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


सर्वत्र सर्वदा सर्व रिक्तं नैव तु कश्चन ॥
स्वभावस्थ: स्वयं शांत: सर्वात्मा समथेदित: ॥१॥
श्रीगुरुजि निवालों आह्मीं । आजि पुनीत केलें तुह्मीं । जाला सौरसु परब्रह्मीं । सुखावलों ॥१॥
येथ एक कारण । जें वेदाचि दशा प्रमाण । तें दशेंचें वचन । विश्वब्रह्म ॥२॥
ये दशेसी जे आले । जे ये ब्रह्मीं स्थिरावले । ते येहीं लोकीं बोलिलें । वेदबाह्य ॥३॥
वेदु आपुलें महिमानें । जें निरसी नेति वचनें । तें अपुरीं प्रमाणें । मानिलिं जिहिं ॥४॥
ते वेदविद जाले । जे नेति परदसें आले । ते बाह्य येणें बोलें । साच न वटे ॥५॥
हें सर्वहि ब्रह्म आले रुपा । येरु नामभेदु दीपे बापा । तरि हें मज सर्व निक्षेपा । निर्धारें तैसें ॥६॥
॥इति शीष्यप्रश्न ॥
====
तंव गुरु बोले वचन । सर्वा येक चि प्रमाण । जें भेदाचें निरसन । ते चि भले ॥७॥
घॆउनि बैसीजे संसारु । तो हा दीर्घ महत्‍ ज्वरु । येणें देहांति हि नरु । निरोगु नोहे ॥८॥
हा भवदाघु उन्मतु । महा मोहो सन्निपातु । अहंतामाजें बरलातु । रोगरावो हा ॥९॥
सुखदु:ख ज्वरु घामु । आंगी चाले विषमु । उहापुहो अति शर्मु । प्राणियांसी ॥१०॥
यासी त्रिविध उपचार । करुनि होणें निर्ज्वर । तेहि चि होति थोर । पीडाकारक ॥११॥
रोगें पीडलें प्रचंड । वरि कुपाथ्या घाली तोंड । तो रोग नाशे की अखंड । आंगी बैसे ॥१२॥
आध्यात्मिक आधिभूतिक । आनिति जे आधिदैवीक । येणें उपचारें बाधक । हें चि होये ॥१३॥
पूर्ण नसधें पाहीं । तो सुखा पवाड नाहीं । ते हे ताप ह्मणतां कांहीं । वासीपो नये ॥१४॥
नाहिं अजन्मिं अधीकारु । तो निरोग नव्हे नरु । याचा वेगळा विचारु । सांगो आतां ॥१५॥
आध्यात्म देह लक्षण । येथीचें थान मान साधन । हे चि क्षापे तो पूर्ण । आध्यात्मिकु तापु ॥१६॥
देहिचें साधि साधन । चक्रें देवतें थान मान । हें चि मानु प्रमाण । येथें थारे ॥१७॥
एवं भेदबुधी नरु । तो तप्तु निरंतरु । यास्तव हा ज्वरु । प्रथमु होये ॥१८॥
विराटु तो आधिभूत । येथीचे विकार शाश्वत । मानुनि भेदें वर्तत । आधिभूतिक तापु तो हा ॥१९॥
तिर्थें क्षेत्रें कंदरें । सरिता सिंधु सीखरे । दीपें खंडे विवरें । शीला मूर्ति ॥२०॥
असा भेदें भजन करी । तो आधीभूत साचारीं । आध्यात्मता ते शरीरिं । निक्षेपला ॥२१॥
यां सर्वां आधीदैवत । तो हिरण्यगर्भु साक्षांत । येथ भेदरुपें वर्त्तत । आधिदैवक हें ॥२२॥
देवो देवी देवतें । मानुनि घे स्वचित्तें । भेदें तप्तु अधीदैवक यातें । ताप असे ॥२३॥
यासी ह्मणती येक । देवपीडा आधिदैविक । भूतबाधा आधिभूतिक । आध्यात्मिकें नरबाधा ॥२४॥
बोलति येक पुरुष । अधिदैविक देव्यादि जन्मदोश । वातपित्तादि केश । आधिभूतिक तें ॥२५॥
इंद्रिया पीडा आध्यात्मिक । असें बोलती अनेक । परि जें संसारदायक । ते तापु चि ह्मणिजे ॥२६॥
असी सर्व ही साचार । वोढलि त्रिविध परिकार । भेदें तप्त तें चातुरें । ताप कां न ह्मणावे ॥२७॥
आणिक बोलती कोनि येक । देह तें आध्यात्मिक । विकार अधिभूत अधिदैवीक । व्दैत ते तें ॥२८॥
बोला जानति असेंया । तोही अर्थ नवचे वाया । विचारी उभयां । अर्थु येकु ॥२९॥
असें यापरी त्रिविध ताप । येणें नव्हे जे नि:पाप । जेणें प्रकाशे स्वरुप । तें चि भलें ॥३०॥
यासी औषद कारण । भलें सेव्य ब्रह्मज्ञान । भवताप जन्ममरण । नसी तें हे ची ॥३१॥
जैसा समुद्रा अगस्ती । कां महा तमा गभस्ती । किं कुंजराचें मस्ती । मृगराटु ॥३२॥
किं फनिगना खगेश्वरु । किं विघ्रासी नरकुंजरु । कीं वनामध्यें जठरु । सुष त्रुण ॥३३॥
किं उत्बिज जंता सरदि । किं माहा दुखा अमृतोषधि । किं सरीतां वारानिधि । ग्राशी तेवी ॥३४॥
असा संसारतापावरी । ब्रह्मबोधें धन्वंतरी । जो निर्व्याधि नादंनें करी । परब्रह्मी ॥३५॥
आरोग्यता प्रौढपणें । होय ब्रह्मांड ठेंगणें । ब्रह्ममाता रसायेनें । एवढी पुष्टी ॥३६॥
॥इति तापत्रय ॥
====
जालयां हि ब्रह्मज्ञान । याचें त्रिविध लक्षण । ते ही आतां येथुन । सांगीजैल पुढां ॥३७॥
एकाचें व्यतिरिक्त बोलनें । एकी समवेत ब्रह्म घेनें । येकी स्वयें ते ची घेने । निर्धारेंसी ॥३८॥
रिते ज्ञान व्यतिरिक्त । भरलें भासे समवेत । निवाड राहे प्रकाशवंत । यासी ह्मणिजे ॥३९॥
सांगो व्यतिरिक्त ज्ञान । याचें असें लक्षण । जे यां समस्ताहि भिन्न । परब्रह्म तें ॥४०॥
ब्रह्म सर्वाचें मूळ । परी या सर्वाही वेगळें । कदाहि हे सूक्ष्म स्थूळ । ब्रह्म नव्हे ॥४१॥
ब्रह्मांड मुख्य देवते । थावरे जंगमें भूतें । ब्रह्म तया परतें । येथें कैचें ॥४२॥
चौ खानिचे जीव । ब्रह्म नव्हति हे सर्व । मायाचें रुप नाव । केवि होईल ॥४३॥
जीवां जीवात्मा तो चि भिन्न । ते वस्तु होईल कैसेंन । दृम सरिता पाषान । हें चि नव्हे ॥४४॥
प्रतिमा रुपें तीर्थे क्षेत्रें । गीरी वने सींधु पात्रें । ग्रह तारा नक्षत्रें । या वगळें तो ॥४५॥
जळ थळ काष्ट पाषान । या सर्व भीन्न । इंद्रमुख्य देवगन । आरुतें सर्व ॥४६॥
अग्री येमु राक्षस वरुणु । वायु कुबेरु ईशानु । यासी ब्रह्म ह्मणतां सीनु । थोरु असे ॥४७॥
ब्रह्मा हरि शंकरु । विराटु हिरण्यगर्भ सर्वेश्वरु । येथ ब्रह्म नाही हा निर्धारु । असे त्यासी ॥४८॥
भू जल तेज वायो गगन । विकार तत्वें याचें गुण । याहिं परतें कारण । परब्रह्म ॥४९॥
जें जें दिसे तें तें नासे । नासीवंत तें नित्य नसे । हें ब्रह्म नव्हे भर्वसें । ते या अतीत ॥५०॥
जें जें आकारवंत । तें सर्व नासीवंत । तरि देशकाल रहित । तें परब्रह्म ॥५१॥
पाषाना फुटते पल्लव । तैं चि ब्रह्म होतें जिव । हे चित्रिचि रानीव । भोगीजत असे ॥५२॥
वाझें गर्भाचि वेदना । स्वप्र सांपडे जागना । विषा भरता पान्हा । अमृताचा ॥५३॥
किं सगटी वांवुनि न्यावी नदी । किं बैसावे स्वस्कंधी । तैं हें विश्व अनादि । ब्रह्म होये ॥५४॥
अग्री होता शीतलु । कुदांत होता कणवालु । तैं हा सर्व ब्रह्म गोलु । ब्रह्म होती ॥५५॥
सीला वाव्या अंबरी । सूर्यों जिंकावा मछरी । तैं हे सर्व उभारी । दखावें ब्रह्म ॥५६॥
कासवि पान्हां फुटतां । गांधेलि मथु द्रवता । तैं परमात्मा आंतुडता । अपुरां भूतिं ॥५७॥
मृगजळिं पीकति सेतें । वेलु रसें दाटतें । तैं हे सगुणि सांपडतें । शुध्द जें तें ॥५८॥
अमृत नामे विष कंडिका । किं धर्मु ह्मणिजे अंतका । तेवी ब्रह्मनामें सकळैका । आलविति लोक ॥५९॥
मयोरपत्रिचें नयन । तेथ नसे देखणेंपण । तेवि नातुडे भर्वसेन । जगिं ब्रह्म ॥६०॥
ब्रह्म प्रपंचु उभयता । कदाही नव्हे अक्यता । जळा सीळें भीन्नता । तया परी ॥६१॥
आदि वस्तु परात्पर । ते सूक्ष्म सत्यसार । हें जड सविकार । अनित्य अपर ॥६२॥
एवं सर्वेपरी साचें । ब्रह्म नव्हीजे प्रपंचें । जेवी सूत्र सूत्रधार्याचे । ते सूत्रधारी नोहे ॥६३॥
छायामंडपी जेवी । इछा चित्र खेळवी । तो चित्र नोहे तेवी । आत्मा जगी ॥६४॥
आत्मा चाली भूतें । हें सामर्थ्य भूतां असतें । तरी यासी निर्धारें देखीजतें । आत्मरुप ॥६५॥
शशी शीवाचा शीरीं । शोभा पावे निर्धारीं । हो कां तो चि त्यावरी । वळघे कैसा ॥६६॥
तेवी आम्हिं ब्रह्म होनें । तैं कोनासी कोणें जाननें । हें निर्धारें बोलनें । व्यतिरिक्ताचें ॥६७॥
॥इति व्यतिरिक्तज्ञान ॥ऽऽ॥
====
आतां समवेत तें असें । जें हें सर्व ब्रह्म असे । क्षारा फेना जैसें । निवडों नये ॥६८॥
हे सर्व सर्वही भावें । एक चि करुनि घ्यावें । पावकां वेगळे दिवे । निवडति कैसे ॥६९॥
सूताचा ताना जैसा । आंतबाहेर सारिसा । तंतु अखंड तैसा । आत्मा भूतिं ॥७०॥
कां कलोळाचा गाभारिं । जळ चि बाहिर भीतरी । तेवी आत्मा चराचरीं । भेदु कैचा ॥७१॥
किं भांगाराचि वानि । ते चि दिसे सुवर्णि । ना देंसी पुरीं पाटनी । भूमी जैसी ॥७२॥
सर्पि ए चि सर्पिका । अभ्र ते चि अभ्रिका । रंभा ते चि कंचुका । आंगे जालि ॥७३॥
प्रभा आणि उष्णता । सूर्यबिंब उभयता । तेवी ब्रह्मी माया भूता । भेदु नसे ॥७४॥
सर्वही ब्रह्म गोठलें । माया प्रपंच सरले । भरले पुरले उरलें । तें चि सर्व ॥७५॥
जड घन पोकळ । चळ अथवा अचळ । हें ब्रह्म चि सकळ । रुपा आलें ॥७६॥
प्रकृतिचें आकारों । तें चि विवर्त्तलें निर्धारें । माया ब्रह्म दुसरें । गनु नये ॥७७॥
भूतजात प्रसिध । हे ब्र्हम जळिचे बुद्रुध । तेव्हां ब्रह्म प्रपंचू अभेद । कैसैं नव्हे ॥७८॥
रेनु पासुनि ब्रह्म गोळु । महदादि जीव रोळु । हा ब्रह्मदेवो सकळु । रुपा आला ॥७९॥
असा जालया ब्रह्मबोधु । तेणें चि चाले विधि निषेदु । हे ब्रह्म चि हा सन्मंधु । समवेताचा ॥८०॥
॥ इति समवेत ज्ञान ॥
====
यावरी ब्रह्म आंगी बानें । ते चि ब्रह्म स्वयें होनें । ये प्रकाशलक्षणें । सांगो आतां ॥८१॥
जेथ ऐक्य भेदु सांडीं । ज्ञानाज्ञान उलंडी । मार्गामार्गाचि दुथडी । राहे जेथें ॥८२॥
पूर्व पक्षु उत्तर पक्षु । येथ नव्हे प्रत्यक्षु । कां जें सर्वाचा साक्षु । स्वयें होनें ॥८३॥
उडतां पक्षाचें त्राणें । जैं मारिसी सर्मु त्रानें । तै त्या आगें चि कर्मणें । गगन मार्गु ॥८४॥
हां हो ब्रह्म चि स्वयें होनें । तैं कोनां ठाया जाणे । कोणें कोणांसी देखणें । कोणें बुधी ॥८५॥
तरंग केउता धावे । भागारें कोठें असावें । दिपें पावकां पुसावें । कोणें ठाई ॥८६॥
भूमिसी पुसावें पूरी । गंधु गीवसावा कापुरीं । कां निज तंतू अंबरी । घेउ जानें ॥८७॥
सुधा पाहो धावे गोडी । गुलु पाहे गुलाचि गोडी । किं व्योमातें वायो धुंडी । तैसे जाले ॥८८॥
नादु पाहे बोली । वृक्षु पाहे साउली । किं समुद्र आपुली खोली । पाहों जाये ॥८९॥
तेवी आह्मीं ब्रह्म आमतें । आतां धरु कोणे हातें । समवेत कां परतें । कोण उरले ॥९०॥
पाहे ज्याचें आधारें । हे विश्व आहे निर्धारे । ज्याचें आंगें चराचरें । रुपा येते ॥९१॥
हे समस्त भूतजात । ते चि तेणें चळत । तेणें चि त्या चि वरि नांदत । तेणें चि रुपें ॥९२॥
जे सर्वहि विश्व जालें । जे या विश्वामधें दाटलें । या विश्वाहि मध्यें पुरोंनि उरले । पूर्णपणें ॥९३॥
ते ‘ मि ब्रह्म ’ भर्वसेन । तरि विश्वहि नोहे आन । विश्व ब्रह्म आपण । अभेदमात्रें ॥९४॥
जें दाटलें सर्वस । अनुमात्र नाहि ऊँ स । सर्वास्त सर्वप्रकाश । परम तत्वें ॥९५॥
ते पाहि घॆईजे काहिं । तरि घेतें पाहातें आन नाहिं । तें चि तेणेंसी तेही । ते चि सर्व ॥९६॥
पाहों पाहे तो तें चि नयन । बोलों बोले तों ते चि वदना आइकों आइके तो श्रवण । ते चि वस्तु ॥९७॥
या इंद्रियांचें कर्म घेने । तो इंद्रिये नोहति आनें । व्यापारु तोहि तेणें । सर्व होईजे ॥९८॥
मनादिकाचे व्यापार । मनादि तें चि साचार । विषयाचि विकार । तें चि विषय ॥९९॥
असें जो ब्रह्म देखे । तो चि ब्रह्मानंदें तोषे । हा प्रकाशु सुखें । तें चि सुख ॥१००॥
॥इति प्रकाशरुप ज्ञान ॥ऽऽ॥
====
हें सर्वही तेथीचें विकार । परि घेणे पूर्ण साचार । घेतां अपूरें अळंकार । कुबेरु नोहिजे ॥१०१॥
जो आधिकारिं येकें सेति । तो नोहे चक्रवृत्ति । येकें ताथुवें हांति । नयेति दिंडे ॥२॥
सागरींचा चुलु घेतां । काय समुद्रु येइल हातां । घटि गगन पाहातां । नातुडे सर्व ॥३॥
येक चि सित वदनि । घालिता नव्हे धनि । उचारिता येकि वाणि । वेदु नये ॥४॥
घेतां मृतिकेचा गोलु । प्राप्त नोहे हा भूगोळु । तेवि पूर्णते वाचुनि केवळु । संतोशु नसे ॥५॥
तें चि सर्वाकारें जालें । परि अपुरें घेतां नव्हे भलें । काये दीपाचें तेजें देखिलें । ब्रह्मांड होईल ॥६॥
देव ते मुख्य साकारें । सर्वही जंगमें स्थावरें । हे ज्या भूताचें आधारें । तें चि अपूरिं ॥७॥
तें नव्हे भूमि असें कठिण । ना सघन ना स्तंभन । येकदेसी धारण । नसे तया ॥८॥
हें विश्व धरीलें तेणें । परि अध चि नव्हे कोण्हें गुणें । कदा हि भारु अधोगमन । या माहाथूळाचा ॥९॥
आपा सारिखें द्रवन । त्या नाहि अधोगमन । शितळ रसत्व केदन । नसे तया ॥१०॥
स्वेदु रसु त्या नसे । वर्ते सर्वा सारिखें सरिसें । अध उर्ध जैसें तैसें । दाटले दिसे ॥११॥
तें नव्हें तेजा असें उष्ण । न करि कोणाचें दहन । ज्वालु धर्मु रुप गुण । असे चि ना ॥१२॥
तें कोणाही पीडा न करी । नेणें प्रकाशु नां आंधारीं । स्वप्रकाशें चराचरीं । तें चि असे ॥१३॥
तें आंगी नादळे ना प्रेसण । विवर्त्तु गमन ना भ्रमण । ना न करी उचाटण । वायो असें ॥१४॥
तया नसे चळण । उचाटन नां आकर्षण । नेणें मारणें ना रक्षण । प्राणा असें ॥१५॥
नव्हे नभा असें पोकळ । ना शब्दु ना वोफळ । नव्हे येकविध सकळ । देखणें तें चि ॥१६॥
ते व्योमरुपें नोहे । घनदाट दाटलें आहे । जैसें तैसें पाहे । सर्वास्तव तें चि ॥१७॥
तें गिवसेना गगनें । कदाहि न ढळे पवनें । हाक देउन हि दहनें । दाहावें ना तें ॥१८॥
ते न बुडे आपें । न धरवे भूमिचें बापें । तें आप आपणापें । जाणुन घेणें ॥१९॥
हें येकविध सांडोन । घेणें पूर्ण प्रमाण । येणें प्रकाशे आपण । तें चि होणें ॥२०॥
एवं प्रकाशे सर्वत्र । परि बोले नभिजे सुखपात्न । जेणें धाति हें नेत्र । तें चि घेणें ॥२१॥
जो नभाचें पोटीं । पोहोंनि घालि दिठि । त्या हे माझी गोठी । साच जो मानें ॥२२॥
जो समूळ गगनी बुडें । दाटलें देखे चहुंकडे । अखंड तेणेंसि क्रीडे । तें चि होउनि ॥२३॥
यास्तव पुढील कथन । करील भ्रांतिचें मार्जन । ते प्रसंगी लोचन । पूर्ण धाति ॥२४॥
ब्रह्म तें हस्तीचे आमल । ब्रह्मविंदा कौतुहळ । त्रिंबकु ह्मणें तें निर्मळ । पुढां दाउं ॥१२५॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडविवरणे त्रिधाज्ञानबोधो नाम शदम कथन मिति ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP