मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|सुभद्राचंपू| सर्ग पांचवा सुभद्राचंपू सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चौथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सुभद्राचंपू - सर्ग पांचवा निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव सर्ग पांचवा Translation - भाषांतर ॥श्रीकृष्णाय सत्यभामाप्रियाय नम: ॥तालांक तो अंकित त्यासि झाला । काळत्रयीं सेवितसे यतीला । ठेवी तयातें अती गुह्यठायीं । जेथें जनाची गति फार नाहीं ॥१॥पूजी श्रीधर त्या यतीस विभवें ब्रह्मेंद्र ते आपणा ।जैसे पूजिति त्या परीचं करितो पादाब्जप्रक्षाळणा ॥ज्याचें श्रीपदतोय देव शिरसा वंदोनियां तोषती ।तो लक्ष्मीसह पादतोय यतिचें वंदी प्रमोदें अती ॥२॥या रीतीं प्रतिवासरीं करितसे सद्भक्तिनें सेवना ।सायंप्रात अविस्मरेंचि करितो येवोनि सव्दंदना ।अंत: प्रेमरसांतरें प्रतिदिनी भिक्षान्न दे आदरें ।सानंदे अवलोकितां विजय त्या सौख्याब्धि चित्ती भरे ॥३॥ऐसे व्दारवतीनिवास समुदे देखोनि भोजांधकीं ।नाना यादव शूरसेन करिती पूजेसि मोहांध कीं ॥गेले दीस कितेक राम वदतो भावें सुभद्रेप्रती ।बाले भक्तिमती सदां सुविनयें सेवीं त्रिकाळीं यती ॥४॥हा तों पूर्ण विरक्त साधु सुगुणी सद्भर्मवेत्ता असे ।काहींही अणुमात्र दुर्गुण यया स्पर्शीच ना मानसें ॥याचें सेवन तूं करोनि लभसी तो चक्रवर्ती पती ।ऐशा त्या बलभाषणा परिसतां संतोषली सन्मती ॥५॥लागे ते निशिवार भक्तिपरमें भिक्षूचिया सेवना ।त्या कार्यांतचि काळ सर्व खपवी कांहीं न लागे मना ॥काळीं दे जळ शौचमज्जनतृषानाशाथ अत्यादरें ।काषायांबर धौत निर्मल करी कौपीन दे सत्करें ॥६॥यीचें पाहुनि रुप तापितमनीं कंदर्प कांडे व्यथा ।पावे पार्थ म्हणे कधीं हरिन मी साध्वी मना संमता ॥हेही पाहुनि त्या यतीस सुदती आश्चर्य मानी मनीं ।चित्रीं म्यां अवलोकिला विजया तो तद्रूप हाहीं मुनी ॥७॥होता धर्मनृपासंमीप म्हणुनी हेही गिरा ऐकिली ।सेवाअ नित्य करी समीप वसतां ते भीडहीं फीटली ॥तेव्हां ते पुसते यतीस सगुणां संतुष्ट पाहोनियां ।इंद्रप्रस्थपुंरीत धर्मनिकटीं होतां कधीं स्वामिया ॥८॥तुम्ही अर्जुन लक्षिला निजदिठीं आहे बरा कीं सुखी ।त्याचें तें गुणरुप वर्णन करा विश्रांति द्या या मना ।त्याचें श्रीमुखपद्म लक्षिन कधीं वाटे असी कामना ॥९॥तो भेटेल कधीं मला गुणनिधी तो कांत मातें घडो ।आशीर्वाद करा मुला गुरुकृपें मद्भाग्य हें ऊघडो ॥नेच्छी हें मन अर्जुनाविण पती ऐका यती सांगते ।साचें हें तुमच्या पदाब्जयुगळीं मी आण ते वाहतें ॥१०॥ऐशी प्रेमरसांतरा प्रतिदिनी बोले गिरा भामिनी ।जैसें नारदभाषणा परिसिलें आले तसें या मनीं ॥बोले तीप्रति कुंतिभोजकुमरीगर्भाकरींचा मणी ।तेव्हां अर्जुन ऐक वो म्हणतसे पार्थप्रिये कामिनी ॥११॥बंधू पांचसमेत अर्जुन असे संपत्ति कांहीं नसे ।ऐशाचा तरी हेतु काय तुजला त्वां कामिला मानसें ॥पृथ्वीमंडण राजराजमुकुटालंकार चूडामणी ।तो दुर्योधन तूं वरीं सुललने संपत्ति भोगीं जनीं ॥१२॥ज्याचे बांधव सत्पराक्रम पहा दु:शासनासारिखे ।तेही शंभर शंबरारिसम ते रुपें महानेटके ॥माता आणि पिता बहूत कुळही स्वाधीन त्या मेदिनी ।सेनानायक कर्णसैंधव असे साहाय वीराग्रणी ॥१३॥भोगी सांप्रत सर्व हे वसुमती तो चक्रवर्ती असे ।नाहीं त्यासम अन्य भूप दुसरा जो योग्य तूला दिसे ॥हे तों पार्थ पार्थ समर्थ नोहति कदां वित्तें तथा वैभवें ।त्याला तूं वरिसी न तोष तुजला चितांत या संभवे ॥१४॥ऐसें ऐकूनि पार्थभाषण वदे मंदाक्षरें सुंदरी ।तुम्ही जो कथिला सुयोधन पती मीं त्याजला ना वरीं ॥माझा एकचि भाव अर्जुनविन नेच्छी कदां मीं पती ।देवेंद्रादिक अष्ट दिक्पति तरी मीं नांगिकारी यती ॥१५॥होती पांडव पाच साच परि ते पंचाननासारिखे ।एकाहोनि विशेष एक बलधी यांसीं न कोणी तुके ॥एका भीमबलासि शंभर तरी येती न ते साम्यता ।पार्थाच्या धनुटंकरा परिसतां ते पावती मूढता ॥१६॥हे सारे पुरुषार्थवंत जिणती एकेक ते मेदिनी ।पृथ्वीच्या भणगासि पूर्ण करिते आहेति रत्नीं धनीं ॥आतेचा सुत कामसुंदर तसअ कोदंड दीक्षागुरु ।कृष्णाचा अतिमित्र अर्जुन मला सर्व प्रकारें वरु ॥१७॥एकानें द्रुपदात्मजा सकळहीं पृथ्वीभुजांमंडळी ।मच्छा भेदुनि कर्णमुख्य असतां वीरांतरीं जिंतिली ॥जेणें खांडवदाह तो विरचिला देवेंद्रहीं पाहतां ।केलीं आणिक दुष्करें बहुतसीं कर्में सुरांदेखतां ॥१८॥तो हो कां धनहीन संपति नसो कांहीच त्याचे घरीं ।तत्रापी धनदांदिकां न करवे त्या अर्जुनासीं सरी ।ज्याचा मित्र अनंत त्यासि समते देवेंद्रही नातुळे ।तेव्हां पामर कौरवेश्वर कसा दुर्बुध्दि त्यासीं तुळे ॥१९॥सूर्याच्या समतेसि कीटक कसा खद्योत येऊं सके ।झाला पुष्ट अतीव सूकर तर्हीं कैं दिग्गजासी तुके ॥सिंहा श्वान समान होयिल कसा सांगा तुम्ही हें बरें ।त्या उचैश्रवसासि साम्य करिजे कोणा उपायें खरें ॥२०॥शेषासीं अलगर्द येयिल समा कैं कूप ये सागरा ।चांफ्यासीं तरि किंशुकें मग किजे स्पर्धा कसी नागरा ॥जोडावें कमळासि काय सुमनें उन्मत्तवृक्षोद्भवें ।काका कोकिलसाम्यता तरि कसी लोकांत या संभवे ॥२१॥मूर्खालागि सुरेंद्रदेशिक तया पंक्ती कसें आणिजे ।तैसा पार्थसमान केंवि चतुरीं अंधात्मजा मानिजे ।जो सर्वज्ञ बलाढय रुपसगुणी शस्त्रास्त्रवेत्ता जनीं ।त्यासीं कोण तुळेल साच न कळ हे शोधितां मेदिनी ॥२२॥आहे पार्थ तसा सुरांत हरिसा तीर्थांत काशीपुरी ।तेजोवंत तयांत भास्कर तसा, गंगा नदीभीतरीं ॥पाषाणांत मणी, चतुष्पदगुणीं ते कामधेनू गुणी ।पक्षांमाजि समर्थ त्यासि म्हणिजे जो राजहंसाग्रणी ॥२३॥धातूमाजि सुवर्ण त्या वनमृगीं पंचास्य जैसा बळी ।देहीं मस्तक पूज्य चंद्र मिरवे तारागणीं सोज्वळीं ॥माधुर्यांत सुधा, मनुष्यनिवहीं राजा यती आश्रमीं ।यज्ञामाजि तुरंगमेध न तुळे वर्णांत विप्रोत्तमीं ॥२४॥ऐशी सुभद्रामुख - कमळनिर्गत - हंसकलनिनदसमान हंसवाहिनी । एकोनि चतुरतर समाज मुकुटरत्नें कानीं । परम विस्मय मानोनि मनीं । पुन्हां सस्मित सुवचनीं । नारी वचनसरणी पडताळी ॥२५॥ह्मणे तूं पराधीन वो राजबाळी । अत्याग्रही बळिराम महाबळी । निग्रहें सुयोधनासि तुज देयील तयाकाळीं । यत्न काय तुझा चालेल वद वो वेल्हाळी । चातुर्यमणी चंद्रवदने ॥२६॥मायबाप बंधूजन । सर्व वर्तई हलायुधाधीन । तो तंव आग्रही दारुण । तूं तव अबळा सुलीन ।कैसोनि पावसी वीराग्रेसर अर्जुन । अर्जुना अर्जुनवत गणोनि तुज वरील कौरवेश्वरसुयोधन । रामपक्षपातें निश्चयें ॥२७॥तेव्हां वदे सुभद्रासती । सस्मित - विकसित - रदरत्नदीप्ती । मज जरि राम अर्पील दुर्योधना निश्चिती । तदां धाडीन निजपत्रिका पार्थाप्रती । जैशी रुक्मिणी एकांतीं । संदेश - वचनें विप्राहाती । पाठऊनि नेला यादवपती । अंबिकालयीं भूपाळपंक्ती । संनद्भ असतां हंसगती । वरिती झाली कृष्णासि निरगुती । तैसीच मीही पृथानंदन वीर फाल्गुन सुमती । वरीन निश्चिती यतीवर्या ॥२८॥तोही गांडीवधन्वा महाबळी । उडी घालील मज निमित्तें तात्काळीं ।चक्रवाकीसंकटीं अंशुमाळी । कुपेनें उदय करी प्रात:काळीं । तद्वत तमप्राय कौरवमंडळी । मथोनि मज हरील वीरमौळी । तालांकसहित यादवफळी । भेदोनि नेयील सकळीं । अवलोकितां मृगराज स्वभाग बस्तमेळी । हरी तैसा निजप्रतापें ॥२९॥कदाचित न येतां राहील मज उपेक्षून । जरि मम प्राणप्रिय वीर अर्जुन । तरि निजदेहस्थित भूतांश तत्सेवना धाडीन । विभाग जेथील तेथें मेळवीन । प्राण प्राणीं मनीं मन निजजीववृत्तीसहवर्तमान । तेहीं विंदाण परिसिजे ॥३०॥पृथ्वी धाडिन ज्या स्थळीं नर असे पृथ्वीस भेटावया ।आपीं आप मिळेल अर्जुन जया प्राशील तोया तया ॥माझें तेज मिळो तदीय मुकुरीं लक्षी मुखालागुनी ।वायू राहिल तालवृंत उदरीं आकाश त्या आंगणीं ॥३१॥राहे हे तनुमात्र एक वडिलाआधीन सर्पत्वचा ।जैसी ते जड काय तीस करिती रामादि हें निर्वचा ।माझें जीवित साच जाइल यती जेथें अस तो पती ।त्या अंगासि अलिंगितील सहसा हे इंद्रियें निश्चितीं ॥३२॥तेव्हां काय करील राम कथिजे माता पिता कायसीं ।मानी कोण सुहृज्जना विजय तो म्यां कामिला मानसीं ॥आतां एक तुह्मासि मी विनवितें कीजे कृपासागरीं ।चातुर्मास सरेल जाल पुढती त्या इंद्रप्रस्थांतरीं ॥३३॥सांगावें मम मानसांतर तया वीरास अत्यादरें ।यावें तां समयीं स्वयंवर घडे माझें तदां सुंदरें ॥न्यावें तां मज कोटिवीर मथुनी कृष्णें जसी आणिली ।देवी भीमकनंदिनी मज तसें त हीं हरावें बळीं ॥३४॥आहे रैवतकीं मला नवस तो देवीचिया पूजना ।तेव्हां तां हरिजे मला गुणवता वीरांशिरोमंडणा ।हा संकेत तयासि पूर्ण कथिजे तो पार्थ मातें वरीं ।ऐसा हा उपकार पूर्ण करिजे मातें यतीशेखरीं ॥३५॥आले गृहासि अतिथी अतिमानदानें । अत्युत्सवें करुनि पूजन अन्नदानें । केला असेल जरि तोष तया महंतां । तैं पार्थ होयिल मला अनुरुप भर्ता ॥३६॥जे भारपीडित निवारुनि भात त्यांचा । म्यां घेतला असल बोलुनि रम्यवाचा । देखोनियां क्षुधित अन्न दिल्हें तयाला । म्यां पाजिलें असल तोय तृषातुरांला ॥३७॥म्यां दीधली असल ठाव यथेच्छ पांथा । जे उष्ण-शीत -जळपीडित त्यां अनाथा । कष्टी विलोकुनि निवारण कष्ट केले । ते अंध पंगु परिपाळुनि तुष्ट केले ॥३८॥रोगी निरीक्षुनि तयां उपचार केला । ठेवोनियां स्वसदनांतरिं वेळवेळां । देवोनि रोगहर औषध दिव्यमात्रा । धर्मार्थ जाणुनि यथाविध आर्तमाता ॥३९॥केली असेल गुरुवृध्दजनासि पूजा । धर्मासि साह्य करि वेचुनि देह माझा । तीर्थेव्रतें सुनियमें उपवास योग । म्यां अर्जिले असति टाकुनि देहभोग ॥४०॥म्यां दिधलें असल दान अशक्त दीनां । जे कां विपन्न गति ज्यां दुसरी असेना । लोकीं अनेक असती अति सूक्ष्म धर्म । आपूर्त इष्ट म्हणिजे परसौख्य कर्म ॥४१॥निष्काम आचरुनि तोषविला हरी तो । पुण्यें तया वरील पार्थ यथार्थ मीं तो । म्यां पूजिली असल शंभुसती भवानी । तैं तो वरील मज गांडिवचापपाणी ॥४२॥ब्रह्मेश मुख्य मशकांत समस्त भूतें । मानोनि कृष्ण अतिभाव धरोनि त्यातें । म्यां वंदिलें असल जन्मशतीं यती हो । तैं तो धनंजय गुणाढय मला पती हो ॥४३॥ऐशी केवळ एकनिष्ठ घडली माझे स्थळीं हे प्रिया ।चित्तीं जाणुनि सूचवी मग कथा सांगोनि कांहीं तिया ॥ज्यासाठीं धरितेसि हे इतुका तो पार्थ तीर्थाटणा ।गेला टाकुनि आपुली निजपुरी धर्मादि बंधूजना ॥४४॥आला व्दारवतीसमीप विपिनीं ऐसें अम्हीं ऐकिलें ।कृष्णें भेटुनि मंत्र त्यास कथिला संन्यास घॆयीं बळें ॥नेतां तो बळिराम ये निजपुरीं अंत:पुरीं राहिजे ।तव्दाक्यें यदुमंदिरीं वसतसे कोठें तुवां पाहिजे ॥४५॥ऐसें अर्जुनभाषणा परिसतां साशंक चित्तातरीं ।झाली हर्षित मुग्धभाव म्हणुनी कांहीं घडे घाबरी ॥तेव्हां वृत्त समस्त सांग कथितां तैं ते मनीं लाजिली ।आला प्रत्यय पूर्ण सर्व विषयीं जाणॊनि विश्वासली ॥४६॥वंदी पादसरोज फार विनयें साष्टांग भावें सती ।प्रार्थी म्यां तुज नेणतां सलगिनें सेवांतरीं सन्मती ॥केलासे जरि अंतराय तरिहीं कीजे क्षमा वत्सला ।आतां काय वदूं विशेष सगुणा हा देह म्यां अर्पिला ॥४७॥संबोखी अति पार्थ भक्तिमति तूं मत्प्रेम तूं शुध्द तूं ।तूं विज्ञान विवेक शील शुचिता येणें णगुं पूर्ण तूं ।तूझाही मज वेध लागुनि सय आलों अशा संकटें ।जेव्हांपासुनि नारदें निगदिलें मी सर्व सौख्या विटें ॥४८॥ऐसें चित्त परस्परें मिसळलें पुष्पायुधें व्यापिलें ।नेत्रप्रांत विलोकनें स्मितमुखें सस्नेह मोहाकुलें ॥एकाएक निरीक्षणा न करितां कल्पांत होतीं पळें ।याचें अंतर सर्व हृद्रत तया गोविंदजीला कळे ॥४९॥कांहीसें गुज देवकीस कळलें जाणे हरी सांवळा ।कांहीसें वसुदेवहीं उमजला नेणे हळी बाबळा ॥कांहीं यादव मंडळीस कळलें पैं कृष्णमाया असी ।बोलों ना सकती उगेच असती ठेवोनियां मानसीं ॥५०॥चूर्णिका.एकेदिनीं एकांती घनसांवळा । मायाधारी अनंतकळा । हलायुधासि विनवी सद्गुणशीला । माझी हे विनती अवलीला । परिसिजे अत्यंत सोज्वळ । हा त्रिदंडधारी कोठुनि आणिला । तरुण रुपस सकळकळा । त्रिभुवनवनिता देखतां डोळां । तात्काळ होती स्मरविव्हळा । चातुर्यसिंधु परम मला प्रौढ प्रतापी दिसतसे ॥५१॥तथापि वास अंत;पुरी । एकांतीं वसे कन्यकागारीं । परम वैराग्यवंत तरीं । विष्णुमाय देखतां नारी । संयोग सन्निकर्ष पावतां परी । कोण चित्तीं धैर्य करी ऐसा तपस्वी तरीं । विरळ जगीं मीं मानीं ॥५२॥सुभद्रा तारुण्यमदमंडिता ।ते एकांती यतिसेवेमाजि निरता । नियत वसे अखंडिता । जैं तां आज्ञापिली भूभृता । तेव्हांच मज गमली मानसव्यथा । हे गोष्ट उचितीं न पडे पाहतां । परि न बोलूं सकवे तुज समर्था । कूळदूषण सत्कुळप्रसूतां । लोकापवाद लांछन झगटतां । मग न जाय सकळ तीर्थसलिलीं धूता । लोकीं प्रकटली निंद्यता । जगव्दंद्यकुळीं कज्जलप्राय मलिनता । आणों सके हे तात्काळ ॥५३॥घृतभांड अग्रीसमीप । ठेवितां काय न पवे ताप । वायुयोगें प्रदीप । तोही पावेल चळकाप । योगी ज्ञानी तपस्वी निर्विकल्प । असेही कामिनीवाग्जल्प । एकांतीं परिसतां कुसुमायुधप्रताप । न सहोनि भ्रष्टले अमुप । असती ऐकिले परिसिजे ॥५४॥योषिता म्हणिजे मदनज्वाळा । स्वरुपेंधनप्रदीप्त विशाळा । ते पुरुष- चित्त. चंचळ - पतंगकुळा । न जाळितां राहील या बोला । केंवि मानिजे सर्वज्ञ शिखामणी ॥५५॥विश्वामित्रपराशरादिमुनिजन । प्रमदासहवासें पावले चलन । दीर्घ तपासि घडलें विघ्र । अनर्थ उदेला दारुण । इतर पामर मानवां लेखी कोण । देव दैत्य परमबळसंपन्न । परि अबळाविलासें भ्रष्टले । प्राणांत पावोनि नष्टले । सर्व सुकृता वीटले । महावैभवा रुष्टले । नरकदु:खें कष्टले । लोटले अपार संसारसागरीं ॥५६॥अहिल्याकामी पाकशासन । भगांक वाहे आझुण । कळंकी अद्यापि तारारमण । सीताभिलाषें रावण । विसर्जोनि गेला राज्य- प्राण । तिलोत्तमाव्याजें मरण । सुंदोपसुंद पावले दारुण । अन्य राजऋषी गणी कोण । सदाशिव मोहनी विलासगुणें मोहित घडला तेधवां ॥५७॥ब्रह्मा कन्याभिलाषी । धरुं धावें शारदेसी । विष्णु वृदास्मशानवासी । आठवोनि तद्गुण मानसीं । वृंदावनासि नुपेक्षी ॥५८॥अद्यापि महादेव धूर्जटी । गंगा वाहे जटाजूटीं । अर्ध्दांगीं असतां पार्वती कंबुकंठी । पद्मनेत्रा सुवर्ण गोरटी । मोहनांगी प्रियतमा ॥५९॥ऐसे महानुभव जगत्कारण । तेहीं जिंकिले मदनबाणें । पामरां मानवांची धृति वानी कोण । तात्काळ भ्रष्टती नियमापासुन । तूं सर्वतेत्ता प्रवीण । म्यां काय विनविजे अल्पज्ञें अल्पवचनें । तथापि याचा विश्वास मानणें । अयोग्य ऐसें मजवाटे ॥६०॥शील स्वभाव बहुत दिवसां व्यक्त । सहवासियां होती यथास्थित । ते आपातमात्रें न कळत । मनुष्यस्वभाव - गुण असती असंख्यात । अविद्या त्रिगुण जनित । यास्तव विचार करोनि बहुत । संग्रह करितां अप्रमत्त । तरीच सुखावह होयील निश्चित । नातरि कर्म अविचारकृत । प्राणियां हृदयीं आमरणांत । शल्य- तुल्य घडत सर्वज्ञा ॥६१॥परंतु चातुर्मास संकल्पित यतिवरां । स्थानचलन योग्य नव्हे ऐशी श्रुतिगिरा । यास्तव परम सावधपणें अंत; पुरचर- नारीनरां । शासनापूर्वक प्रतिक्षणीं निरीक्षण करिजे धुरा । आंतर विचारा न कळवितां ॥६२॥हें रहस्य तया यतीस न कळविजे । तो क्षोभ पावतां सहजें । सकळ कुळासहित ऐश्वर्य वोजें ।भस्म करील ऐसें समजें । तपोनिधि प्रतापी यतिराणा ॥६३॥एकचि असे विश्वासाचि कारण । युधिष्ठिर ज्ञानवैराग्यसंपन्न । तत्सन्निधानीं ययासि काळहरण । बहूकाळ घडलें म्हणोनि वैराग्यदीप प्रकाशमान । यया हृदयमंदिरीं प्रकाशे ॥६४॥तयासि अनेक - विकल्प - पतंग - पतनें । अथवा प्रमदाविलास - वातस्पर्शनें । तो विझों न सके ऐसें ही मानी माझें मन । याचें पुण्याचरण अवलोकितां ॥६५॥ऐसा श्रीकृष्ण जगन्नाटक - चक्रवर्ती एकांतीं । भाषण करोनि अग्रजाप्रती । पुन्हा मायामोह विचचोनि यती । पूजनी करोनि सादर मती । पूर्वपध्दति यथास्थिति । अंदरसा भाषाणहास्यविनोदभावसानंदप्रीती । अविकळ करवी जगत्कर्ता ॥६६॥इति श्रीसुभद्रास्वयंवरचंपुकाव्ये अर्जुन सुभद्रासंभाषणकृष्णबलभद्रं संवाद स्वाधीनकरणं नाम पंचम : सर्ग: ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP