मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|निरंजन माधव|सुभद्राचंपू| सर्ग पहिला सुभद्राचंपू सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चौथा सर्ग पांचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सुभद्राचंपू - सर्ग पहिला निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे. Tags : niranjan madhavpoemsongकवितागाणीनिरंजन माधव सर्ग पहिला Translation - भाषांतर श्रीसुंदरकृष्णायनम: । श्रीगणेशगुरुशारदाभ्यां नम: ॥वागोरे वामहस्तें धरुनि हय बरे पांडवस्यंदनाचे चार्हीं जो नाचवितो चतुर जिणति जे वेग वातामनाचे ।दक्षें तोत्रांगिकारी नवजलदतनू पीतकौशेयधारी साजे सारथ्यकर्मी नमिन पदयुगीं सादरें श्रीमुरारी ॥१॥ज्याची कथा सबळपातकशैल खाणी । उत्पन्न हे करि जनांप्रति पुण्य़खाणी ।जो भक्तसाह्य करि केवळ पक्षपाती । रक्षी विलोकुनि सुधासम पक्षपातीं ॥२॥तद्भक्तपुण्यचरितें हरिती अघातें, जे कां पळांत परि उद्धरिती जगातें ।तत्रापि पांडुसुतकीर्तन या कळीतें, उच्चारितां मुखपुटें तंव निर्दळीतें ॥३॥गातां भूपति धर्मपुत्र सुजनीं तो धर्म वाढे सदां ध्यातां नित्य वृकोदरा स्थिति नव्हे पापासि तेथें कदा ।कीजे अर्जुनकीर्तना तंव सहा शत्रू स्वयें नासती माद्रीपुत्रयशासि गान करितां रोगा नव्हे तैं गती ॥४॥ज्या सख्यभक्तिविभवें हरि शेषशायीं, स्वाधीन होउनि करी निजपादसायीं ।तो धीर मध्यमणि पांडवरत्नहारीं, ध्यातां धनंजय महाभय घेत हारी ॥५॥त्याच्या विवाहचरिताप्रति मीं कथितों, साहित्यसागर यथामतिनें मथीतों ।जे श्रेष्ठ सद्गुण कवीश्वर वंद्य मातें, त्यांच्या मतानुसरतां न मनीं श्रमातें ॥६॥हे पांडवी परम पुण्य कथा पवित्रा, आकर्णितांचि हरिते अतिदोषमात्रा ।देते अनंत सुकृतासि म्हणोनि यीतें, गातां कुळांसहित पावति सद्गतीतें ॥७॥याकारणें कविनिरंजन याच काजीं, वाणी मनासहित अक्षगणा नियोजी ।श्रीकृष्णभक्तिविभवें गुरुदास्यलेशें, विघ्नाद्रि भंगुनि विराजत नित्य तोषें ॥८॥श्रंगारमुख्य नवहीं रस मूर्तिमंत, काव्यांत या परिसतां दिसती प्रशस्त ।भोक्ता असे यदुपती सकळां रसांचा, झाली म्हणोनि रसिका कविराजवाचा ॥९॥कांही भागवतीं कथाक्रम असे कांही असे भारतीं कांही अन्य पुराणभाव वरिला कांही कवीभारती ।हे सारी ग्रथुनी यथार्थ विरचू सद्रत्नहारावळी कंठी यीस धरील जो चतुर त्या हे शोभवी भूतळीं ॥१०॥चूर्णिका श्रीमद्भागवतीं । शुकमुनीस पुसे परिक्षिती ।अस्मत्पितामही सुभद्रासती । अर्जुनें वरिली कवण्या रिती ॥ते कथा कथन करोनि विश्रांती । मनासि द्यावी महामती ऐसें विनविता कृपामूर्ति । महायोगी सज्जनगती ।परम संतोषें अभिमन्युपुत्राप्रति । कथा कथी कौतुकवती ।जी माजि वीर अर्जुन त्रिदंदीयती । होवोनि वासुदेवी सुदती ।राक्षसविधी हरोनि निगुति ।नेता समयीं बळीराम बलार्णव ।क्रोधानळावेशें पवमानें क्षोभतां ।अती सकळ सुरमंडल चक्रवर्ती ।श्रीकृष्णें विनयें सांतवोनि विधिविधानें यथास्थिती पाणिग्रहण करवोनि इंद्रप्रस्थाप्रती ।पाठवी उत्सवें श्रीपती । ऐसे कथी सविस्तर ॥१॥ऐसाचि जन्मेजय महाप्रवीण । भारत गाथा करितां श्रवण ।व्यासशिष्य वैशंपायन । तयासि प्रेम पुर:सर करी प्रश्न ।स्वामी अर्जुन सुभद्रापाणिग्रहण । कथा म्हणतां मुनिकुलमंडण ।परमानंदें कथन करी ॥१२॥सुभद्रा कृष्णाची बहिण जलजाक्षी शशिमुखी ।जिच्या सौंदर्यातें निरखुनि शचीमुख्य सुमुखी ॥त्यजोनी गर्वातें सतत करिती कीर्तन यिचें ।असी नाही दूजी म्हणुनि अति लावण्य मयिचें ॥१३॥त्यजोनि बाल्यातें तरूण पद अंगी करितसे ।तसीं चिन्हें सारीं अभिनव शरीरीं धरितसे ॥स्ववर्णे हे जिंती सुतनु नवजांबूनदकळा ।कळा आदित्याच्या घडति सहसा तप्त सकळा ॥१४॥सुनीळी भृंगाळीसम अळकजाळी शिरिं धरी ।कपाळीं अर्धेंदूसदृश उपमा सुंदर वरी ॥स्वनेत्रें जिंतोनी अति विमळ तें नीळकमळें ।तया भूयुग्मानीं स्मरधनुषगर्वासि हरिलें ॥१५॥प्रभा गल्लद्वंद्वें सहज अरशाची हरितली ।तिळाच्या पुष्पाचें यश जिणुनि नासा मिरविली ॥सुमुक्ताशुक्ती त्या श्रुति निरखितां मज्जति जळीं ।मुखाब्जा लक्षोनी परम त्यजिला गर्व कमळीं ॥१६॥कसे झाले हीरे कठिण निरखोनी रदवरा ।प्रवाळाही दिल्ही अति अरुणिमा दिव्य अधरा ॥सुधापात्रें दिल्हें अनुपम हनूते निजपदा ।म्हणोनी हे झाले बुधजनमना कारण मुदा ॥१७॥शशी या वक्रत्रातें निरखुनि घडे क्षीण सगळा ।जिणे यीची मंदस्मित रुचि तयाची शुभकळा ॥सुकंठें कंबूची त्रिवळि गतरेखा हरितली ।भुजद्वंद्वीं कैसी कमळलतिका ते झकविली ॥१८॥यिच्या वक्षोजाहीं सरस हरिल्या कंजकळिका ।म्हणोनी कंदर्पा प्रकटविति चित्तीं सकळिका ॥दिसे शामा पोटावरि लघुतरा रोमसरणी ।असे कीं कामाची तरि असिलता जीवहरणी ॥१९॥यिच्या कोशाकारें त्रिवळि दिसती सूक्ष्म उदरीं ।युवाच्या चित्तांतें क्षण न लगतां खंडिति परी ॥सुनिम्रत्वें नाभी वटपुटसमानोदरवरीं ।स्वयें लीला कैसी अमृतरसवापीसम धरी ॥२०॥नितंबातें कुंभस्थळ निरखितां मत्तकरिचे महालज्जेनें ते श्रवति असुणी साचपरिचे ॥तया शुंडादंडा जिणुनि उरुयुग्मीं स्वमहिमा ।जगीं केली तेहीं प्रकट दिसते दिव्य सुषुमा ॥२१॥स्मराच्या तूणातें हरुनि वरजंघा विरचिल्या ।तशा माणिक्याच्या अरुणिमकळा एकवटिल्या ॥पदद्वंद्वे टांचा रचुनि सरळा अंगुळवळी ।विधीनें हे केली सरस धरणीमाजि पुतळी ॥२२॥शरच्चंद्रजोस्त्रा करुनि शकलें तें नखमणी ।घडोनीया केली स्थिति गमतसे रम्य चरणी ॥लता हे हेमाची चतुर चतुराश्यें विरचिली ।धरोनी देहातें अचळ चपला काय घडली ॥२३॥जिच्या आमोदातें परिसुनि अळी गुंजति सदा ।दिसे हेमाब्जाची विधिरचित माळा प्रसुखदा ॥पश्यामध्यें दोनी नयन न समाती, वपुकळा ।महा अंध:कारीं प्रकट करिते दिव्य अबळा ॥२४॥समस्ता अंगांचीं असति जितुकीं लक्षणगणें ।समस्तें ये स्थानीं वसति, न दिसे एकहिं उणें ॥अशा लावण्याची कुशल जगनिर्माणकरिता ।करी नारीमूर्धांमणि रमणि हे देवकिसुता ॥२५॥वपू श्रीकृष्णाची रचुनि उरलें सौष्टव तया ।दिल्हे नारीवेषा कमलभवनें आणुनि दया ॥असें वाटे मातें म्हणुनि हरिणाक्षी नृहरिची ।स्वसा झाली बाळी यदुवरकुळीं साचपरिची ॥२६॥अळंकारें वस्त्राभरणपदकें दिव्यवलयें ।उदारांगी यीच्या करुनि वसती रम्य निलयें ॥त्रिवेणीसी वेणी मणिखचित एणाक्षिणिशिरीं ।दिसे लावण्याच्या निधिवरिल हे नागिण बरी ॥२७॥मयूराच्या पिच्छाकृति अळक आधींच सरळे ।सुगंधा तैलानीं विभौनि जळें शुद्ध धुतले ॥सुवेणीचीं लेणीं वरि विलसलीं माणिकगणीं ।बरी मुक्ताजाळी तदुपरि विराजे बहुगुणी ॥२८॥पहा आधीं केला सरस दिसतो भांग बरवा ।स्मरें लावण्यांभोवनिधिंत कृतसेतू तरि नवा ॥तया रामाहस्तें विरचुनि यशा पात्र घडती ।रवींद्राच्या साम्यें जडित शशिभानू विरचिती ॥२९॥बरें त्या सिंदूरें अरुणपद भांगासि दिधलें ।स्वदीप्तीनें जैसें तम उदित सूर्ये उजळिलें ॥तयासंगे मुक्तासर धवल काळे कच बरे ।त्रिवेणी सौभाग्योदयसहित माथां अवतरे ॥३०॥टिळा कस्तूरीचा रचित असतां भांग तिलकें ।स्वमित्रा भेटाया मग करित बीजे कवतिकें ॥कपोळीं पत्राळी विरचित दिसे केसररसें ।स्वदीप्तीनें शोभा सहज सकळांची हरितसे ॥३१॥पहा आधीं यीचीं नयनयुगळें नीळकमळें ।तयातें हीं शोभे अति निबिड तें काजळ भलें ॥स्मराच्या बाणातें गरळ बरवें माखुनि जसें ।युवांच्या चित्ताचें दळण विधिनें निर्मित दिसे ॥३२॥सुधांशूपूर्णांगीं अरुणसह त्या शुक्रयुगळें ।वसावें या नाकीं मिरवत तसें ठोसर भलें ॥जसें फुल्लाब्जातें लिगटुनि शशीमित्र वसती ।सुताटंकें तैशीं मुखकमळसंगे मिरवती ॥३३॥तयांच्या सामीप्यें ग्रहगण जसे व्यक्त दिसती ।फुलें बाळ्या नाना जडित बुगड्या हीं विलसती ॥मणी पेट्यामाळा मिरवत गळांची गळसरी ।जगीं नाहीं द्यावी अणिक उपमा यांसि दुसरी ॥३४॥म्हणोनी हे कंठी धरित अनुरागेंचि युवति ।यिच्या साम्या कोणी अमरयुवती त्या न पवती ॥गुजे हीं मोत्यांची धरित निजकंठी सुचतुरा ।प्रपंची या नारी परमगुज हें दावित नरा ॥३५॥बरी ल्याली बाळी नवमणियुता दिव्यपदका ।असें दावी यीवांचुनि अणिक देवेंद्रप्रद कां ॥धरोनी चिंता कां तरुणमनिं चिंता उपजवी ।दिवा रात्री त्यातें नियत निजमूर्तीस भजवी ॥३६॥दिसे मुक्ताहार स्तनगिरिशिरी शुभ्र बरवा ।जसा स्वर्गंगेचा उतरत दिसे वोघचि नवा ॥सुमेरुच्या शृंगी गमत मजला याच परिचें ।घनाच्या या धारा धरिति दिसती गंड करिचे ॥३७॥सुवर्णाची वल्ली स्तनफळभरें फार लवली ।न मोडावी ऐशी गणुनि विधिनें युक्त रचिलीं ॥सुरत्नाची कांची सुदृढ विरची बंधन तिला ।सुसूक्ष्मा हे मध्यें ह्मणुनि गमलें साच मतिला ॥३८॥झुणा दाळिंबीच्या अरूणसुमरागा वरितसे ।सुसूक्ष्मत्वें कांही कनकतनुभा आंतुनि दिसे ॥जसी माणिक्याच्या अमल घटिची दीप कळिका ।सुरम्या तैशी हे दिसत अनुपम्या पुतळिका ॥३९॥पदीं मंजीरातें मणिखचित सन्नादित धरी ।झणत्कारें सारें सहज फिरतां मंदिर भरी ॥मुनीचीं हीं चित्तें विकळ घडती ऐकुनि रवा ।भरे तैं कामाचा शर हृदय भेदोनि बरवा ॥४०॥तसे ते पोल्हारे अनवट विरोद्या लघुफुलें ।पदाब्जाच्या संगें करिति यशविस्तार अपुलें ॥समस्ताहोनी हीं मुखर वसती जोडविं पदीं ।न बैसो हे देती नियमितमना निर्गुणपदीं ॥४१॥पदाब्जें आधीं तें किसलय तशीं शोण बरवीं ।तयातें ही आलक्तकरवसरें फार मिरवी ॥ध्वजोर्ध्वा रेखांची दिसति तळवालक्षणगणें ।महाराजेंद्राची घडल महिषी सांगति खुणें ॥४२॥असी नानाभूषाभरित तरुणी कृष्णभगिनीं ॥जिला लाजोनीयां न करि शशि संचार गगनीं ॥सुभद्रा भद्राक्षी भुवनतिलका भर्मलतिका ।भवाची हे मुद्रा भ्रम करित चित्ता सकळिका ॥४३॥सुभद्रा भद्राक्षी कमलरहिता हे जलधिजा ।विना वीणा हस्तीं परमनिपुणा काय विधिजा ॥नसे माथा यीच्या शशिकमल हे काय गिरिजा ।त्रिलोकीं धन्यत्वा वरिल नवरी हेच वरिजा ॥४४॥असी कन्या धन्या त्रिजगजनमान्या सुचरिता ।नव्हे हे सामान्या नवतरुणी कंदर्पभरिता ॥स्पृहा यीची सारे करिति नृपती ऐकुनि गुणा ।न आणी जे पार्थाविण अणिक तो वल्लभ मना ॥४४॥नृपाळांची चित्रें लिहुनि सखिया दाविति तिला ।न मानी कौंतेयाविण अणिक त्या तुच्छ पतिला ॥सदां जे ऐकोनी विजयगुण चित्तांत रुतले ।न जाती ते कांही सखिवचनगंगेंत धुतले ॥४५॥हरी वेत्ता चित्तांतिल कळुनि यीच्या अभिमता ।समर्पावी कुंतीतनुजविजया सद्गुणवता ॥असें योजी, मानें विहित वसुदेवासि बरवें ।तसी माता तेही परिसुनि सुखाब्धींत मिरवे ॥४६॥श्वेतवाहन इला नवराहो । हाच योग्य दुसरा नव राहो ।सर्वहीं सुहृद आप्त जनांही, बोलिजेत असलेंच सदाहीं ॥४७॥इति श्रीमत्कविकुलतिलक निरंजनमाधवविरचिते सुभद्रास्वयंवर चंपू काव्ये स्वरुपश्रृंगारवर्णनं नाम प्रथम: सर्ग ॥१॥ श्रीकृष्णाय नम: ॥ N/A References : N/A Last Updated : February 28, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP