मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरणादी अभंग| १६ ते २० पंचीकरणादी अभंग १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५२ पंचीकरणादी अभंग - १६ ते २० समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ पंचीकरणादी अभंग - १६ ते २० Translation - भाषांतर १६दिसे तें नासल सर्वत्र जाणत । या बोला व्युत्पत्ती काय काज ॥१॥कार्य कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥२॥शाश्वतासी येणें जाणेंचि न घडे । साकार हें मोडे दास म्हणे ॥३॥१७निर्गुणस्वरूपीं मूळमाया जाली । तिच्या पोटीं आली गुणमाया ॥१॥गुणमायेपोटीं जाला सत्वगुण । सत्वीं रजोगुण उद्धवला ॥२॥उद्धवला रजोगुणीं तमोगुण । तमोगुणीं जाण व्योम जालें ॥३॥व्योमापोटीं वायु वायुपोटीं तेज । तेजीं तें सहज आप जालें ॥४॥आपासूनियां भूमंडळ होणें । शात्रींचीं वचनें दास म्हणे ॥५॥१८मायेचें स्वरूप ब्रह्मीं उद्भवलें । तिच्या पोटा आलें महत्तत्व ॥१॥महत्तत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं ॥२॥पोटीं पंचभूतें तमाचिया आलीं । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी ॥३॥१९शून्यापासूनियां जन्म आकाशासी । आकाश वायूसि प्रसवले ॥१॥प्रसवला वायु तया तेज जालें । तेजाचिया आलें पाटआप ॥२॥अपापासुनियां सृष्टि ते जन्मली । ऐसी विस्तारली माया देवी ॥३॥मायादेवी वेळे शून्याकडे पळें । ते काळीं खवळे पंचभूत ॥४॥जें जें जया व्यालें तें तेणें भक्षिलें । अंतीं तें उरलें शून्य एक ॥५॥शून्याचें स्वरूप पाहतां कांहीं नाहीं । तें शून्य सर्वही जेथें आटे ॥६॥आहे हें आटलें त्याचें शून्य जालें । शून्यहि विरालें जे स्वरूपीं ॥७॥स्वरूप पाहातां काळ वेळ गेली । निजठेवी लाधलीं प्राणियासी ॥८॥प्राणीयाचें हित आहे संतांपायीं । वेगीं शरण जायीं आलियातें ॥९॥आलिया रे संतसंगें मुक्त होसी । रामीरामदासीं हेंचि वर्म ॥१०॥२०पृथ्वीतळीं व्याळ व्याळातळीं जळ । त्यातळीं अनळ सत्य जाण ॥१॥सत्य जाण तयातळीं तो अनिळ । त्यतळीं पोकळ व्योम आहे ॥२॥व्योमातळीं अहंकार तो केवळ । तेणें ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥धरियेला पुढे महतत्व असे । सप्तावरण ऐसें निरोपिलें ॥४॥दशगुणीं थोराहुनी थोर एक । हे सप्तकंचुक दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP