मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर अग्रहीच्छिरसा राजन्भगवाँल्लोकपावनः । व्यलिम्पद्दिव्यगन्धेन चन्दनागुरुकुङ्कुमैः ॥२१॥जे कां लोकत्रयपावनी । मस्तकी मिरवी पिनाकपाणी । त्रिपथगामिनी मंदाकिनी । प्रक्षाळवणी ज्या पदींचें ॥४॥असो ज्याचिया नामस्मरणें । अघागेन्द्रां भस्म करणें । त्या श्रीकृष्णें शिरसा धरणें । पदावनेजन विप्राचें ॥२०५॥प्रतिष्ठूनि कनकपीठीं । अर्ची सप्रेमें जगजेठी । अगुरु केशर चंदनघृष्टि । तें चर्ची बोटीं दिव्य गंध ॥६॥प्राणसखा जिवलगमित्र । तत्पूजनीं प्रेमादर । तिलक रेखूनि मनोहर । मलयागर विलेपिला ॥७॥दिव्य सुगंधपरिमळरोळा । अरर्द्र उठीवरी केला उधळा । वरी अर्पिल्या मंदारमाळा । अक्षता सुढाळा शोभविल्या ॥८॥धूपैः सुरभिभिर्मित्रं प्रदीपावलिभिर्मुदा । अर्चित्वावेद्य ताम्बूलं गां च स्वागतमब्रवीत् ॥२२॥सुरवरसेव्य दशाङ्गधूप । अनळीं योजूनि धरी समीप । पोतासप्रमुख बहुविध दीप । करी साक्षेप दीपावळी ॥९॥अमृताहूनि जो विशेष । तैसा नैवेद्य अर्पिला सुरस । गंडूषपात्रीं आंचवणास । देऊनि मुखवास समर्पिला ॥२१०॥रोचक पाचक रसाळ फळें । ताम्बूल दिधला त्रयोदशमेळें । धेनु अर्पूनि मग पुशिलें । स्वागत देवें द्विजा प्रति ॥११॥स्वामि येतां मार्गीं श्रमला । येरु म्हणे दर्शनें श्रम परिहरला । दक्षिणे ठेवूनि तुळसीदळा । करी सोज्वळा नीराजनें ॥१२॥पुष्पाञ्जली वाहूनि मुकुटीं । स्तुतिस्तवनें मधुर गोठी । मस्तक ठेवूनि पादपीठीं । सुखसंतुष्टी पावविला ॥१३॥परम अघटित आश्चर्यकर । घटनापटुतर जगदीश्वर । देखूनि चक्ति विधि शंकर । नरसुरमुनिवरशक्रेंसीं ॥१४॥तें अवधारीं कौरवराया । कोणतें आश्चर्य गमलें तया । मजही उत्साह सांगावया । कारण विस्मया जाणोनी ॥२१५॥कुचैलं मलिनं क्षामं द्विजं धमनिसन्ततम् । देवी पर्यचरद्भैमीचामरव्यजनेन वै ॥२३॥वस्त्रखंडें ग्रथितें जीर्ण । या लागिं कुचैल तो ब्राह्मण । क्षुप्तिपासापीडित दीन । परम म्लान मलिनाङ्ग ॥१६॥केवळ अस्थींचा पांजरा । टळटळीत दिसती शिरा । ऐसियातें व्यजनवारा । घाली सुन्दरा वैदर्भी ॥१७॥जयेचे कृपेचा अपाङ्गपात । व्हावया सुरवर आर्त्तभूत । मुनिवर तपश्चर्यानिरत । जगन्माता भीमकी ते ॥१८॥सर्वाभरणीं विराजमान । दिव्य कनकाम्बर परिधान । रत्नदंडी चामर धरून । वीजी ब्राह्मणा अघटित हें ॥१९॥विस्मय गमला कवणाप्रति । तोही पर्सें परीक्षिती । परमाह्लाद पावोनि चित्तीं । श्रीशुक कथीं तें ऐका ॥२२०॥अन्तःपुरजनो दृष्ट्वा कृष्णेनामलकीर्तिना । विस्मितोऽभूदतिप्रीत्या अवधूतं सभाजितम् ॥२४॥अंतःपुरनिवासिजन । विस्मित जाला तें देखून । केवळ अवधूत ब्राह्मण । श्रीभगवान स्वयें अर्ची ॥२१॥ज्या कृष्णाची अमळ कीर्ति । सनकादि वैकुण्ठभुवनीं गाती । सुरवर मुनिवर निगम प्रभृति । त्रिजगीं स्मरती स्वहितार्थ ॥२२॥तया कृष्णानें ब्राह्मण । अवधूत गूढलिङ्गी पूर्ण । कुचैल म्हणिजे विवर्णवसन । त्यातें पूजून तोषविलें ॥२३॥अमलकीर्ति श्रीकृष्णानें । प्रीतिपूर्वक अंतःकरणें । ब्राह्मणा अवधूता कारणें । अतिसम्मानें पूजिलें ॥२४॥किमनेन कृतं पुण्यमवधूतेन भिक्षुणा । श्रिया हीनेन लोकेऽस्मिन्गर्हितेनाधमेन च ॥२५॥ऐसें देखूनि अंतःपुरीं । निवासनिष्ठा ज्या नरनारी । म्हणती यानें जन्मान्तरीं । सुकृतसामग्री संग्रहिली ॥२२५॥या अवधूत ब्राह्मणें । पूर्वीं जोडिलीं कोण पुण्यें । ऐसियातें कमलारमणें । अतिसम्मानें पूजियलें ॥२६॥केवळ भिकारी भिक्षुक । श्रिया हीन दरिद्री रंक । लोकीं निंद्य जो सकळंक । नीच याचक अधम हा ॥२७॥येणें केलें सुकृत काय । तेणें पुण्यें त्रैलोक्यराय । सम्मानूनि पूजिता होय । परमाश्चर्य हेंचि गमे ॥२८॥शालिग्राम न भजे शंखा । बृहस्पति न भजे मूर्खा । भू न भजे नीच याचका । श्रीनायका अनर्ह हें ॥२९॥श्रीकृष्णाचें स्वरूप काये । तो जा पूजी कवण्या न्यानें । अंतःपुरजन बोलता होये । परमाश्चर्यें तें ऐका ॥२३०॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP