मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर N/Aआस्तेऽधुना द्वारवत्यां भोजवृष्ण्यन्धकेश्वरः । स्मरतः पादकमलमात्मानमपि यच्छति ।किं न्वर्थकामान्भजतो नात्यभीष्टाञ्जगद्गुरुः ॥११॥पुरवी सर्वग सर्वदेशीं । अपर वैकुण्ठक्षीराब्धिवासी । भक्तकारुण्यें सगुणतेसी । अवतारासी अवलंबी ॥४२॥मथुरा गोकुळ वृंदावन । सांडूनि प्रस्तुत द्वारकाभुवन । वसवी यादव कोटिछपन्न । ज्या आधीन वर्तती ॥४३॥यदुकुळाचा जो ईश्वर । वृष्णिभोजान्धकेश्वर । परंतु केवळ परमेश्वर । तो सर्वान्तर जिवासी ॥४४॥पदपंकजातें जो स्मरे । त्याचे मनोरथ पुरवी पुरे । निष्काम भजका अर्पी सारे । विभव इन्दिरेसह आपणा ॥१४५॥छपन्नकोटि यादवपति । संपन्न तव सखा श्रीपति । तुम्ही गेलिया तयापति । समस्त भजती तत्प्रेमें ॥४६॥प्राकृत जे कां सखे मित्र । वोपिती केवळ अर्थमात्र । तैसा नोहे श्रीकलत्र । जो स्वतंत्र सर्वज्ञ ॥४७॥अभीष्टार्थकामातें देती । ते परिपाकीं विरस होती । जगज्जनक जो श्रीपति । भजकांप्रति तें नेदी ॥४८॥रावणाप्रति ऐश्वर्य गहन । देऊनि चकचकी गिरिजारमण । तदुन्मादें दुष्टाचरण । करितां त्रिनयन स्वयें कांपे ॥४९॥घेऊनि वानरीं अवगणीं । सेवूनि हृदयस्थ कोदंडपाणि । रावण वधिला समराङ्गणीं । चक्रपाण न दे तैसा ॥१५०॥रावण कथिला दृष्टान्तमात्र । अभीष्टार्थकामी सर्वत्र । ऐश्वर्य भोगूनि वैरस्यपात्र । न करी श्रीमित्र निजभजकां ॥५१॥स्वात्मान म्हणिजे सच्चित्सुख । वोपी निजभजकां सम्यक । तुमचा सखा तो यदुनायक । जावे आवश्यक त्या भेटी ॥५२॥कदापि सन्मुख न वदे वचना । परम साध्वी द्विजाङ्गना । तिणें इत्यादि मृदुभाषणा । विज्ञापना द्विजा केली ॥५३॥ऐकूनि सतीची विनत विनंती । द्विजें विवरिलें अपुले चित्तीं । तें तें परिसें परीक्षिती । सप्रेम भक्तिपूर्वक पैं ॥५४॥स एवं भार्याया विप्रो बहुशः प्रार्थितो मृदु । अयं हि परमो लाभ उत्तमश्लोकदर्शनम् ॥१२॥सः म्हणिजे तो ब्राह्मण । ऐसा भार्येनें विनवून । बहुतप्रकारें मृदु प्रार्थून । करितां प्रसन्न पैं जाला ॥१५५॥स्त्रियेचें वचन अनर्थप्रद । ऐसें वदती शास्त्रकोविद । सतीच्या वचनें मज मुकुन्द । दर्शनानंद हा लाभ ॥५६॥द्रविणाभिलाष राहो परता । हाचि परम लाभ तत्वता । उत्तमश्लोकदर्शन होतां । मम सुकृता साफल्य ॥५७॥स्त्री पुत्र कां सत्सेवक । अथवा अपर कोण्ही एव्क । प्रबोधिती सद्विवेक । तो आवश्यक स्वीकरिजे ॥५८॥ऐसा विचार करूनि मनीं । उदित जाहला कृष्णदर्शनीं । तें तूं कौरवचूडामणी । सावध कर्णीं अवधारीं ॥५९॥इति संचिंत्य मनसा गमनाय मतिं दधे । अप्यस्त्युपायनं किंचिद् गृहे कल्याणि दीयताम् ॥१३॥ऐसें चिन्तुनी निज मानसीं । बुद्धि अवलंबिली गमनासी । मग म्हणे वो कल्याणराशी । कृष्णभेटीसी काय नेऊं ॥१६०॥अल्पस्वल्प कांहीं सदनीं । हरीसी अर्पावया लागूनी । जरी असेल तरी कल्याणी । देईं आणूनि मजपासीं ॥६१॥ऐसें ऐकूनि द्विजाचें वचन । संतोषलें सतीचें मन । म्हणे मम विनती केली मान्य । परम धन्य दैवरेखा ॥६२॥आजिचा दिवस कल्याणकर । म्हणूनि स्फुरला मज विचार । ब्राह्मणें केला अंगीकार । उठिला सत्वर संतोषें ॥६३॥याचित्वा चतुरो मुष्टीन्विप्रान्पृथुकतण्डुलान् । चैलखण्डेन तान्बध्वा भर्त्रे प्रादादुपायनम् ॥१४॥मग ते विप्राची सुन्दरी । प्रवेशली विप्रां घरीं । पोहे मागूनि मुष्टी चारी । जर्जराम्बरीं बांधूनियां ॥६४॥श्रीकृष्णासी उपायन । दिधलें कान्ता पें आणून । तेणें घेतलें संतोषून । मग प्रयाण आरंभिलें ॥१६५॥स तानादाय विप्राग्र्यः प्रययौ द्वारकां किल । कृष्णसन्दरशनं मह्यं कथं स्यादिति चिन्तयन् ॥१५॥सदा संतुष्ट अंतःकरणीं । या लागिं म्हणिजे विप्राग्रणी । मग तो पृथुकांतें घेऊनी । द्वारकेलागूनि चालिला ॥६६॥चैलखंडें ग्रथित पृथुक । घेऊनि चालिला उदड्मुख । कार्यसिद्धीचे सूचक । शकुन सम्यक त्या जाले ॥६७॥दृढ निश्चल किल अव्ययीं । पतिव्रतेनें मानिला हृदयीं । विप्रा भेटेल शेषशायी । संशय नाहीं यदर्थीं ॥६८॥ऐसा लाभ लक्षूनि शकुना । विप्रप्रियेनें मानिला मना । मग ते परतोनि गेली सदना । पुढें प्रयाणा करी द्विज ॥६९॥पदोपदीं द्विज चालतां । हृदयामाजी करी चिन्ता । बरव्या प्रकारें कृष्णनाथा । मज भेटविता कोण असे ॥१७०॥सम्यक म्हणिजे बरव्या परी । मज कारणें कैसा हरी । भेटेल हें अभ्यंतरीं । चिन्तन करी पदोपदीं ॥७१॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP