मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर कृष्णः परिजनं प्राह भगवान्देवकीसुतः । ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजन्याननुशिक्षयन् ॥३१॥कृष्णाज्ञेनें जो जन वर्ते । परिजन ऐसें म्हणिजे त्यातें । भगवान बोलता झाला तेथें । त्या सर्वांतें कळावया ॥२४०॥दैवी संपत्तीमाजी संभव । यालागीं देवकीसुत हें नांव । एर्हवीं केवळ ब्रह्मण्यदेव । धर्मस्थापक धर्मात्मा ॥४१॥राजन्य म्हणीजे भूपाळगणां । शिकवणेच्या बोले वचना । तें तूं ऐकें कुरुभूषणा । मात्स्यीरमणा परीक्षिति ॥४२॥दुर्जरं बत ब्रह्मस्वं भुक्तमग्नेर्मनागपि । तेजीयसोऽपि किमुत राज्ञामीश्वरमानिनाम् ॥३२॥बत ऐसिया खेदेंकरून । परमाश्चर्यें चमत्कारून । सामंत राजे प्रजाजन । बोले भगवान शिकवण त्यां ॥४३॥स्व ऐसें धनाचें नांव । तें मृच्चर्माम्बरलोहादि सर्व । रस औषधि विषय वैभव । जें कवळी जीव आत्मत्वें ॥४४॥मृत्तिका म्हणिजे क्षेत्रवृत्ति । चर्म म्हणिजे हयगोहस्ती । अंबरें म्हणिजे आच्छादनार्थीं । वसनजाति उच्चावच ॥२४५॥अष्टलोह मुद्राभाजनें । गोरस मधु आसव पानें । औषधि म्हणिजे अनेक धान्यें । विषयविभव तें मान्यत्व ॥४६॥एवं स्वशब्दें हें आघवें । ब्रह्मस्व ब्राह्मणाचें जाणावें । बलात्कारें कोणा जिरवे । ऐसा नाठवे त्रिकाळीं ॥४७॥सर्वभक्ष अग्नीसि नांव । तया न जिरवे ब्रह्मस्व । तेजिष्ठाहूनि विशेष गौरव । तेजिष्ठत्व विप्राचें ॥४८॥बृहस्पतीचें चर्मधन । चंद्रें केलें ताराहरण । तो क्षयरोगें झाला रुग्ण । सलांछन अद्यापि ॥४९॥विष्णु साक्षात् परशुराम । क्षत्रकुळांचा करूनि होम । पृथ्वीदानें द्विजोत्तम । पूर्णकामें तोषविले ॥२५०॥पुन्हा पदीं संलग्न माती । दत्तापहरनदोषावाप्ति । बह्मस्वग्रहणीं भावूनि भीति । याचिली क्षिति रत्नाकरा ॥५१॥शिवें करितां ब्रह्मस्वहरण । तत्काळ पावला लिंगपतन । भगाङ्कित झाला संक्रंदन । सहस्रनयन द्विजरोषें ॥५२॥ऐसी ब्रह्मादिकांची कथा । तेथ क्षत्रियां अभिमानवंतां । ब्रह्मस्व न जिरे ऐसें म्हणतां । काय अपूर्व मानावें ॥५३॥आम्ही राजे नरेश्वर । ऐसा वाहती जे अहंकार । ब्रह्मस्वहरणीं नरक घोर । पावती दुस्तर पितरेंसीं ॥५४॥जमदग्नीची यज्ञधेनु । नेली कार्तवीर्यें हरून । यास्तव क्षत्रकुळनिर्दळन । पावला मरण जगज्जेता ॥२५५॥स्वतेजें अग्नि त्रिजग जाळी । तो ब्रह्मस्वा कांपे चळीं । तेजिष्ठाहूनि महाबळी । म्हणे वनमाळी ब्रह्मस्व ॥५६॥गरुडें गिळितां निषादगण । त्यामाजी गिळितां एक ब्राह्मण । न गिळवे कंठीं पोळला पूर्ण । मग उगळून टाकिला ॥५७॥ऐसें एकैक सांगों किती । ब्रह्मस्व गिळावयाची शक्ति । कोणा आंगीं न दिसे पुरती । म्हणे श्रीपति स्वजनांतें ॥५८॥नाहं हालाहलं मन्ये विषं यस्य प्रतिक्रिया । ब्रह्मस्वं हि विषं प्रोक्तं नास्य पतिविधिर्भुवि ॥३३॥सागरसंभव हाळाहळ । तें मी न मनीं विष प्रबळ । अमृतादि ओषधि उतार बहळ । केलिया तत्काळ तें निरसे ॥५९॥हाळाहळहूनि विषतर । तें ब्रह्मस्वचि महाक्रूर । ज्याची न चलेचि प्रतिकार । निर्जर विधि हर करितांही ॥२६०॥केतुलें विषाचें कठिनपण । तेंही ऐक करितों कथन । ब्रह्मस्व विषाहूनि दारुण । तें लक्षण अवधारा ॥६१॥हिनस्ति विषमत्तारं वह्निरद्भिः प्रशाम्यति । कुलं समूलं दहति ब्रह्मस्वारणिपावकः ॥३४॥विष मारक विषभक्षका । त्याचेनि न मारवेचि आणिका । अग्नि दाहक सांसर्गिका । न जळे पावका अस्पृष्ट ॥६२॥विष सेवणारा मात्र मरे । परंतु पूर्वापर वंश उरे । ब्रह्मस्वारणिजपापाङ्गारें । कुळचि संहरे संपूर्ण ॥६३॥दावानळें तृणादि जळती । समूळ न जाळी तो त्यांप्रति । मूळां रक्षण करी क्षिति । पुन्हा उत्पत्ति त्यां होय ॥६४॥ब्रह्मस्वारणिजपावक दाही । तेथूनि मूळाचें उरणें नाहीं । समूळ प्रवर्ते कुळक्षयीं । ब्रह्मादिकांही अनावर ॥२६५॥विष भक्षितां व्यापी तनु । तेणें तनूचें होय पतन । मग तो स्वकृत पाप पुण्य । भोगी जन्मोन यथोचित ॥६६॥तैसा नव्हे ब्रह्मस्वहर्ता । नरकीं कुळाचें पतनकर्ता । कृतपुण्याची नुरे वार्ता । दोष पर्वतासम वाटे ॥६७॥कुळेंसहित अंधतमीं । पडे घोर नरकीं दुर्गमीं । चंद्रसूर्य भ्रमती व्योमीं । नरकीं कृमि तोंवरी तो ॥६८॥जळें पावक प्रशम पावे । ब्रह्मस्वारणिज तैसा नव्हे । हें सर्वांसी असो ठावें । विशेष जाणावें मामकीं ॥६९॥ऐसें सांगूनि साधारण । यावरी कथी व्यवस्थाकथन । तें सज्जनीं कीजे श्रवण । सावधान होवोनियां ॥२७०॥ब्रह्मस्वं दुरनुज्ञातं भुक्तं हंति त्रिपूरुषम् । प्रसह्यातिबलाद्भुक्तं दश पूर्वान्दशापरान् ॥३५॥दुरनुज्ञात जें ब्रह्मस्व । स्त्रीपुरुषांचा पुसी ठाव । दुरनुज्ञात कासया नांव । तोही भाव अवधारा ॥७१॥काळनियम काळान्तरनियम । सत्यप्रतिज्ञापत्रीं नाम । घालूनि ब्रह्मस्व नेदी अधम । दुरनुज्ञात तें म्हणिजे ॥७२॥ऐसिया ब्रह्मस्व बुडविणारा । पुत्रपौत्रेंसीं यातना घोरा । आणि जो करूनि बलात्कारा । ब्रह्मस्वहर्ता दुरात्मा ॥७३॥पितृपितामहादि पूर्वजदशक । पुत्रपौत्रादि अपर दशक । तयांसहित एकवीस पुरुष । कुंभीपाक भोगिते ॥७४॥बलात्कारें ब्रह्मस्वहरण । तस्करावीण करील कोण । म्हणाल तरी तें करा श्रवण । म्हणे भगवान स्वजनातें ॥२७५॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP