मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६४ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ६४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६४ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर कस्यचिद्द्विजमुख्यस्य भ्रष्टा गौर्मम गोधने । संपृक्ताऽविदुषा सा च मया दत्ता द्विजातये ॥१६॥कोणी एक विप्राग्रणी । वेदविहितकर्माचरणी । निवृत्त प्रतिग्रहापासुनी । प्रारब्धक्षेपणी मोक्षेच्छु ॥३॥ऐसिया विप्रमुख्याप्रति । प्रार्थूनियां विनयभक्ती । पूर्वोक्त धेनु अर्पिली निगुती । आश्रमा नेतां तो तीतें ॥४॥मार्गी नेतां तरुण धेनु । कळपाविहीन पारिके रान । देखूनि पळाली त्यापासून । मम गोधनीं पुन्हां आली ॥१०५॥मज हें कळलें नसतां कांहीं । म्यां ते धेनु दावप्रवाहीं । आणिका ब्राह्मणा दिधलीं पाहीं । स्वाश्रमा तोही ते नेतां ॥६॥पूर्वीं जयासी दिधली दान । मार्गीं भेटला तो ब्राह्मण । तेणें आणिला तो पडखळून । चोर म्हणून मजपाशीं ॥७॥तां नीयमानां तत्स्वामी दृष्ट्वोवाच ममेति तम् । ममेति प्रतिग्राह्याह नृगो मे दत्तवानिति ॥१७॥पूर्व ब्राह्मण म्हणे हे माझी । नृगें मज दिधली द्विजसमाजीं । द्वितीय म्हणे प्रत्यक्ष आजी । दान घेतलें म्या ईचें ॥८॥हस्तींचें वाळलें नाहीं जळ । कंठीं नृपार्पितसुमनमाळ । ललाटीं आर्द्र गंध केवळ । चौर्यशील केंवि माझें ॥९॥ऐसें ब्राह्मण परस्परें । भांडतां वदती परुषोत्तरें । आपण निर्दोष ऐसे खरें । प्रतिपादविती तें ऐका ॥११०॥विप्रौ विवदमानौ मामूचतुः स्वार्थसाधकौ । भवान्दाताऽपहर्तेति तच्छ्रुत्वा मेऽभवद्भ्रमः ॥१८॥साधावया आपुला स्वार्थ । दोघे कथिती निज वृत्तान्त । तूं दाता कीं हर्ता येथ । हें ऐकोनि भ्रान्त मी झालों ॥११॥माझे धेनूचें अपहरण । केलें म्हणे पूर्व ब्राह्मण । दुजा म्हणे मीं घेतलें दान । मध्यें कोण तस्कर हा ॥१२॥पूर्व ब्राह्मण म्हणे तूं तस्कर । माझे धेनूचा अपहार । करूनि दातृत्व मिरविसी थोर । पापाचार हा राया ॥१३॥दुजा म्हणे तूं दानशूर । स्वधनें संपन्न जेंवि कुबेर । तुज हा ब्राह्मण म्हणे तस्कर । मूर्ख पामर मतिमंद ॥१४॥पहिला म्हणे धेनूसाठीं । नृपाची भाटींव करिसी वोठीं । ब्रह्मस्वहरणीं बुद्धि खोटी । दुष्ट कपटी हा राजा ॥११५॥ऐसे ब्राह्मण भांडती निकरें । ऐकोनि तयांचीं क्रूरोत्तरें । भ्रमें माझें चित्त घाबरें । बुद्धि न थरे स्वस्थानीं ॥१६॥सुकृताचरणीं विघ्नघाला । स्वधर्मकरिता अधर्म घडला । कांहीं बोलों न शकें बोला । शरण विप्रांला मग आलों ॥१७॥ग्लानिपूर्वक दण्डवतीं । विप्रां केली विनीत विनति । तेही अल्पसी यथामति । कथितों श्रीपति अवधारीं ॥१८॥अनुनीतावुभौ विप्रौ धर्मकृच्छ्रगतेन वै । गवां लक्षं प्रकृष्टानां दास्याम्येषा प्रदीयताम् ॥१९॥विनयें दोघांही द्विजांप्रति । प्रार्थना केली बहुतां रीती । परि ते न मनूनि माझी विनती । आग्रहाप्रति वश्य झाले ॥१९॥मग ऐकैका पृथक्पृथक । करुणा भाकिली जरी सम्यक । तरी नायकतीच ते विवेक । क्रोधोन्मुख प्रज्वळले ॥१२०॥मग प्रथम विप्राप्रति । लक्ष धेनु निष्क्रयार्थी । अर्पूनि पूर्व याचिली निगुती । परि तो विनती न मनीच ॥२१॥मग द्वितीय बाह्मणा प्रार्थना केली । लक्ष धेनु घेऊनि पहिली । ज्याची त्यासी देवविली । तो हे बोली न मनीच ॥२२॥एसें जाणोनि अतिसंकट । दुःखें दाटला माझा कंठ । पुढती चरणीं ठेवूनि मुकुट । प्रार्थिले वरिष्ठ द्विजवर्य ॥२३॥भवंतावनुगृह्णीतां किंकरस्याऽविजानतः । समुद्धरतं मां कृच्छ्रात्पतंतं निरयेऽशुचौ ॥२०॥तुम्ही दोघेही कृपावंत । अनुग्रहें कीजे मज सनाथ । किंकराचा अपराध बहुत । क्षमावंतीं क्षमावा ॥२४॥नेणतां घडलें हें अनुचित । क्षमा करणें तुम्हांसि उचित । नरकीं पडतों मी अनाथ । येथूनि मातें उद्धरिजे ॥१२५॥अशुचि नरक अंधतम । तेथ पडतों मी अज्ञान अधम । कृपावंत होवोनि परम । मातें निस्सीम उद्धरावें ॥२६॥अनवधानतेमाजी ऐसें । संकट प्राप्त झालें असे । तुम्हीं सुकृतेरं सदयमानसें । मज दातासें तारावें ॥२७॥ऐसे ब्राह्मण नानापरी । प्रार्थिले असतां मधुरोत्तरीं । जे बोलिले प्रत्युत्तरीं । तें अवधारीं जगदीशा ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP