मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५६ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५६ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर किं कृत्वा साधु मह्यं स्यान्न शपेद्वा जनो यथा । अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपम् ॥४१॥म्हणे सुशीले शुभानने । हृद्गत जाणसी सर्वाभिज्ञे । मम माथांचीं दुर्लाच्छनें । उपायें कोणें निवारती ॥१२॥कोणतें कर्म केलें असतां । कृपा उपजेल कृष्णनाथा । जनपद दोष न ठेवी माथां । मज देखतां न नोकिती ॥१३॥माझें देखोनियां वदन । अदीर्घद्रष्टा न म्हणती जन । बुद्धिमंद विचारहीन । पामर कृपण मूर्ख ऐसें ॥१४॥इतुके दोष माझ्या ठायीं । जनीं पकटचि दिसती पाहीं । मणिसंग्रहें परमान्ययी । धनलोलुप जन म्हणती ॥४१५॥इतुक्या दोषांच्या निरसना । एक विचार स्फुरला मना । जरी मी निस्तरें येणें व्यसना । तरी मज आज्ञा देईं पां ॥१६॥मग तो विचार कान्तेपासीं । निर्धारूनि निजमानसीं । सांगता झाला तें नृपासी । सांगे महर्षि शुक योगी ॥१७॥दास्ये दुहितरं तस्मै स्त्रीरत्नं रत्नमेव च । उपायोऽयं समीचीनस्तस्य शान्तिर्न चान्यथा ॥४२॥जेंवि जाम्बवतें आपण । कन्यादानीं मणि आंदण । देऊनि केलें समाधान । तैसेंचि लांछन निरसावें ॥१८॥आपुली कन्या सत्यभामा । उपवर सुन्दर सद्गुणसीमा । हे आर्पूनि मेघःश्यामा । दोषकाळीमा क्षाळावी ॥१९॥सत्यभामेच्या पाणिग्रहणीं । आंदणा दीजे स्यमंतकमणि । धनलोभी हे सदोष वाणी । येथोनि कोणी न बोलती ॥४२०॥सत्राजितें या विवेकोत्तरीं । पुशिले असतां निज अंतुरी । बोलती तें परिसिजे चतुरीं । शुकवैखरी श्लोकार्थें ॥२१॥कामिनी म्हणे उत्तमोत्तम । समीचीन हा उपाय परम । तया दोषाचें लांछनतम । याविण शम हो न शके ॥२२॥यावीण आन उपायकोटि । करितां कृतागसत्वकुटी । न वचे बैसली जे ललाटीं । यावत् घरटी रविचंद्रां ॥२३॥यालागीं हाचि उपाय सार । सौभग्यनाथा केजे सधर । हे ऐकोनियां सुविचार । झाला तत्पर सत्राजित ॥२४॥एवं व्यवसितो बुद्ध्यासत्राजित्स्वसुतां शुभाम् । मणिं च स्वयमुद्यम्य कृष्णायोपजहार ह ॥४३॥कोणासी मध्यस्थ करूनियां । वृत्तान्त कथिजे यादवराया । विवरितां ऐसिया उपाया । तव प्रसंगें समया अनुसरला ॥४२५॥म्हणाल प्रसंग कैसा कवण । तरी शंबरासुरातें मारून । रतिसहित द्वारकाभुवन । जेव्हां प्रद्युम्न प्रवेशला ॥२६॥द्वारकावासी लहानथोर । प्रवेशले तैं हरिमंदिर । तयाचित्राजी कृतविचार । सत्राजितही स्वयें आला ॥२७॥प्रद्युम्नागमनोत्साहो । सर्वत्र द्वारकावासियां स्नेहो । तयाचि प्रसंगामाजि लाहो । सत्राजितेंही साधियला ॥२८॥नमूनि उग्रसेना राजया । वसुदेवप्रमुखां भगवत्प्रिया । देवकीजनका देवकराया - । पासीं वृत्तान्त निवेदिला ॥२९॥करी धरूनि एकान्तासी । नेऊनि सांगे देवकापासीं । म्हणे माझिये निजमानसीं । गोष्टी ऐसी आवडतसे ॥४३०॥सत्यभामा हे माझी दुहिता । उपवर सुन्दर सद्गुणभरिता । दैवविधानें कृष्णनाथा । पाणिग्रहणीं अर्पावी ॥३१॥विवरूनि नृपेंसीं हें मात । प्रार्थूनि वसुदेव कृष्णनाथ । हीन दीन मी अनाथ । कीजे सनाथ कृपेनें ॥३२॥देवकें रायासी कथिली मात । तेणें वसुदेव कृष्णनाथ । पाचारूनि हा वृत्तान्त । सत्राजितोक्त त्या कथिला ॥३३॥कृतागसत्वें व्रीडावान । आपुला सुहृद अनन्य शरण । त्यासी कृपेनें सनाथ करून । कन्यारत्न स्वकीजे ॥३४॥येऊनि स्वमुखें करुणा भाकी । याहूनि कोण ते कीर्ति लोकीं । स्नेहगौरवें विश्वासमुखीं । सुहृद कौतुकें रंजविजे ॥४३५॥हेंचि श्रेष्ठत्वा भूषण । सुहृद आप्त हीन दीन । कृतागसही झालिया शरण । आपणासमान त्या केजे ॥३६॥ऐसें उग्रसेन भूपति । स्वमुखें बोधी धर्मनीति । सादर परिसोनि रुक्मिणीपति । ऐकिलें म्हणती जनकातें ॥३७॥वसुदेव आणि संकर्षण । म्हणती नृपाज्ञा कीजे मान्य । सोयरा सत्राजित प्राचीन । दुहिता प्रार्थून अर्पित ॥३८॥ऐसें विवरूनि नृपानिकटीं । सत्राजिताची मानिली गोठी । मग ब्राह्मविवाहपरिपाटीं । केली राहाटी लग्नाची ॥३९॥ऐसा निश्चय स्वबुद्धीकरून । सत्राजितें दुहितारत्न । कृष्णाकारणें कन्यादान । विधिविधानें समर्पिलें ॥४४०॥विधिविधान सविस्तर । कथितां वाढेल ग्रंथ फार । यालागीं शुकोक्तश्लोकानुसार । चमत्कार हा कथिल ॥४१॥सत्यभामेच्या पाणिग्रहणीं । आंदण दिधला स्यमंतकमणि । एवं सुभगा लावण्यखाणी । चक्रपाणिप्रिय झाली ॥४२॥ऐसा सत्राजितें विवेक । रचूनि केली सोयरिक । लोकापवादाचा कलंक । क्षाळूनि शशाङ्कसम झाला ॥४३॥स्वमुखें करूनियां प्रार्थन । सहितमणीसीं कन्यादान । देऊनि परिमार्जी लांछन । तथापि विघ्न उरलेंसे ॥४४॥यालागीं ऐश्वर्यपदींचा अर्थ । तो इतरांसी महदनर्थ । तदर्थ प्राकृत धरिती स्वार्थ । त्यांतें व्यर्थ श्रम ऐसे ॥४४५॥सर्वज्ञ पूर्वींच हें जाणती । म्हणोनि न होती विषयस्वार्थी । कन्यकास्यमंतकांची प्राप्ति । होतां श्रीपति अक्षुब्ध ॥४६॥कन्यारत्न स्यमंतकरत्न । दोह्नी जोडतांहे श्रीकृष्ण । तयांमाजी अंगीकरण । करी न करी तें ऐका ॥४७॥तां सत्यभामा भगवानुपयेमे यथाविधि । बहुभिर्याचितां शीलरूपौदार्यगुणान्विताम् ॥४४॥ललनाललाम सत्यभामा । लावण्यें ठेंगणी गणितां रमा । सुशीळ स्वभवाची सीमा । जे अपरप्रतिमा शैब्येची ॥४८॥जामघवनिता शैव्या सती । जीची आज्ञा नुलंघी पति । तैसीच सत्यभामेची ख्याति । वक्ष्यमाण ग्रंथीं कथिजेल ॥४९॥औदार्यादि समस्त गुणीं । मंडित जाणोनि बहुतां जनीं । करूं याजिली निजात्मरमणी । बहुतां प्रयत्नीं बहुतेकीं ॥४५०॥कृतवर्मादि यादव थोर । भूभुज भूमंडळींचे अपार । सत्राजितातें याञ्चापर । होवोनि सादर उपार्जिती ॥५१॥बहुतांमाजी शतधन्व्यातें । कांहीं अनुसर सत्राजितें । भाविला होता आपुल्या चित्तें । तोही येथें उपेक्षिला ॥५२॥क्षाळावया आपुला दोष । कन्या देऊनि जोडिलें यश । हें जाणोनि पुराणपुरुष । पाणिग्रहणास प्रवर्तला ॥५३॥तिये सत्यभामेतें हरि । षड्गुणैश्वर्यें सर्वोपचारीं । वेदविधानें मंत्रोच्चारीं । गृहिणीं करीं करग्रहणीं ॥५४॥परंतु स्यमंतकाचे विषयीं । काय बोलिला शेषशायी । तें परिसावें श्रोतयांही । विवेक हृदयीं वसावया ॥४५५॥ भगवानाह न मणिं प्रतीच्छामो वयं नृप । तवाऽऽस्तां देवभक्तस्य वयं तु फलभागिनः ॥४५॥अर्थस्वार्थें महदनर्थ । हाचि मुख्यत्वें परमार्थ । षङ्गुणैश्वर्यें समर्थ । बोले यथार्थ तें ऐका ॥५६॥कुरुकंजाकरप्रबोधका । पयःपानीयप्रमेयविवेका । श्रवणचंचूकृतमराळतिलका । श्रोतृनायका परीक्षिति ॥५७॥तये समयीं श्रीभगवान । सत्राजिताप्रति बोले वचन । स्यमंतक हा मणि आंदण । आम्हांलागूनि न पाहिजे ॥५८॥कां पां न पाहिजे म्हणसी । तरी ऐकावें इयेविषीं । देवप्रसाद हा ज्याचा त्यासी । इतरा प्रयासीं न रक्षवे ॥५९॥तुम्हीं सूर्यभक्त अनन्य । जाणोनि रवि झाला प्रसन्न । तेणें प्रसादा स्यमंतकरत्न । दिधलें पूर्ण कृपेनें ॥४६०॥तें सफल्यें तुम्हांचि पासीं । सुप्रसन्न ऐश्वर्येंसीं । शोभायमान सद्गुणराशि । क्षोभें इतरांसी विघ्नकर ॥६१॥पूर्वीं जमदग्नीच्या करीं । प्रसादा सुरसुरभि निर्जरीं । दिधली असतां बलात्कारीं । कार्तवीर्यें अपहरितां ॥६२॥सुरभि गेली अमरसदना । कार्तवीर्य मुकला प्राणा । हैहयाच्या वंशवना । भार्गवानळें जाळियलें ॥६३॥तयाचि वणवयामाझारी । झाली निःक्षत्र धरित्री । देवताप्रसाद ऐशियापरी । न शोभे इतरीं अपहरितां ॥६४॥ऐशिया अनेक उपपत्ति । पुराणान्तरीं बोलिल्या असती । तथापि प्राणी लंपट होती । ते वरपडती विघ्नातें ॥४६५॥यालागीं तुमचा तुम्हांचि पासीं । देवताप्रसाद देवभक्तांसी । असो याचिया फळभोगासी । आम्ही अधिकारी सर्वस्वें ॥६६॥जंववरी पक्कता पावे फळ । तंववरी राहिल्या निश्चळ । फळभोगाचा आलिया काळ । भोक्ते केवळ फळभागी ॥६७॥सत्राजितासी ऐसिया वचनीं । वर्जिलें देतां स्यमंतकमणि । यामाजी गूढार्थ चक्रपाणि । वदला कोणी नुमजती तो ॥६८॥फळभागी या वाक्यावरी । सत्राजितें अभ्यंतरीं । मानिलें स्यमंतक माझिये घरीं । सुवर्णभारीं वर्षेल ॥६९॥तया सुवर्णभाग्यालागीं । दुहिता जामातृविभागीं । एवं उपचारप्रसंगीं । आम्ही फळभोगीं अधिकारी ॥४७०॥म्हणाल गूढार्थ तो काय । श्रीकृष्णाचा अभिप्राय । पुत्राभावीं कन्याचि होय । पितृवैभवा अधिकारी ॥७१॥किमर्थ आंदण मणिच मात्र । सत्राजितासी नाहींच पुत्र । याचे निधनीं धन सर्वत्र । समणि दौहित्र लाहती ॥७२॥ऐसा गूढार्थ बोलिला हरि । संतुष्ट सत्राजित अंतरीं । एवं अर्थानर्थकारी । तो या प्रकारीं निरूपिला ॥७३॥पुढें स्यमंतकाचि कारणें । सत्राजित जाईल प्राणें । प्रसंगें तेंही श्रवण करणें । सत्तावन्नावे अध्यायीं ॥७४॥इतुकी कथा कुरुभूषणा । श्रवणीं घालूनि योगिराणा । पुढील कथेच्या निरूपणा । म्हणे अवधाना दे राया ॥४७५॥इति श्रीमद्भागवतीं । सूत निरूपी शौनकाप्रति । अठरा सहस्र संख्या गनती । पारमहंसी संहिता जे ॥७६॥त्यामाजील दशमस्कंध । छप्पन्नावा अध्याय विशद । श्रीशुकपरीक्षितिसंवाद । मिथ्यापवादपरिहरण ॥७७॥मृगयाव्याजें प्रसेनमरण । स्यमंतकाचें गवेषण । जाम्बवतीचें पाणिग्रहण । भामालग्न निरूपिलें ॥७८॥पुढिले अध्यायामाझारी । सत्राजिता शतधनु मारी । त्यातें मारूनियां श्रीहरि । दुःख परिहरी भामेचें ॥७९॥तिये कथेचिया श्रवणीं । श्रोतयांलागीं आमंत्रणीं । श्रवणमात्रें दुर्यशोहानि । यशः श्री वरूनि हरि भजिजे ॥४८०॥प्रतिष्ठानभद्रासनीं । श्रीएकनाथ साम्राज्यदानीं । चिदानंदें निर्जरश्रेणी । स्वानंदभुवनीं वोळंगती ॥८१॥तेथ गोविन्द गोव्याख्याता । तेणें पद्मकर ठेवूनि माथां । भाषाव्याख्यानीं केला सरता । वरदकृपेनें दयार्णव ॥८२॥तें हें हरिवरदव्याख्यान । सद्भावें जे करिती श्रवण । त्याचे मनोरथ होती पूर्ण । कैवल्यसदन हरि ओपी ॥४८३॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां स्यमंतकाख्याने जाम्बवतीसत्यभामाविवाहकथनं नाम षट्पंचाशत्तमोऽध्यायः ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ ओवीसंख्या ॥४८३॥ एवं संख्या ॥५२८॥ ( छप्पन्नावा अध्याय मिळून ओवीसंख्या २६९९७ ) अध्याय छप्पन्नावा समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP