मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५६ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५६ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर जना ऊचुः - नारायण नमस्तेऽस्तु शंखचक्रगदाधर । दामोदरारविंदाक्ष गोविन्द यदुनंदन ॥६॥नरायतना नारायणा । तुज नमो गा जगज्जीवना । शंखचक्रगदाब्जधारणा । जलजेक्षणा गोविन्दा ॥५८॥यदुकुलगगनोद्भवनवघना । यादवदवयवाननलशमना । यदुवनजीवना आप्यायना । यदुनंदना यदुवर्या ॥५९॥इंद्र दमिला गोवर्धनीं । हे कीर्ति ऐकिली होती जनीं । वरुण भजला नंदानयनीं । हेही करणी जन जाणे ॥६०॥गुरुसुत अर्पूनि भजला यम । प्राशूनि पावक केला शम । कुबेराचा पुरविला काम । तनययुग्म उद्धरूनी ॥६१॥एवं देवाधिदेव कृष्ण । जाणोनि दर्शना सहस्रकिरण । आला ऐसें कथिती जन । संबोधून बहुनामीं ॥६२॥नमस्कारूनि वदती वाणी । तें तूं ऐकें कोदंडपाणि । कौरवान्वयभूषणमणि । बादरायणि संबोधी ॥६३॥एष आयाति सविता त्वां दिदृक्षुर्जगत्पते । मुष्णन्गभस्तिचक्रेण नृणां चक्षूंषि तिग्मगुः ॥७॥जनपद म्हणती भो श्रीकृष्णा । प्रत्यक्ष सविता सभास्थाना । देखावया तुझिया चरणां । स्वयें येताहे पैल तो ॥६४॥त्रिजगद्गोगोप्ताबिंद ऐसें । तूतें जाणोनि निज मानसें । तव पददर्शनाचिये आशे । तिग्मप्रकाशें रवि आला ॥६५॥तीक्ष्णगभस्तिचक्रेंकरून । झांकोळले जनांचे नयन । पाहों इच्छितों तुझे चरण । काय म्हणोन तें ऐका ॥६६॥नन्वन्विच्छंति ते मार्ग त्रिलोक्यां विबुधर्षभाः । ज्ञात्वाऽद्य गूढं यदुषु द्रष्टुं त्वां यात्यजः प्रभो ॥८॥भो भो स्वामी पंकजनाभा । तव सान्निध्यसुखवालभा । त्रिजगीं सुरवर दर्शनलाभा । बहुतेक तव भा गिंवसिती ॥६७॥मार्गमाणा श्रुति स्मृति । तो तूं यदुकुळीं गूढस्थिति । नटला आहेसी मनुष्याकृति । जाणोनि गभस्ति येत असे ॥६८॥तूतें पहावयाकारणें । गभस्तीचें येथें येणें । ऐसें भाविजे आमुच्या मनें । जाणिजे सर्वज्ञें प्रभुत्वें ॥६९॥श्रीशुक उवाच - निशम्य बालवचनं प्रहस्यांबुजलोचनः । प्राह नासौ रविर्देवः सत्राजिन्मणिना ज्वलन् ॥९॥सत्राजित हा नामसंकेत । प्रथमश्लोकीं अकारान्त । इये श्लोकीं तो हलंत । शब्द वर्तत द्विविध हा ॥७०॥अष्टौ व्याकरणसंपत्ति । छपन्न कोश संज्ञास्मृति । सर्वज्ञ पूर्ण आम्नायार्थी । शुक व्यासोक्ती निवडला ॥७१॥तो हें श्रीमद्भागवत । शुक वाखाणी निगमोदित । श्रोते सर्वज्ञ तेथींचा अर्थ । पदपदार्थें अनुभविती ॥७२॥शुक म्हणे गा कौरवपाळा । अज्ञान जनही समान बाळा । बालिशांच्या ऐकोनि बोला । हरि हांसिला आश्चर्यें ॥७३॥अखिलद्रष्टा अंबुजनयन । सर्वसाक्षी सर्वाभिज्ञ । बोलता झाला हास्य करून । काय वचन तयांसी ॥७४॥अहो हा सूर्य नोहे सहसा । तुम्ही लक्षूनि तत्प्रकाशा । भाविला चंडकिरण ऐसा । कोण कैसा नुमजोनी ॥७५॥मणिभूषणें द्योतमान । तुम्हीं भाविला देव म्हणोन । परी हा सत्राजित आपण । द्वारकाभुवन प्रवेशला ॥७६॥कंठाभरणीं स्यमंतक । ज्वलत्किरणीं गमे अर्क । जाऊनि पहा पां सम्यक । मनीं निःशंक होवोनी ॥७७॥ऐसें कथी जंव चक्रपाणि । तंव तो प्रवेशे आत्मसदनीं । पुढें वर्तली जैसी करणी । तेही श्रवणीं अवधारा ॥७८॥सत्राजित्स्वगृहं श्रीमत्कृतकौतुकमंगलम् । प्रविश्य देवसदने मणिं विप्रैर्न्यवेशयत् ॥१०॥सत्राजित निजमंदिरीं । प्रवेशिला आनंदगजरीं । तया गृहासी ऐश्वर्यथोरी । शुकवैखरी अनुवादी ॥७९॥आधींच सदन श्रीमंडित । विशेष कौतुकें उत्साहभरित । मंगळें केलीं जेथ समस्त । वेदपारंगतद्विजवचनीं ॥८०॥ऐशिये सदनीं प्रवेशोनी । देवतायतनीं स्यमंतकमणि । स्थापिला द्विजांच्या हस्तें करूनी । त्याची करणी अवधारा ॥८१॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP