मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४३ वा| श्लोक १२ ते १५ अध्याय ४३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १७ श्लोक १८ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ४३ वा - श्लोक १२ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १२ ते १५ Translation - भाषांतर स्वविक्रमे प्रतिहते कुञ्जरेन्द्रोत्यमर्षितः । चोद्यमानो महामात्रैः कृष्णमभ्यद्रवदुषा ॥१२॥भग्नविक्रम झालियावरी । अत्यन्त क्षोभा पावला करी । हस्तिपें प्रेरितां कृष्णावरी । विजूच्या परी लोटला ॥५६॥मी कुवलयापीड गज । अर्भकें निस्तेज केलें मज । पायाळावरी जैसी वीज । धरूनि लाज तेंवि भडके ॥५७॥तमापतन्तमासाद्य भगवान्मधुसूदनः । निगृह्य पाणिना हस्तं पातयामास भूतले ॥१३॥ऐसा कुवलयापीडयावा । मर्दनीं आवेश यादवदेवा । कुंजरें कलीवर कवळिलां कवा । मुरडे सिंहासमसाम्य ॥५८॥कधुकैटभनिषूदन । केलें मल्लयुद्धें करून । तैसी प्रकटी आंगवण । श्रीभगवान ऐश्वर्यें ॥५९॥कुंजरापुढें पळतो हरि । ऐसें मानूनि अन्तरीं । अम्बष्ठ वारंवार प्रेरी । त्याची बोहरी आदरिली ॥६०॥कुंजर भग्नदर्प । तथापि अंबष्ठ साटोप । यालागीं मुरडला मन्मथबाप । धरिला द्विप शुण्डाग्रीं ॥६१॥शुण्डा पिळितां प्रबळ बळीं । उलथूनि पडला भूमंडळीं । मृगेंद्र बैसे कुंभस्थळीं । तेंवि वनमाळी गज गांजी ॥६२॥पतितस्य पदाक्रम्य मृगेंद्र इव लीलया । दंतमुत्पाट्य तेनेभं हस्तिपांश्चाहनद्धरिः ॥१४॥कुंजर पडतां भूमंडळीं । बळें आक्रमी पायातळीं । दन्त उपडोनि वनमाळी । ठोकी त्यातळीं गज गजपा ॥६३॥मृतकं द्विपमुत्सृज्य दन्तपाणिः समाविशत् । अंसन्यस्तविषाणोऽसृड्मदबिन्दुभिरंकितः ॥विरूढस्वेदकणिकावदनांबुरुहो बभौ ॥१५॥विसर्जूनियां कुंजरप्रेत । हस्तीं वाहूनि गजदंत । कैसे वीरश्रीशोभायुक्त । रामश्रीकान्त शोभले ॥६४॥स्कंधीं वाहोनि दंतकुलिशें । रंग प्रवेशती तुकटावेशें । रक्तबिन्दु टपकती कैसे । दंतापासोनि स्कंधींच्या ॥६५॥मद जाणिजे दानोदक । रूढावेश स्वेदपुलक । इत्यादिकीं व्याप्तमुख । शोभा अलौकिक प्रकाशी ॥६६॥म्हणाल एकला एकट हरि । प्रवेशला रंगागारीं । तरी तो निर्भय शत्रुसमरीं । गोपपरिवारीं प्रवेशें ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP