मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४३ वा| श्लोक ६ ते ११ अध्याय ४३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १७ श्लोक १८ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ४३ वा - श्लोक ६ ते ११ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते ११ Translation - भाषांतर करींद्रस्तमभिद्रुत्य करेण तरसाग्रहीत् । कराद्विगलितः सोऽमुं निहत्यांघ्रिष्वलीयत ॥६॥कुंजर प्रेरितां अंबष्ठें । कृष्णावरी लोटला नेटें । शुंडादंडें धरूनि हठें । चरणहांटे चिरूं पाहे ॥४०॥तव लघिमेच्या लाघवें । कृष्ण निष्टला न होतां ठावें । वज्रमुष्टि ओपूनि जवें । जठरातळीं प्रवेशला ॥४१॥कुंजराचे चारी पाय । तयांमाजीच लीन होय । हस्तिप कुंजराभंवतें पाहे । म्हणती काय हरि झाला ॥४२॥संक्रुद्धस्तमचक्षाणो घ्राणदृष्टिः स केशवम् । परामृशत्पुष्करेण स प्रसह्य विनिर्गतः ॥७॥श्रीकृष्णाचा मुष्टिप्रहार । लागतां सक्रोध कुंजर । घ्राणें हुंगोनि शोधनपर । नेत्रा गोचर पशुजाती ॥४३॥शुंडाग्रातें पुष्कर म्हणणें । श्रीकृष्णातें हुडकी तेणें । येरी मुरडोनि आंगवणें । थाप मारून निष्टला ॥४४॥पुच्छे प्रगृह्यातिबलं धनुषः पंचविंशतिम् । विचकर्ष यथा नागं सुपर्ण इव लीलया ॥८॥मग येऊनि पुच्छाकडे । करीं घालूनि पुच्छवेढे । पंचवीस धनुष्यें कुंजर खुरडे । तेंवि निवाडें वोढिला ॥४५॥परम बळिष्ठा बळिष्ठ । सक्रोध कुंजर आणि अंबष्ठ । कृष्णें कर्षितां भंगला कंठ । मानी उद्भटविक्रम हा ॥४६॥जेंवि भुजंगमातें खगप । कर्षितां होय प्रळयकल्प । तेंवि करींद्रा कंदर्पबाप । स्वलीलाप्रताप प्रकाशी ॥४७॥स पर्यावर्तमानेन सव्यदक्षिणतोऽच्युतः । बभ्राम भ्राम्यमाणेन गोवत्सेनेव बालकः ॥९॥कृष्ण धरावयासाठीं । दक्षिणांगें मुरडी करटी । येरु प्रतापें पुसाटीं । वोढी हट्टीं वामांगें ॥४८॥वामभागीं जंव कुंजर फिरे । तंव दक्षिणांगीं कर्षिजे येरें । वत्सपुच्छेंसीं लेकुरें । जेंवि कां फेरे घालिजती ॥४९॥ततोऽभिमुखमभ्येत्य पाणिनाहत्य वारणम् । प्राद्रवन्प्रातयामास स्पृश्यमानः पदे पदे ॥१०॥स धावन्क्रीडया भूमौ पतित्वा सहसोत्थितः । तं मत्वा पतितं क्रुद्धो दंताभ्यां सौऽहनत्क्षितिम् ॥११॥पुच्छें कर्षूनि सहस्रवरी । मग सम्मुख येऊनिया श्रीहरी । बळें ताडूनिया मुखावरी । पळे सत्वरी क्षोभवुनी ॥५०॥खवळला कुंजर लागे पाठीं । त्यासि चाळवोनि जगजेठी । पळतां पडोनि भूतळपृष्ठीं । जाय उठाउठीं निष्टूनी ॥५१॥कृष्ण पडिला देखोनि दृष्टीं । कुंजर येऊनि मेटेखुंटी । दांत मारी भूतळवटीं । तंव कृष्ण थापटी दे पुढती ॥५२॥तेणें क्षोभला पुढतीं उठे । धांवे कृष्णापाठोवाटे । तंव येरु स्खलितापरी आटे । सवेग निष्टे तेथुनी ॥५३॥ऐसें देखतांचि कुंजरें । दांतें मारी परम निकरें । तंव मुखावरी ताडूनि येरें । करी सामोरें पलायन ॥५४॥ऐसें पदोपदीं प्रपातन । वारणातें करवी कृष्ण । तेणें झाला खेदक्षीण । परी क्रोध दारुण न संवरे ॥५५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP