मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३६ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ३६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ३६ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच :- अथ तर्ह्यागतो गोष्ठमरिष्टो वृषभासुरः । महीं महाककुत्कायः कंपयन्खुरविक्षताम् ॥१॥सुरवर व्रजपुर सचराचर । कृष्णागमनें तोषनिर्भर । जाले असतां त्यानंतर । देखोनि असुर क्षोभला ॥३६॥वृषभासुर तो अरिष्टनामा । लोकत्रयाच्या मंगलधामा । क्षोभला देखोनि पुरुषोत्तमा । दुष्ट दुरात्मा दुर्वीर्य ॥३७॥म्लेच्छ विप्रांची मंडळी । कीं धर्माचरणा न साहे कळी । तैसा देखोनि श्रीवनमाळी । अरिष्ट ते काळीं क्षोभला ॥३८॥याच्या क्षोभाचें लक्षण । देहाकृति प्रताप गहन । साडेतीं श्लोकीं विवरण । व्यासनंदन निरूपी ॥३९॥व्रजासन्मुख येतां हरि । पृष्ठीं घालूनियां व्रजपुरी । अरिष्ट धांवे कृष्णावरी । खुरीं धरित्री विदारित ॥४०॥महान म्हणिजे विशाळ काय । स्थूळ वोसंड पर्वतप्राय । खुरक्षतांचे वोपूनि घाय । धरा कंपायमान करी ॥४१॥रंभमाणः खरतरं पदा च विलिखन्महीम् । उद्यम्य पुच्छं वप्राणि विषाणाग्रेण चोद्धरन् ॥२॥भयानक रंभमाणें । म्हणिजे वृषभशब्दें गर्जना करणें । मदोन्मत्त डरक्या देणें । त्रासती जेणें सिंह व्याघ्र ॥४२॥चरणघातें धरा उकरी । ते भू मानी वज्रापरी । शृंगीं उलथोनि टाकी गिरि । प्रळय व्रजपुरीं मांडिला ॥४३॥वोसंडपर्यंत वाहूनि पुच्छ । थडके दिग्गज मानी तुच्छ । विषाणग्रीं उच्च उच्च । पर्वत उलथोनि टाकीतसे ॥४४॥ग्राम दुर्गें यमुनादरडी । शृंगें रोवूनि मस्तकें खरडी । भयें जनाची पडली भरडी । वळती वेंगडी करचरणां ॥४५॥किंचित्किंचिच्छकृन्मुंचन्मूत्रयंस्तब्धलोचनः । यस्य निर्ह्रादितेनांग निष्ठुरेण गवां नृणाम् ॥पतंत्यकालतो गर्भाः स्रवंतिस म भयेन वै ॥३॥उन्मत्तवृषभचेष्टा कुटिळ । किंचित् किंचित् टाकी मळ । मळासरिसें मूत्रजळ । वारंवार विसर्जी ॥४६॥मदधूर्णित नेत्रपातीं । स्तब्ध म्हणिजे न हालती । सरोख पाहतां मूर्छित होती । मनुष्ययाति पश्वादि ॥४७॥ज्याची गर्जना ऐकोनि कानीं । गाई न व्रजकामिनी । गर्भ टाकिती पैं दचकोनी । प्राणहानि कितियेकां ॥४८॥कितियेकींचे गर्भपात । गर्भस्रावही जाले बहुत । पात स्राव या दोहीं आंत । भेद काय तो अवधारा ॥४९॥चतुर्थमासवरी गर्भ पडती । स्राव बोलिजे तया प्रति । पंचमीं षष्ठीं पात म्हणती । सप्तादि प्रसूति म्हणावी ॥५०॥पूर्ण न भरतां गर्भमान । ऐकोनि अरिष्टासुरनर्दन । गोअंगनांचें गर्भपतन । होय दचकोनि अकाळीं ॥५१॥शेळ्या मेंढ्या गाई महिषी । अश्विनी आणि स्त्रिया मानुषी । गर्भ टाकिती भयासरिसी । दाही दिशीं आकांत ॥५२॥निर्विशंति घना यस्य ककुद्यचलशंकया । तं तीक्ष्णशृंगमुद्वीक्ष्य गोर्या गोपाश्च तत्रसुः ॥४॥ज्याचे वोसंडप्रांतीं घन । रिघती पर्वतभावनेकरून । तीक्ष्णशृंगाग्रें देखोन । गोपगोपीगण त्रासले ॥५३॥उच्च भयंकर शृंगाग्रासी । देखोनि कांपती व्रजनिवासी । गोधनें बुजालीं गोकुळासी । सोडूनि चौपासीं विखुरलीं ॥५४॥पशवो दुद्रुवुर्भीता राजन्संत्यज्य गोकुलम् । कृष्ण कृष्णेति ते सर्वे गोविंदं शरणं ययुः ॥५॥अद्भुत नृपाचिये कर्णीं । विस्मयें सांगे बादरायणि । धेनु सांडूनि वत्सें तान्हीं । भरल्या रानीं संत्रासें ॥५५॥धेनु म्हैषादि वासुरें । व्रजीं होतीं जीं लघुतरें । त्यांतें सांडूनि बुजालीं ढोरें । भरलीं कांतारें प्राणभयें ॥५६॥तस्मात् आपणाहूनि प्रिय । नाहीं ऐसा अभिप्राय । नृपा बोधूनि व्यासतनय । कथान्वय निरूपी ॥५७॥ऐसा देखोनि दुष्ट अरिष्ट । सर्वीं मानूनि परम अरिष्ट । म्हणती कृष्णा निरसीं कष्ट । भयें उद्भट त्रासलों ॥५८॥कृष्ण कृष्णेति कृष्णेति । म्हणोनि येती काकुळती । श्रीगोविंदा गोकुळपति । शरण तुजप्रति रिघालों ॥५९॥तूंचि संकटीं संरक्षिता । तूंचि आमुचा प्राणदाता । तूंचि भयाचा उपहर्ता । दुष्टनिहंता दैत्यारि ॥६०॥मेघ वर्षतां शिळाधारीं । तुवां गोवर्धन धरिला करीं । व्रज रक्षिलें सप्तरात्रीं । तूं कैवारी आमुचा ॥६१॥वरुणापासूनि आणिला नंद । अजगरें गिळितां प्राणप्रद । व्रजजनाचा जीवनकंद । तो तूं मुकुंद भयहर्ता ॥६२॥ऐसें आपुलालिया वाणी । कृष्ण स्मरती समस्त प्राणी । हें जाणोनि अभयदानी । निगमयोनि प्रवर्त्तला ॥६३॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP