मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३६ वा| आरंभ अध्याय ३६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ३६ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णसच्चिदानंदाय नमः । वेधी पदाब्जसाधकभ्रमरां । श्रीमुखमयंकध्यातृचकोरां । प्रबोधसुधाघनमुमुक्षुनिकरां । चातकां मोरां नाचवी ॥१॥शमदमादि साधनकोटी । साधितां वैराग्यहातवटी । सायुज्यपदाचियेही मुकुटीं । श्रीपादप्रेमा जोडिला ॥२॥तेचि साधक श्रीपादकमळा । वांचूनि नेच्छिती सुकृतफळा । येरां प्राकृतां दुर्बळां । प्रेमजिव्हाळा दुर्लभ ॥३॥भ्रमरा पद्मेशीं साजणें । कीं सलिलाविण मीना न जिणें । तेंवि पदाब्जसेवनेंविण । विभवें आनें दुःखद ॥४॥हा नैसर्ग प्रेमप्रद । तें स्वामीचें पादारविंद । जें वांछितां सुरवरवृंद । सुकृतमंद न लाहती ॥५॥ध्यानयोगें मनःसंकल्प । जिहीं अर्पिले कोटिकल्प । तेचि चकोर निर्विकल्प । वदनोडुप प्राशिती ॥६॥येरां द्विजां वायसादिकां । अनोळखीच मुखमयंका । मा ते कोठूनि तत्पीयूखा । सेवनसुखा वेधती ॥७॥यालागिं अनेकजन्मवरी । ध्यानयोगाची सामग्री । जिहीं साधूनि घेतली पदरीं । ते तव वक्त्रीं वेधती ॥८॥स्वप्नभ्रमाचा विक्षेप । मोडूनि सुषुप्ति करी लोप । तो मार्तंड गगनदीप । जागॄदवस्थाबोधक ॥९॥परि तो अबोधचि बोध । प्रवृत्ति बोधूनि करी बद्ध । केवळ विषयासक्ती विरुद्ध । तेचि प्रसिद्ध प्रकाशी ॥१०॥जागृतिबोधें समस्त प्राणी । प्रवर्तती विषयाचरणीं । तेणें पडती भवभ्रमणीं । गर्भजांचणीमाजिवडे ॥११॥देखूनि क्षुधेची जांचणी । रसना रसाच्या गवेषणीं । पडोनि भ्रमे संसारवनीं । नानायत्नीं रसलोभें ॥१२॥मग ते रसप्राप्तीसाठीं । ज्ञानवयाची सोडूनि गांठीं । बुद्धि धांवडी बारा वाटीं । महादुर्घटीं श्रम पावे ॥१३॥क्षणैक होतां जठरपूर्ति । तंव घ्राण अपेक्षी उत्तम दृती । नेत्र लावण्यरूपा झुरती । त्वगिच्छारति मृदुस्पर्शीं ॥१४॥गायनास्तव झुरती श्रवण । अभीष्टवैभव वांछी मन । जागृतिबोधें हें भवभान । जन्ममरणप्रद होय ॥१५॥म्हणाल वदनें शास्त्रपठन । नयनें अक्षरपरिज्ञान । श्रवणें श्रुत्यर्थावधारण कां भवतरण न करी हे ॥१६॥तरी शास्त्रें पढोनि लोकांपुढें । खोलती दीनत्वें बापुडे । ज्ञान विकिती जठरचाडे । केंवि निवाडे ते तरती ॥१७॥अपसव्यादि पिशाचलिपी । अनेक विद्या अक्षरजल्पीं । नीचसेवनें महत्त्व कल्पी । तो निष्पापी कैं होय ॥१८॥करूनि श्रुत्यर्थावधारणा । जठरार्थ वाखाणी पुराणा । अनेक देश कटकें नाना । जठरतर्पणा लागिं भ्रमे ॥१९॥एवं बोध जो प्रवृत्तिपर । तयाचि नाम भव दुस्तर । प्रकर्षेंकरूनि आत्मविचार । प्रबोधक चतुर यास्तव तूं ॥२०॥विषयनिष्ठां सोडवावया । अदृष्ट फळ बोधिसी तयां । देहात्मबुद्धि नेसी लया । आणूनि उदया जीवदशा ॥२१॥मग ते जीवात्मबुद्धीकरून । इहामुत्रार्थ भोगभान । साच मानूनि कर्माचरण । फलाशा धरूनि विचंबिती ॥२२॥ऐसिया जीवात्मबुद्धिमंतां । वास्तव बोधूनि चिदात्मकता । त्रिविध बंधमोक्षकर्त्ता । तूं तत्त्वता चित्सूर्य ॥२३॥यालागिं वास्तव प्रबोधन । कर्त्ता तो तूं प्रबोधघन । शुद्धाधिकारी चातकगण । स्वमुखें गर्जोन तोषविसी ॥२४॥गोशब्दें जे तव चित्किरण । जिहीं प्रबोधिसी सज्जन । यालागिं गोविंद हें अभिधान । गोवेत्तृत्वें तुज शोभे ॥२५॥जैसा गोमंत अंशुमाळी । स्वतेजें प्रकट असतां जवळी । नेणती विमुखें कां आंधळीं । तेंवि हृत्कमळीं तुज नेणो ॥२६॥प्रबोधामृतें ऐसिया जडा । मज मुरडूनि आपणाकडां । दाविलें सच्चित्सुखउजिवडा । नेत्रीं उघडा नांदोनी ॥२७॥पुन्हा स्वगुण वर्णवावया । स्वसत्ता अधिष्ठूनि मम हृदया । भाषाव्याख्यान विवरावया । दशमस्कंधीं नियोजिलें ॥२८॥तेथ श्रीमत्सत्तायोगें । पंचवीस अध्याय संपले मागें । पुढें यथानुक्रमप्रसंगें । छत्तिसावा आदरिला ॥२९॥तेथ पंचतिसाव्या अध्यायांतीं । कृष्णलीला वर्णितां युवति । सायंकाळीं व्रजाप्रति । येतां श्रीपति हरिखेल्या ॥३०॥व्रजासन्निध श्रीभगवान । सहित वयस्य संकर्षण । वेणुवादनें संगीतगान । येतां गोगणपुरस्कृत ॥३१॥सुरवर वर्षती दिव्यसुमनीं । दुंदुभींचे विजयध्वनि । गंधर्व गाती तानमानीं । मंगलस्वनीं हरिचरितें ॥३२॥अप्सरा नर्त्तकी नृत्य करिती । गोपाळ आनंदें नाचती । हर्षें पाहों धांविल्या युवति । न साहे दुर्मति अरिष्ट ॥३३॥ऐसा आनंदभरित हरि । देखोनि प्रवेशतां व्रजपुरीं । अरिष्टासुर अरिष्ट करी । तें यावरी अवधारा ॥३४॥शुक म्हणे गा परमपवित्रा । कुरुनरेंद्र गौरवगात्रा । विचित्रवीर्याच्या प्रपौत्रपुत्रा । परिसें सत्पात्रा परीक्षिति ॥३५॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP