मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३३ वा| श्लोक २७ ते ३० अध्याय ३३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ३३ वा - श्लोक २७ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ ते ३० Translation - भाषांतर राजोवाच :- संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च । अवतीर्णो हि भगवानंशेन जगदीश्वरः ॥२७॥राजा म्हणे गा अरणीतनया । व्यासात्मजा योगिवर्या । माझी शंका परिसोनियां । निरसावया समर्थ तूं ॥८॥धर्मसंस्थापने कारणें । श्रीकृष्णाचें अवतार धरणें । अंशें म्हणिजे संकर्षणें । सहित येणें इहलोका ॥९॥हीति निश्चयें तोचि अर्थ । दोहीं नामीं विरोधस्थ । संक्षेप सूचिला तो यथार्थ । शोर्ते समर्थ परिसोत ॥३१०॥अचिंत्यैश्वर्यसंपन्न । अघटितघटनापटुतरपूर्ण । मायानियंता श्रीभगवान । तो हा श्रीकृष्ण जगदात्मा ॥११॥आणि जगाचा कल्याणकर । म्हणोनि बोलिजे जगदीश्वर । तो केवीं हा अनाचार । आचरे जाररतिलास्य ॥१२॥स कथं धर्मसेतूनां वक्ता कर्ताऽभिरक्षिता । प्रतीपमाचरद्ब्रह्मन्परदाराभिमर्शनम् ॥२८॥आप्तकामो यदुपतिः कृतवान्वै जुगुप्सितम् । किमभिप्राय एतन्नः संशयं छिंधि सुव्रत ॥२९॥जगदीश्वरत्वें जगत्पिता । वेदवाक्यें स्वधर्मवक्ता । विशेष धर्मसंस्थापिता । अधर्मच्छेत्ता श्रीकृष्ण ॥१३॥धर्मसेतु जे सनातन । त्यांचें करावया रक्षण । युगीं युगीं अवतरओन । अधर्मप्रशमन करीतसे ॥१४॥अधर्म म्हणसी कोण काय । तरी स्वधर्माची लंघूनि सोय । पाखंडमार्ग वेदबाह्य । जे अन्याय विषयार्थ ॥३१५॥देहबुद्धि तदाभिमान । धरूनि प्रवर्त्तविती जे दुर्जन । त्यांचें करूनियां प्रशमन । रक्षी सज्जन स्वधर्मीं ॥१६॥धर्मासी प्रतिकूळ म्हणिजे प्रतीप । कां आचरला मन्मथबाप । रासरसिक क्रीडाकल्प । जो अनल्प अधर्म ॥१७॥केवळ अधर्मचि नोहे जान । जैसें बिडिशाक्त मांसभक्षण । तें एकासी करी दूषण । हें संपूर्ण जग व्यापी ॥१८॥परदाराभिमर्शन । महा साहस दीर्घप्रयत्न । हेंचि करूनि प्रमाण । विधिलंघन जन करिती ॥१९॥माता बाळां रक्षण करी । विष देऊनि जैं ते मारी । कीं तस्करभीता नृप कैवारी । जेंवि तोचि हरी सर्वस्वें ॥३२०॥धर्मरक्षक चक्रपाणि । प्रवर्त्तला अधर्माचरणीं । ऐसी प्रतीप केली करणी । काय म्हणोनि मज सांगा ॥२१॥मायानियंता श्रीभगवान । प्रथम बोलिलों करितां प्रश्न । त्यासी गोपी मन्मथेंविण । अशक्य कोण तोषवितां ॥२२॥ब्राह्मषण्मास केली राती । त्यासि गोपींची कामप्रवृत्ति । परतवावया नव्हती शक्ति । जे अधर्मसुरतीं प्रवर्त्तला ॥२३॥म्हणसी कृष्ण अवाप्तकाम । अभेद सर्वग आत्माराम । तेथ परापरत्वें भेदभ्रम । कैंचा अधर्म व्यभिचार ॥२४॥तरी हें मीही साच मानीं । परी हें घडे पूर्णपणीं । येथ धर्मसंस्थापनीं । अधर्मकरणी अश्लाघ्य ॥३२५॥जरी श्रीकृष्ण निजात्मरत । तरी कां ऐसें जुगुप्सित । अविधि गोपींचें जारचरित । महा अयुक्त आचरला ॥२६॥कामें कलुषी अंतःकरण । न होतां किमर्थ दुष्टाचरण । कांहीं अभिप्राय लक्षून । असेल श्रीकृष्ण आचरला ॥२७॥परंतु इतुकें दिसे प्रकट । जैसें आचरती श्रेष्ठ । तेंचि प्रमाण करिती स्पष्ट । येर कनिष्ठ आचरतां ॥२८॥कृष्ण धर्मसंस्थापक । तो जें आद्चरला कौतुक । तैसें आचरती निःशंक । समस्त लोक प्रामाण्यें ॥२९॥त्या जनांची अवस्था काय । कीं कृष्णाचा जो अभिप्राय । आम्हां प्राकृतां जो दुर्ज्ञेय । तो निःसंशय कथावा ॥३३०॥सत्यवादी सुदृढव्रत । म्हणोनि संबोधी भो सुव्रत । कृष्णाभिप्राय वद यथार्थ । जे तूं अयथार्थ नातळसी ॥३१॥हे ऐकोनि नृपाची वाणी । संतोषोनि वादरायणि । म्हणे राया कल्याणखाणी । लोकपाळणीं प्रवर्त्तसी ॥३२॥लोकसंग्रहाचि कारणें । राया तुझें हें प्रश्न करणें । येर्हवीं जाणसी अंतःकरणें । कृष्णाचरणें अलौकिकें ॥३३॥श्रीशुक उवाच :- धर्मव्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसम् ।तेजीयसां न दोषाय वह्नेः सर्वभुजो यथा ॥३०॥कृष्णहृदयींचा अभिप्राय । राया ऐकें निःसंशय । लोकरक्षण कामविजय । कलिमलभयप्रशमन ॥३४॥युगीं युगीं हरिअवतार । घेऊनि प्रवृत्ति युगानुसार । दावूनि करी जगदुद्धार । सत्य साचार निष्कर्म ॥३३५॥कृतीं आदिनारायण । सत्यशौचसदयपूर्ण । क्षात्रधर्मपरायण । स्वये निर्घृण लोकभयें ॥३६॥कलिप्रारंभीं द्वापरान्तीं । कृष्ण अवतरला जगत्पति । दोहीं युगांची विडंबस्थिति । दावी आद्यन्तीं विचरोनी ॥३७॥द्वापारींचे विडंबनकर्म । अर्ध यथार्थ अर्ध कृत्रिम । नंदयशोदागोपीप्रेम । पूर्णकाम संपादी ॥३८॥परी तो यथार्थ वस्तुमहिमा । सारिखा गमे जर्ही कृत्रिमा । तर्ही पाववी कैवल्यधामा । वियोगप्रेमा वोपूनी ॥३९॥येर्हवीं कार्यापुरता स्नेह । दावूनि मित्रत्वा करी रोह । अंतीं वियोगदुःखें दाह । होतां पहा हो न शिणेचि ॥३४०॥आतां कळीचें विडंबन । जारचौर्यानृतभाषण । समरंगणीं पलायन । गूढवर्त्तन कापट्यें ॥४१॥सर्वत्र कळिकाळीं हे क्रिया । करूनि जाती निरयालया । कृष्ण तयांसि उद्धरावया । प्रतीतचर्या आचरला ॥४२॥गोरस चोरूनि भक्षिला कृष्णें । ते बाळचर्येच्या श्रवणें पठनें । स्वर्णस्तेयादि महादूषणें । जळोनि जाति तत्काळ ॥४३॥श्रीकृष्णाचे रासक्रीडे । श्रवणें ऐकतां पढतां तोंडें । मातृगमनादि पातक झडे । मां कैंचा त्या पुढें व्यभिचार ॥४४॥ब्राह्मणविडंबें कितवाचरणें । मागधादिकां निर्दाळणें । कालयावनासमरीं पळणें । यांच्या पठनें अघशांति ॥३४५॥एवं कळिकाळग्रस्तां जनां । तारावया विषयाचरणा । कृष्ण करी त्या श्रवणा पठना । अघमोक्षणा पावती ॥४६॥पाहोनि कृष्णाचें आचरण । येर जैं आचरती सामान्य । तैं त्यांलागीं अधःपतन । हें निमित्त देशी कृष्णातें ॥४७॥तरी येथींचा ऐसा अर्थ । राया अवधारीं यथार्थ । ईश्वराचरणाचा जो पंथ । तो दे अनर्थ अनीश्वरां ॥४८॥कृष्ण परब्रह्म साचार । जो ईश्वरांचा ईश्वर । मायानियंता जगदाधार । अगाध अपार ऐश्वर्यें ॥४९॥असो कृष्णाचें आचरण । परी सामान्य जे जे तपोधन । ज्यांची क्रिया असाधारण । केवीं सामान्य आचरती ॥३५०॥इंद्रें ब्रह्मज्ञ वधिला वृत्र । घटजें सागर केला मूत्र । वशिष्ठाचे शतैक पुत्र । विश्वामित्र संहरवी ॥५१॥ब्रह्मयाचें कन्यागमन । शंकराचें विषभक्षण । दत्तात्रेयाचें उन्मत्तपण । इतर कोण करूं शके ॥५२॥वायु न म्हणे अगम्यागमन । कीं सर्वभक्षक हुताशन । कीं गंगेचें निर्मळपण । समळनिर्मळ न विचारी ॥५३॥इतर सामान्य मूढपणें । त्यांचीं देखोनि उत्पथाचरणें । आचरों म्हणतां मुकती प्राणें । नाशती पुण्यें संग्रहिलीं ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP