मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| प्रसंग ७ प्रासंगिक कविता प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ प्रासंगिक कविता - प्रसंग ७ समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत. Tags : hindipadramdassamarthपदरामदाससमर्थहिन्दी प्रसंग ७ Translation - भाषांतर ( सामनगडचा किल्ला ( प्रांत हुक्केरी ) बांधण्याचें काम श्रीशिवछात्रपतींनीं सुरू केलें असतां कामकरी लोकांकडे पाहून इतक्यां लोकांचें पालनपोषण करणारा मी आहें अशी अहंभावाची कल्पना शिवरायांच्या चित्तांत उत्पन्न झाली; त्यावेळीं श्रीसमर्थांनीं तेथें प्रकट होऊन वाटेंतील खडक फोडून त्यांत असलेली सजीव बेडकी शिवरायास दाखविली; आणि या बेडकीचें पोषण कोण करतो म्हणून विचारलें; त्या प्रसंगीं पुढील गोड पद रचिलें आहे. ) पद( राग - खमाज; ताल - धुमाळी ) आम्ही काय कुणाचें खातों । श्रीराम आम्हांला देतो ॥ध्रु.॥बांधिले घुमट किल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट ।नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो । तो राम. ॥१॥पाहा पाहा मातेचिये स्तनीं । चिंतिता मांस - रक्त - मल - घाणी ।तयांमध्यें विमल दुग्ध आणोनी । कोण निर्मीतो । तो राम. ॥२॥खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी ।सिंधु नसतां तिये मुखीं पाणी । कोण पाजीतो । तो राम. ॥३॥नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें ॥दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवीतो । तो राम. ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP