मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| प्रसंग ६ प्रासंगिक कविता प्रसंग १ प्रसंग २ प्रसंग ३ प्रसंग ४ प्रसंग ५ प्रसंग ६ प्रसंग ७ प्रसंग ८ प्रसंग ९ प्रसंग १० प्रसंग ११ प्रासंगिक कविता - प्रसंग ६ समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत. Tags : hindipadramdassamarthपदरामदाससमर्थहिन्दी प्रसंग ६ Translation - भाषांतर ( शके १५७७ सालांत निष्ठावंत शिष्य कोण कोण आहेत याची परीक्षा करण्याच्या हेतूनें श्रीसमर्थांनीं हातांत तलवार घेऊन वेड्याचें सोंग घेतलें; त्या समयीं कल्याण समर्थांच्या कसोटीस परिपूर्ण उतरले; पुढें कल्याणांच्या विनंतीवरून सज्जनगडावर परत येतांना समर्थांनी खालील पद म्हटलें. )( चाल - धन्य हे प्रदक्षिणा. ) पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळीं । रामनामें हांक देउनी डोई कांडोळी ॥ध्रु.॥वृत्तिसेंडी बंधनेंविण सदा मोकळी । संसाराची धुळी करुनि आंगीं उधळी ॥१॥प्रपंचउकरड्यावरी बैसणें ज्याचें । भोंता पाळा फिरोनी पाहे जन हे अविद्येचे ॥२॥धाउनि बैसे उठोनि पळे दृश्य वाटतें । अदृश्याचें राहाणें घेतां नचलें कवणाचें ॥३॥आउट हात गज नवां ठाईं वितुळलें । दाहावा ठाव म्हणऊन तेथें ठिगळ दिधलें ॥४॥ऐसें मन हें चंचळ निवृत्तीसी गुंतलें । परतुनियां आलें म्हणऊनि जीवेंसि मारिलें ॥५॥मीपणाचे शाहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धीवस्त्राचें ओझें ॥६॥नलगे आम्हां मानअपमानाचें ओझें । तुझी शुद्धी घेतां गेलें मीपण माझें ॥७॥आम्ही जन धन देखुनि वारचि करितों । आपणाऐसे पिसे देखुनि उमज धरितों ॥८॥आर्तें भेटों येतीं त्यांस वेड लावितों । रामीरामदास ऐसें अबद्ध बोलतो ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 09, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP