अनुभवामृत - प्रकरण १० वें

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


परिगा श्रीनिवृत्तिराया । हातातळि निवविले स्वामिया । तरि ते निवांतचि भोगावें कि ॥१॥
परि महेसे सूर्याहाति । दीधलि जे तेजसुति । तिये प्रभे अंतर्गति । जग केले ॥२॥
चंद्रासि अमृत घातले । ते काय तयाचि इतुले । कां सिंधु मेघा दीधले । तो मेघाचि भागु ॥३॥
दिवा जो उजियेडु । तो घराचा सुरवाडु । गगनि अथि पवाडु । तो जगाचा की ॥४॥
अगाधे उचंबळति । ते चंद्रिचि ना शक्ति । वसंत करि तै होति । झाडपानें ॥५॥
म्हणोनि हे ऐश्वर्य । दैविकेचे औदार्य । वांचोनि स्वातंत्र्य । माझे नाहि ॥६॥
आणि हा येव्हडा ऐसा । परिहार देउ कायिसा । प्रभुप्रभावविंन्यासा । आड ठावोनि ॥७॥
अह्मि बोलिलो जे कांहि । ते प्रगटचि असे ठांई । स्वयंप्रकाशा काई । प्रकाशावे बोले ॥८॥
विपाये अह्मि हान । कीजेते पा मौन ।तरि कां जनि जन । दीसते ना ॥९॥
जनाते जने देखता द्रष्टेचि दृश्य तत्वता । कोण्हा न होनि आइता । सिद्धांतचि असे ॥१०॥
यया परोते कांहि । सच्चिद्रहस्य नाझी । यया अधिही । असतचि असे ॥११॥
म्हणोनि ग्रंथप्रस्तावो । न घडे हे ह्मणो पावो । परि सिद्धानुवाद लाहो । आवडि करु ॥१२॥
पढियंते सदा तेचि । परि भोगिजे नवि नवि रुचि । म्हणोनि हा उचितूचि । अनुवाद सिद्ध ॥१३॥
यया कारने मिया । गोप्य दाविले बोलोनिया । ऐसे नाहि आपसया । प्रकाशुचि ॥१४॥
आणि पूर्ण अहंता वेठलो । सैघ आम्हिच दाटलो । मा लोपलो ना प्रगटलो । कोण्हाहूनि ॥१५॥
आप आपणापे । निरूपन काय वोपे । की उगेपणे हारपे । ऐसे आहे ॥१६॥
ह्मणोनि माझी वैखरि । मौनाते ह्मणे मौन धरी । हे पाणियावरि मकरि । रेखिलि पा ॥१७॥
एवं दशोपनिषदे पुढारि न ढाळिति पदे । देखोनि बुडि बोधे । दीधलि येथे ॥१८॥
ज्ञानदेव ह्मणे श्रीमत् । हे अनुभवामृत । सेवोनि जीवन्मुक्त । होवोत ऐसे ॥१९॥
मुक्ति कीर वेल्हाळ । ते हे अनुभवामृत निख्खळ । अमृतही घोटि लाळ । अमृते येणे ॥२०॥
निशिनिशीचाही चांद होय । परि पुनवेचा अनूचि आहे । हे कां मी ह्मणो लाहे । सूर्यदिठि ॥२१॥
प्रिया सवाइलि होय । तै अंगिचा अंगि न समाये । यर्‍हवि तेथेचि आहे । तारुण्य की ॥२२॥
वसंताच्या आल्या । फुलि फळि आपुल्या । गगनि पेलति ढाळ्या । फैलति झाडे ॥२३॥
यालागि हे बालणे । अनुभवामृतपणे । स्वानुभूति परगुणे । वोगरिलि ॥२४॥
आनि मुक्त मुमुक्षु बध । तवंचि योग्यता भेद । अनुभवामृत स्वाद । विरुद्ध जवं ॥२५॥
गंगावगाहना आलि । पाणिये गंगाचि जालि । कां तिमिरे भेटलि । सूर्या जैसि ॥२६॥
जैसे अकारादि अक्षरा । भेटति पन्नास मात्रा । कां बोध जैसे सागरा । आंत आले ॥२७॥
नाहि परिसाचि कसवटि । तंवाचि वाणियाच्या गोठि । मग पंधरावियाच्या पाठि । बैसावे कीं ॥२८॥
तैसि तये ईश्वरि । अंगुलि नुभवेचि दूसरि । किंबहुना सरोभरि । शिवेसि तया ॥२९॥
ह्मणोनि ज्ञानदेवो ह्मणे । अनुभवामृते येणे । सण भोगिजे सणे । विश्वाचेनि ॥३०॥
इति श्री अनुभवामृते श्रीगुरुप्रतापग्रंथ - प्रशंसावर्णनन्नाम दशम प्रकरणम्

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP