मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|अनुभवामृत| प्रकरण २ रें अनुभवामृत प्रकरण १ लें प्रकरण २ रें प्रकरण ३ रें प्रकरण ४ थें प्रकरण ५ वें प्रकरण ६ वें प्रकरण ७ वें प्रकरण ८ वे प्रकरण ९ वें प्रकरण १० वें अनुभवामृत - प्रकरण २ रें वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी प्रकरण २ रें Translation - भाषांतर आता उपायवनसंतु । जो अज्ञेचा अहेवतंतु । अमुर्तचि मूर्तु । कारुण्याचा ॥१॥ मोडोनि माया - कुंजरु । मुक्त - मोतियाचा वोगरु । जेवविता श्रीगुरु । निवृत्ति वंदु ॥२॥ अविद्येचे आटवे । भुंजित जीवपणाचे भवे । तया चैतन्याचिये धावें । धावेकरु जो ॥३॥ जयाचेनि अपांग - पति । बंध मोक्षपणियाते । भेटे जाणतया जाणते । जयापासि ॥४॥ कैवल्यकनकाचिया दाना । न कडसि थोरसाना । द्रष्ट्याचिया दर्शना । पाहाडाउ जो ॥५॥ सामर्थ्याचेनि बिके । शिवाचेहि गुरुत्व जिंके । आत्मा आत्ममुख देखे । आरसा जिये ॥६॥ बोधचंद्राचिया कळा । विखुरलिया एकवळा । कृपापुणिव लीळा । करि जयाचि ॥७॥ जो भेटलिया सवें । पुरति उपायाचे धावें । प्रवृत्तिगंगा स्थिरावे । सागरि जिये ॥८॥ जयाचिये अनवसरे । द्रष्टा ले दृश्याचे मोहिरे । जो भेटतखेवो सर । बहुरूप हे ॥९॥ अविद्येचे काळवखे । स्वबोध सुदीन फांके । सिवतिलेनि प्रसाद - अर्के । जयाचेनि ॥१०॥ जयाचेनि कृपाललिले । जीव हा ठाववरि पाखाळे । जे शिवपणहि वोवळे । आंगि न लावि ॥११॥ राखो जाता शिष्याते । गुरुपन धाडिले थिते । तरि गुरु गौरव तयाते । सांडिचि ना ॥१२॥ एकपण नव्हे सुसास । ह्मणोनि शिष्याचे करोनि मिष । पाहाणेचि आपलि वास । पाहतसे ॥१३॥जयाचे कृपातुषारे । परतले अविद्येचे महुरे । परिनमले अपारे । बोधामृते ॥१४॥ वेद्या देता मिठि । वेदकत्व सुवोनि पोटि । तरि नव्हेचि उसिटि । दिठि जयाचि ॥१५॥ जयाचेनि सावाये । जीव ब्रह्म उपरि लाहे । ब्रह्म तृणतळि जाय । उदासे जेणे ॥१६॥ उपास्तिवरि राबतया । उपाय फळे येति मोडुनिया । बन चळे जयाचिया । अनुज्ञा कां ॥१७॥ जयाचा दिठिवा वसंतु । न रिघे निगमवना आंतु । तव आपुलिया फळा हातु । न घापति ॥१८॥ पुढे दिठिचेनि अलगे । खांचि कि निवटि मागे । येव्हडिया जैता नेघे । आपणपे जो ॥१९॥ लघुत्वाचिया मुद्दले । बैसला गुरुत्वाचिये सेले । नासोनिया नाथिले । सदेव जो ॥२०॥ नाही त्या जळि बुडिजे । तेथे घनवटे येणे तरिजे । जेणे तरलियाहि नुरिजे । कवणिये ठांई ॥२१॥ जेथे आकाश हे सावेव । न बांध अवकाशाचि हाव । ऐसे कोणि एक भरिव । आकाश जे ॥२२॥ चंद्रादि सुशीतळे । घडिले जयाचेनि मेळे । सूर्य जयाचे उजळे । कडवसेनि ॥२३॥ जीवपणाचेनि त्रासे । यावया आपुले दशे । शिवहि मुहुर्त पुसे । जया जोसिया ॥२४॥ चांदनें स्वप्रकाशाचे । लेइला द्वैत - दुणिचे । तरि उघडेपण न वचे । चंद्राचे जया ॥२५॥ जो उघड कि न दिसे । प्रकाश परि न प्रकाशे । असतेपणेचि नसे । कवणिकडे ॥२६॥ शब्दाचि लिहि पुसे । तेव्हा तेणेसि चावळो बैसे । दुजियाचा रागि रुसे । एकपणाहि हा ॥२७॥ कांहीबाहि अळुमाळ । देखे जव येखादे वेळ । तव देखतेहि टवाळ । जया गांवि ॥२८॥ आता जो तो इहि शद्बि । के मेळउ अनुमानाचि मांदि । हा प्रमाणाहि वो नेदी । कवणाहि मा ! ॥२९॥ प्रमाणाचि परिसरे । तै प्रमेय आविष्करे । नवल मेचु धुरे । कांहिनापणाचि ॥३०॥ तेथें नमने कां बोले । केउति सुउ पाउले । अंगि लाउनि नाडिले । नाम येणे ॥३१॥ नाहि आत्मया आत्म - प्रवृत्ति । वाढविता के निवृत्ति । परि या नामाचि वाय बुंथि । सांडिचिना ॥३२॥ निवर्त्य तव नाहि । मा निवर्तवि हा काई । तरि कैसा बैसे ठांई । निवृत्तिनामाचा ॥३३॥ सूर्यासि अंधकारु । कै जाला होता गोचरु । परि तमारि हा डगरु । आलाचि कीं ! ॥३४॥ लटिके येणे रूढे । जड येणे उजियेडे । न घडतेहि घडे । याचिया मावा ॥३५॥ हांगा मायावसे दाविसि । आणि माईक ह्मणोनि वाळिसि । अमाइक तवं नव्हसि । कोणा विषो ! ॥३६॥ शिव शिव सद्गुरु । तुजला गूढा काय करु । एकाहि निर्धारा धरु । देतासि कां ॥३७॥ नामरूपे बहुवसे । पुढा उभारुनि पाडिलि वोस । सत्तेचेनि अवेशे । तोषलासि ॥३८॥ जीव घेतलियावीण । चाळु नेणसी साजन । भृत्यु नुरे, स्वामिपण । तेंहि नव्हे ॥३९॥ विशेषाचेनि नावें । आत्मत्व तेहि न साहवे । किंबहुना न व्हावें । कांहीच यया ॥४०॥ रात्रि नुरेचि सूर्या । नुरे लवण पाणिया । नुरेचि चेइलिया । नीद जैसि ॥४१॥ कापुराचि थळीव । नुरवि आगिचि बरव । नुरेचि रूप - नाव । तैसे यया ॥४२॥ याचिया हाता पाया पडे । तव वंद्यत्वे पुढा न मंडे । न पडेचि हा भिडे । भेदाचिये ॥४३॥ आपणाप्रति रवी । उदयो न करि जेवि । हा वंद्य नव्हेचि तेवि वंदिताहि ॥४४॥ कां समोरपण आपले । न लाहिजे कांहि केले । तैसे वंद्यत्व घेतले । हारोनि येणे ॥४५॥ आकाशाचा अरिसा । नुठे प्रतिबिंबाचा ठसा । हा वंद्य नव्हे तैसा । नमस्कारा ॥४६॥ हा नव्हे तरि न हो । हे वेखासी कां घेवो । परि वंदितयाहि ठावो । उरोचि नेदि ! ॥४७॥ अंगोनि एक ना झोळु । फेडिता तो बाहेरिलु । कट फिटे आंतिलु । न फेडिताचि ॥४८॥ ना ना बिंबपणासरिसे । घेउनि प्रसिबिंब नासे । नेले वंद्यत्व येणे तैसे । वंदितेनसि ॥४९॥ नाहि रूपाचि जेथे सोय । तेथे दिठिचे काय आहे । आह्मा फळले पाय । ऐसि दशा ॥५०॥ गुणा - तेलाच्या सोइरिका । निर्वाहिलि दीपकळिका । ते काय होईल पोळिका । कापुराचा ॥५१॥ तया दोघा परस्परे । होइना जव मेळिरे । तंव दोहिचेहि सरे । सरिसेचि ॥५२॥ तेवि वंदिना मी ययाते । तव गेले वंद्य वंदिते । चेइलिया कांते । स्वप्निचे जेवी ॥५३॥ किंबहुना यया भाखा । अद्वैताचा उफखा । फेडोनिया स्वसखा । श्रीगुरु वंदिला ॥५४॥ याचा सख्यत्वाचि नवाई । आंगि येकपणाहि ठाव नाहि । किं गुरु - शिष्य - दुवाई । पवाडु केला ॥५५॥ कैसा आपणा आपण । दोविण सोइरेपण । हा याहूनि विलक्षण । नाहि ना नोव्हे ॥५६॥ जग अवघे पोटि माये । गगनायेव्हडा होउन ठाये । कि ते नीस न साहे । नाहिपणाचि ॥५७॥ कां पूर्णते तरि अधार । सिंधु जैसा दुर्भर । तैसा विरुद्धा पाहुणेर । ययाचे घरि ॥५८॥ तेजा तमा कांहि । परस्परे निके नाहि । परि सूर्याचे ठांई । सूर्यचि होति ॥५९॥ एक ह्मणता भेदे । तो कि नानात्वे नांदे । विरुद्धे आपणा विरुद्धे । होति काई x ॥६०॥ म्हणोनि शिष्य - गुरुनाथ । या दो शब्दाचा अर्थ । श्रीगुरुचि होत । दो ठांई ॥६१॥ सुवर्ण आणि लेणे । वसे एके सुवर्णे । कां चंद्र आणि चांदणे । चंद्रि जेविं ॥६२॥ कापुर आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडि आणि गुळु । गुळचि तो ॥६३॥ तैसा गुरु - शिष्य - मिषे । हाचि एकला उल्हासे । जरि कांहि दिसे । दोनपणे ॥६४॥ मुख असे मुखि । आरसा दिसे उखि । हे आपलि वोळखि । जाणे मुख ॥६५॥ पाहा पा निरंजनि निदेला । तो निर्विवाद एकला । परि चेता चेवविता जाला । दोन्हि तोचि ॥६६॥ जे तो चेता चेववी । तेवि हा बुझे बुझावि । गुरु - शिष्य त्व नांदवि । ऐसेनि हा ॥६७॥ दर्पणेवीण डोला । आपले भेटिचा सोहळा । भोगिता तरि लीळा । सांगतो हे ॥६८॥ एवं द्वैता उमसो । नेदूनि ऐक्या विसकुसो । सोइरिकिचा अतिसो । पोखित असे ॥६९॥ निवृत्ति जया नावं । निवृत्ति जया बरव । जया निवृत्तिचि राणिव ॥७०॥ वांचोनि प्रवृत्तिविरोधे । निवृत्तिचेनि बोधे । आणिजे तैसा बाधे । निवृत्ति नव्हे ॥७१॥ आपणा देउनि राति । दिवसा आणि उन्नति । गोसावि हा निवृत्ति । तैसा नव्हे ॥७२॥ वोपसळेचे बळ । घेवोनि मिरवे रत्नकील । तैसा नव्हे हा नि:खळ । चक्रवर्ति ॥७३॥ गगन सुवोनि पोटि । जै चंद्राचि पघळे पुष्टि । तै चांदणिया उटि । अंगाचि कीजे ॥७४॥ तैसे निवृत्तिपणा कारण । हाचि आपणया आपण । फुलचि जाले घ्राण । आपुलें दृति ॥७५॥ दिठि मुखाचे बरवे । जरि पाठिकडोनि फावे । तरि अरसे धांडोळावे । लागति काई ॥७६॥ कां राती गेलिया । दिवस हान आलिया । काय सूर्यपणें सूर्या । व्हावें असे ॥७७॥ म्हणोनि बाध्य बाधूनि । घेपे प्रमाणे साधूनि । तैसा नव्हे भरवसेनि । गोसावीम हा ॥७८॥ ऐसे करणियेवीण । स्वयंभ जे निवृत्तिपण । तयाचे श्रीचरण । वंदिले ऐसे ॥७९॥ आता ज्ञानदेवो म्हणे । श्रीगुरुप्रमाणे येणे । फेडिलि मिया ऋणे । चहू वाचेची ॥८०॥ इतिश्री अनुभवामृते श्रीगुरुवंदनं नाम द्वितीय - प्रकरणम् ॥ N/A References : N/A Last Updated : November 25, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP