मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|अनुभवामृत| प्रकरण ४ थें अनुभवामृत प्रकरण १ लें प्रकरण २ रें प्रकरण ३ रें प्रकरण ४ थें प्रकरण ५ वें प्रकरण ६ वें प्रकरण ७ वें प्रकरण ८ वे प्रकरण ९ वें प्रकरण १० वें अनुभवामृत - प्रकरण ४ थें वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी प्रकरण ४ थें Translation - भाषांतर आता अज्ञानाचेनि मारे । ज्ञान अभेदे वावरे । नीद सारोनि जागेर । नांदिजे जेवि ॥१॥ कां दर्पणिचा निघाला । ऐक्यबोध पाहिला । सुख भोगि आपला । आपणचि ॥२॥ ज्ञान जिया तियापरि । जगि आत्मैक्य करि । तै सुरिया खोचे सुरि । तैसे जाले ॥३॥ लावि आंत ठावोनि कोपठा । तो साधि आपणासगटा । कां बांधे आपणया चोरटा । मोटेमाजि ॥४॥ आगि पोतासाचेनि मिषे । आपणपे जाळिले जैसे । ज्ञाने अज्ञाननाशे । तैसे केले ॥५॥ अज्ञानाचा टेंका । नसताहि ज्ञान अधिका । फांके जव उपखा । आपलाहि पडे ॥६॥ दशाहि ते निमालिया । येणे जे उवाया । ते केवळ नाशावया । दीपाचे परि ॥७॥ उठणे कि पडणे । कचराभाराचे कोण जाणे । फांकणे कि सुकणे । जाईउळाचे ॥८॥ तरंगाचे रूपा येणे । तयाचि नाव निमणे । कि विजुचे उदैजणे । तोचि अस्तु ॥९॥ तैसे खाउनि अज्ञान । तंवरिच वाढे ज्ञान । जव आपले निधन । नि:शेष साधि ॥१०॥ जैसे कल्पांतिचे भरते । स्थळा जळा दोहिते । बुडविल्या अरेति । राहोचि नेणे ॥११॥ कां विश्वाहि वेगळ । वाढे जै सूर्यमंडळ । तै तेज - तम नि:खळ । तेचि होय ॥१२॥ ना निद मारुनि । आपणपेहि नुरोनि । जागणे ठाके होउनि । जागणे जे ॥१३॥ तैसे अज्ञान अटोनिया । ज्ञान येत जे उवाया अवं । ज्ञाने ज्ञान गिळोनिया । ज्ञानचि होय ॥१४॥ ते वेळि पुनवा भरे । ना अंवसे सरे । ते चंद्रि उरे । सत्रावि जैसि ॥१५॥ कां तेज्यांतरे नाटोपे । कोण्हे तमे न वासिपे । ते उपमेचे जाउपे । सूर्य नव्हे ॥१६॥ ह्मणोनि ज्ञाने उजळे । कां अज्ञानकरि रुळे । तैसे नव्हे निर्वाळे । ज्ञानमात्र जे ॥१७॥ परि ज्ञानपणे नि:खळ । तोचि कि तया कळे । काय देखिजे बुबुळे । बुबुळाते ॥१८॥ आकाश आपणया रिघे । आगि आपणया लागे । आपला माथा वळवे । आपण कोण्ही ॥१९॥ दिठि आपणया देखे । स्वाद आपणया चाखे । नाद आपले आइके । नादपण काई ॥२०॥ सूर्य सूर्याते विवळे । कां फळ आपणया फळे । परिमळ परिमळे । घेपत असे ॥२१॥ तैसे आपणया आपण । जाणते नव्हे जाण । म्हणोनि ज्ञानपणेवीण । ज्ञानमात्र जे ॥२२॥ आणि ज्ञान ऐसि सोय । ज्ञानपणेचि जरि साहे । तरि अज्ञान हे नोव्हे । ज्ञानपणेचि ॥२३॥ जैसे तेज जे आहे । ते अंधार कीर नव्हे । मा तेज तरि होय । तेजासि काई ॥२४॥ म्हणोनि जाणने नेणने । हे नाहिच जया होणे । आता मिथ्या ऐसे येणे । बोले गमे ॥२५॥ कांहिच नाहि सर्वथा । ऐसि जरि व्यवस्था । तरि नाहि हे प्रथा । कोण्हासि पा ॥२६॥ शुन्य - सिद्धांत - बोधु । कोण सत्ता होय सिद्धु । नसताचि अपवादु । वस्तुसि हा ॥२७॥ मालविता दिवे मालविता जरि मालवे । तरि दीप नाहि हे फावे । कोण्हासि पा ॥२८॥ निदेचे आलेपने । निदेले ते जाय प्राणे । तै निद भुलि हे कोणे । अनुभवीजे ॥२९॥ घट घटपणे असे । तद्भंगे भंग आभासे । सर्वथा नाहि तेथे नसे । कोणे म्हणावे ॥३०॥ म्हणोनि कांहि - नाहि - पण । देखता नाहि आपण । ऐसे नहोनि आसणेपण । असणे जे ॥३१॥ परि आणिका कां अपणया । न पुरेचि विषो व्हावया । म्हणोनिहि असावया । कारण किं ॥३२॥ जो निरंजनि निदेला । आणिके नाहि देखिला । आपलाहि निमाला । आठव तया ॥३३॥ परि जिवे नाहि नोव्हे । तैसे शुद्ध आसणे आहे । बोलणे हि न साहे । आहे - नाहि - पणाचे ॥३४॥ दिठि आपणया मुरडे । तै दिठिपणाचि मोडे । परि नाहि नोव्हे हे फुडे । जाणोचि कि ॥३५॥ काळा राहे काळवखा । तो आपणा ना आणिका । न चोजवे तरि असिका । हा मि बाणे ॥३६॥ तैसे आसणे कां नसणे । हे कांहिच मा नसेपने । नसोनि जे आसणे । ठाये ठाव ॥३७॥ नि:खळपणे आपला । आकाशाचा संच उरला । तो स्वये असे पुढिला । कांहि ना कि ॥३८॥ कां अंगिके निर्मळपणि । हारतिलिया पोखरणि । ते आणिका वांचुन पाणि । सगळेचि अथि ॥३९॥ आपणा भागु तैसे । आसणेचि जे असे । असे नाहि ऐसे । सांडोनिया ॥४०॥ निदेचे नाहिपण । विझालिया जागरण । आसिजे । नेणो कोण । होउनिया ॥४१॥ कां भुई कुंभ ठेविजे । तै सकुंभता अपजे । तो नेलिया म्हणिजे । तेणेविण ॥४२॥ परि दोन्हिहि भाग । न शिवत भूमिचे अंग । ते वेळि ऐसे चांग । चोख जे आसणे ॥४३॥ इतिश्रीमत् अनुभवामृते अज्ञान - निरसन - शून्य - खंडनं नाम चतुर्थ प्रकरणम् ॥ N/A References : N/A Last Updated : November 25, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP