मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत मृच्छकटिक|अंक पहिला| भाग १४ वा अंक पहिला भाग १ ला भाग २ रा भाग ३ रा भाग ४ था भाग ५ वा भाग ६ वा भाग ८ वा भाग ९ वा भाग १० वा भाग ११ वा भाग १२ वा भाग १३ वा भाग १४ वा अंक पहिला - भाग १४ वा नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला. Tags : dramagovind ballal devalmrucchakatikगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीमृच्छ्कटिकसाहित्य भाग १४ वा Translation - भाषांतर चारु० : मैत्रेया , हे दागिने दिवसा वर्धमानकानें सांभाळावे आणि रात्री तूं सांभाळावे समजलास ? लोकाचे आहेत, ठेव आहे , नीट सांभाळ . वसंत० : आपली आज्ञा होईल तर मी मैत्रेयाला घेऊन घरी जाईन म्हणतें . चारु० : बरं आहे. मैत्रेया , जा - हिला पोंचवून ये . मैत्रे० : नाहीं - नाहीं ; मी नाही जाणार , आपणच जावें . या कलहंसगामिनीच्या मागें आपण गेलात म्हणजे राजहंसाप्रमाणे शोभाल. मी आपला गरीब ब्राह्मण . मी जर इच्यामागून गेलो तर चव्हाट्यावर टाकलेल्या भाकरीच्या तुकड्याला जशीं कुत्री लगटतात , तसे गांवचे टवाळ लोक मला फाडून खातील ! म्हणून म्हणतों कीं , आपणच जावें . चारु० : बरें तर , मी जातों .राजमार्गांत मनुष्याची स्पष्ट ओळख पटण्यासारखी एक मशाल लावायला सांग. ( आत जातो . )मैत्रे० : वर्धमानक, दिवटी पेटव पाहूं ! वर्ध० : महाराज , घरांत एक तेलाचा थेंबहि नाहीं आणि दिवटी कसली पेटवूं ?मैत्रे० : ( आपल्याशीं ) गणिका जशा स्नेहशून्य होऊन निर्धन पुरुषाचा अपमान करितात तशी आमची दिवटीसुध्दां स्नेहशून्य झाली ! * वसंतसेना :पद -- ( चाल -- आज रहो मेरे प्यारे. ) काय कळे ही सदना आली ॥धृ०॥ सपरिवार ती लक्ष्मी जातां ॥कुदशा भेसुरी आंत रिघाली ॥१॥ मित्र परिजनीं पूर्ण असावें ॥उदास दिसतें तें या कालीं ॥२॥ जैसी तरुची पालवि गळतां ॥उरे शुष्कता ती स्थिती झाली ॥३॥चारु० : ( येऊन ) अरें , दिवटी नको म्हणून सांग ; कारण हा पहा - पद -- ( राग कानडा. त्रिताल. ) रजनिनाथ हा नभीं उगवला ॥ राजपथीं जणुं दीपचि गमला ॥धृ०॥नवयुवतीच्या निटिलासम किती ॥ विमल दिसे हा ग्रहगण भोंवतिं ॥शुभ्रकिरण घन तिमिरीं पडतीं ॥ पंकीं जेविं पयाच्या धारा ॥१॥( सर्व जातात . ) - अंक पहिला समाप्त - N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP