मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक|संगीत मृच्छकटिक|अंक पहिला| भाग १३ वा अंक पहिला भाग १ ला भाग २ रा भाग ३ रा भाग ४ था भाग ५ वा भाग ६ वा भाग ८ वा भाग ९ वा भाग १० वा भाग ११ वा भाग १२ वा भाग १३ वा भाग १४ वा अंक पहिला - भाग १३ वा नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला. Tags : dramagovind ballal devalmrucchakatikगोविंद बल्लाळ देवलनाटकमराठीमृच्छ्कटिकसाहित्य भाग १३ वा Translation - भाषांतर मैत्रे० : मित्रा , राजशालकाचा तुला कांही निरोप आहे. चारु० : तो कोणता ?मैत्रे० : तो म्हणाला , धनकनकसंपन्न अशी जी कलावंतिणीची पोरगी वसंतसेना ती कामदेवाच्या उत्सवापासून तुझ्यावर अनुरक्त झाली आहे. आम्ही बलात्काराने तिला वश करीत असतां आतां ती तुझ्या घरात शिरली . वसंत० : " बलात्कारानें तिला वश करीत असतां " असें जर तो खरेंच म्हणत असेल तर मला हे एक भूषणच आहे. मैत्रे० : तिला जर मुकाट्याने माझ्या स्वाधीन करशील तर, सरकारांत गेल्याशिवाय माझा खटला तूंच संपविलास असें होऊन मी तुझ्यावर कृपा करीन .आणि तसे जर न करशील तर मरेपर्यंत तुझे आणि माझे वैर राहील. चारु० : उं : ! तो काय मूर्ख आहे. -- ठुंबरीलाजवित ही सुरयुवतींसी ॥ तुलना नाहीं गुणरुपाशीं ॥धृ॥निर्धन मी समजुनि गेहीं ॥ जा म्हणतां ही गेली नाहीं ॥बहु पुरुषांचा परिचय तरिही ॥ वदली नाहीं शब्द कसा मसिं ॥१॥वसंत० : ( मनांत ) कितीतरी याची सभ्य रीति ही ! आणि भाषण तरी किती मधुर ! असो. अशाबरोबर आज येथे राहणे चांगले नाही. (उघड ) महाराज, आपली मजवर पूर्ण कृपा असेल तर माझी एक विनंती आपण मान्य करावी . हे माझे दागिने सांभाळावे ; कारण यांच्यापायी त्या दुष्टांनी माझी पाठ पुरविली आहे. म्हणून म्हणतें , हे आपण सांभाळावे. चारु० : प्रस्तुत तुझे अलंकार ठेवून घेण्यासारखें माझे घर नाही. वसंत० : हें आपण कांही तरी बोलतां . कोणी घर पाहून काही ठेव ठेवीत नाही - मनुष्य पाहून ठेवतें . चारु० : बरें , तुझा आग्रहच असेल तर ठेव . मैत्रेया , तेवढे अलंकार घे पाहूं . वसंत० : ( अलंकार देऊन ) आतां मात्र माझ्यावर आपली पूर्ण कृपा झाली. मैत्रे० : ( दागिने घेऊन ) वसंतसेने, तुझें कल्याण असो ! चारु० : अरे , तिनें तुला कांही धर्म नाहीं केला , ठेव ठेवली आहे. मैत्रे० : तर मग चोर कां नेईनात -- चारु० : आणि थोड्याच दिवसांनीं -- मैत्रे० : ही ठेव - चारु० : ती परत घेऊन जाईल . मैत्रे० : हं ! N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP