मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवसंहिता|तृतीय पटल| स्वस्तिकासनकथनम् तृतीय पटल योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन १ योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन २ योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ३ योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ४ योगानुष्ठानपद्धतिर्योगाभ्यासवर्णन ५ सिद्धासनकथनम् पद्मासनकथनम् उग्रासनकथनम् स्वस्तिकासनकथनम् तृतीय पटल - स्वस्तिकासनकथनम् महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे. Tags : shivasanhitaमराठीशिवसंहिता स्वस्तिकासनकथनम् Translation - भाषांतर गुडघा व मांडी यांच्यामध्ये बरोबर समानरूपाने पाय वर खाली ठेवावेत म्हणजे प्रथम उजव्या पायाचा तळवा, डाव्या पायाच्या गुडघा अर्थात् पोटरी व मांडी यांमध्ये ठेवावा आणि नंतर डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या पोटरी व मांडी यांमध्ये ठेवावा. त्यानंतर शरीर सरळ करून म्हणजे पाठ ताठ करून सुखपूर्वक आसन घालून बसावे. याला स्वस्तिकासन म्हणतात. या प्रकाराने बुद्धिमान् योग्याने वायूने साधन करावे. त्यामुळे त्याच्या शरीरात व्याधी प्रवेश करीत नाहीत व त्याला वायू सिद्ध होतो म्हणजे जो साधक हे साधन सिद्ध करतो त्याला कोणत्याच प्रकारचे कष्ट होत नाहीत. हे आसन सरळपणे सिद्ध होत असल्याने त्याला सुखासन असेही म्हणतात. सर्व दु:खांचा नाश करणार्या या स्वस्तिकासनाला किंवा सुखासनाला साधकयोग्याने गुप्त ठेविले पाहिजे. हे आसन सर्वश्रेष्ठ व अत्यंत कल्याणकारी आहे. ॥११८॥अशा प्रकारे श्रीशिवसंहितेतील हरगौरीसंवादयुक्त योगाभ्यासतत्त्वकथन नावाचे तिसरे पटल समाप्त झाले. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP