मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग आठवा| दांभिक भजन प्रसंग आठवा वेदांत वेदांती पंडित वेदभेदाची कुसरी भाव-भक्ति भाव-अभाव दांभिक भजन सोवळें वोंवळे प्रसंग समाप्ति प्रसंग आठवा - दांभिक भजन श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत दांभिक भजन Translation - भाषांतर जे दांभिक करिती गुरु निर्गुण भजन । ते अद्यापावरी न होती पावन । जैसें कानड्याच्या प्रेतालागुन । दांभिक गोरविलें ॥६६॥पळस पांगारे जासवंद फुलले । ते पहा सुगंधाविण व्यर्थ गेले । तैसें दांभिक भजन नाडले । भूषण दावूनियां ॥६७॥लोखंडाचे करुनी भांगार । वरी मुलामा सुवर्णाचा धूर । मिरविल्या अभिलाषिती तस्कर । तैसें दांभिक भजन ॥६८॥सुवर्ण होऊनि सोनटका मोहरा । कवंदी करूनि पांघरे पुरा । पवित्र पाततील नमस्कारा । द्रव्यहि पची पडेल ॥६९॥दांतसिलना लावूनि नटेदासी । हांसे नसतां उगलेचि दांत वासी । तैसें जालें दांभिक भजनासी । प्रेमें निज नेमेंविण ॥७०॥दांभिक यात्रे जाती यात्रेकरी । विजन क्रमितां चिंता परोपरी । जनग्राम देखोनि थरथरी । दांभिक दावावया ॥७१॥पंथीं चालतां विजनाभितरी । अंगसंगें नामालागीं तिष्ठे श्रीहरी । तेथें कां न करिती दांभिक थोरी । बोधें सद्भाव धरूनियां ॥७२॥विजनीं ध्वज पताका काठ्या छत्रें । गुंडुनि विरामती अपवित्रें । ग्राम लोक देखुनि अविचारें । अहंकारें हांका देती ॥७३॥अलंकार करुनियां वेश्या । उन्मत्त अविचारा दाविती कैशा । तैसें दांभिक दांभिका परियेसा । वित्पत्ति दावूं पाहे ॥७४॥सुंदर वेश्या केल्या सुवासिनी । त्या न पवती कुळपित्रा लागुनी । तैसे दांभिकासी चक्रपाणी । अधिकारीत ना ॥७५॥रूप अलंकाराविण कुलस्त्री । ते सवासिण पूर्वज अधिकारी । भूषण वाहे जनाभितरीं । पवित्र म्हणवूनियां ॥७६॥दांभिक भजनें वाढे भूषण । परी पदरीं कांही नाहीं पुण्य । जैसें बोलवितां किंगरी लागून । जनीं भला म्हणतील ॥७७॥पोकळ दांडी किंगरी तुंबडे । वाजविणार पोकळ जनांस आवडे । पुण्य निजपद कांही नातुडे । व्यर्थ दांभिकें दांभिका ॥७८॥दांभिका करितां साधे साधना । तो अधिक चढे देहाभिमाना । दृष्टीस सकळ जन दिसे व्याहणा । अपहंतपणें हुंबरे ॥७९॥झांकलें मुठीनें शेत पेरिती । बीज मागुतें कुळऊनि झांकिती । बहुत पेरूनि थोडेसें सांगती । मग ते उदंड पिके ॥८०॥ऐसें पुण्यसाधन गौप्य करावें । पाप घडेल तें प्रसिद्ध सांगावें । आर्तें साधुसंतांचें दर्शन घ्यावें । सद्भावे धरूनियां ॥८१॥देहीं असोनि देहाची निरास । जनीं विजनीं सोऽहं उदास । तरी सत्य चुकेल गर्भवास । सद्गुरु सेवेनें ॥८२॥शेख महंमद विनवी आनंदकंदा । तुवा मज मलेवंस केलें परमानंदा । विटाळ भाऊन म्हणती अविंधा । विप्र शुद्र मातें ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP