TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रसंग आठवा - वेदांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


वेदांत
ॐ नमोजी अलक्ष अगम्‍य अगोचरा। निज निवांत खाणीवाणीच्या माहेरा । तुज वर्णितां अव्यक्त दिगंबरा । शिले वेद श्रुती ॥१॥
वेद श्रुती ‘नेति नेति’ म्‍हणती । विधि मतें शास्त्रें भांबावती । सद्‌गुरुकृपेविण नाहीं विश्रांति । या निजपदाची ॥२॥
चारी वेद ईश्र्वरापासूनि जाले । परी ईश्र्वरां नेणतां काळवंडले । उलथोन बाहेर पडले । जैसें तांट दाण्याचें वेगळें ॥३॥
तांट दाण्याची एक असे मिळणी । परी तांट नेणेंचि दाण्यालागुनी । तांट चिरल्‍या दाणा न दिसे नयनीं । तैसें दाण्यांत तांट असे ॥४॥
जीव शरीर जाणे त्‍या नखास । नख नेणें जीव शरीरास । तैसा वेदांचा ईश्र्वरीं स्‍पर्श । आथीच ना श्रोते हो ॥५॥
उदकापासाव घृत तेल जालें । परी तें उदकास नेणतां व्यर्थ गेलें । मागुतें उदकामाजि मेळविलें । मिळणीं मिळे ना ॥६॥
निवडे तेल घृत मिळे जळा । तरी वेद ईश्र्वरासी जाणें तात्‍काळा । ऐशा श्रुती साक्षी वेगळाल्‍या बरळा । बोलतां पाप जोडे ॥७॥
मन जिव्हा जाणें षड्रसांची चवी । तैसाच पाहिजे स्‍वयें अनुभवी । नाहीं तरी आण गुंतला आणिकां गोंवी । कांतणी जाळिंद्री जैसा ॥८॥
स्‍वयें उगवला आणिकांते उगवी । जैसा स्‍वयें उजेडला रवि । निशीनें गुंतलीं त्‍यांतेंहि उगवी । पर उपकार करूनियां ॥९॥
जन्म उगवलिया उपकारसमान । आणिक न दिसे दुसरेपण । अनेक उपकार केले संतजनें । पुन्हां मागुती पाविजेती ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:13.9070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डचक

  • स्त्रीपु . १ धडकी ; दचक ; धसका ; धक्का ( भीतीने , दुःखाने एकाएकी बसलेला ). ( क्रि० बसणे ). २ आगामी संकटाची पूर्वकल्पना , सूचना ; हुरहुर ; अपशकुन . ( क्रि० येणे ; वाटणे ). ३ पोटात एकाएकी होणारी खळबळ , कालवा - कालव . [ ध्व . डच ! ] डचकणे - अक्रि . १ चकित होणे ; चमकणे . २ भिणे ; दचकणे ; भेदरुन जाणे . 
  • f 
  • डचका m  A sudden impression of terror or grief, a shock, a blow. 
  • v  बस. Sudden rising from the stomach. 
RANDOM WORD

Did you know?

जपाची संख्या १०८ का ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.