मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पहिला| ‘सि’ कार प्रसंग पहिला ईश्वर स्तवन - ॐ कार ‘न’ कार ‘म’ कार मातृपितृ वंदन ‘सि’ कार ‘ध’ कार लेखनप्रशस्ति सद्गुरूची आज्ञा-लेखन लेखन अनुभवी असावें पंचमा-कृपा प्रसंगसमाप्ति प्रसंग पहिला - ‘सि’ कार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत ‘सि’ कार Translation - भाषांतर नमस्कारिला तो माता पिता । ज्याचेनि जोडिला सद्गुरु दाता । तेव्हां आत्मज्ञानें कथा वार्ता । चर्चित जालों ते अवधारा ॥४४॥मग नमस्कारिला मातापिता । तिहीं आशिर्वाद दिधला पुरता । जयवंत होई सूरिजनसुता । सद्गुरुचरणीं ॥४५॥आतां इतुका घेऊनियां ‘ना-भी’ कार । पुढें नमीन ते योगेश्र्वर । मग त्यांचे कृपेचे अंकुर । फुटती मज दीनाला ॥४६॥‘म’ अक्षर मागें सरल्याउपर । पुन्हां ‘सि’ आरंभिली साचार । वर्णावया साधकेश्र्वर । आरंभ केला आतां ॥४७॥शीघ्र सिद्धांत ते साधक । ज्याच्यानें तरे हा विश्र्वलोक । भावभक्तीचा होय अभिषेक । चरणीं जयाचे ॥४८॥सीमा त्याची थोर असे जाणा । कथितां नयेचि या वदना । ते खांब या त्रिभुवना । धीर मेरु जैसे ॥४९॥‘सि’ न जेथें कांही न उमटे । दर्शन जालिया भवबंधन तुटे । सेवा घडल्या त्रिगुण फाटे । शीघ्र हेळमात्रें ॥५०॥सिंधु तुका न येचि अवधारा । बहु थोर परी उदकें असे खारा । रवि शशि नव लक्ष तारा । तेहि फेरे खाती ॥५१॥‘श्री’कारी ॐ नमोजी नारायण । ‘या अल्ला’ म्हणती यवन । यावेगळें अनेक स्तवन । साही दर्शनांची ॥५२॥‘सि’ शिरोनि शून्यीं मीनमार्गें । घेतलीं सिद्धसाधुसंतांचीं अंगें । रुसल्याविण समजाविली भिंगें । विपरितांचीं सुपरितें ॥५३॥यालागीं स्वयें शरण आलों तुम्हांस । बोले शेख महंमद उदास । कृपा करूनियां सेवकास । ग्रंथासि आज्ञा द्यावी ॥५४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP