चंद्रभट ऊर्फ बोधलेः (१) एकनाथवर्णनः
शेख महंमदांनीं पंधराव्या प्रसंगांत सांगितलें की चांद बोधले यांनीं एकनाथाचे गुरु जे जनार्दनपंत त्यांना उपदेशिले. एकनाथानें चतुःश्र्लोकी भागवतावरील टीकाग्रंथ प्रथम केला. या ग्रंथाचे शेवटी त्यांनी एका ‘चंद्रनामा द्विजवरा’ चा उल्लेख केला आहे. तो असाः ‘‘तेवी चतुःश्र्लोकी भागवत । कैसेनि जालें हस्तगत । प्रवर्तावया कारण येथे । ऐका सुनिश्र्चित सांगेन मी ॥११७॥
गोदावरी उत्तर तीरीं । चौ योजनीं चंद्रगिरी । श्रीजनार्दन तेथवरी । दैवयोगें फेरी स्वभावें गेलों ॥११८॥
तो अति दीर्घ चंद्रगिरी । तळीं चंद्रावती न गरी । स्वयें चंद्रनाम द्विजवरीं । वस्ती त्याचे घरीं सहज घडली ॥११८॥
तेणें चतुःश्र्लोकी भागवत । वाखाणिलें यथार्थ युक्त । तेणें श्रीजनार्दन अद्भुत् जाला उत्पुलित स्वानंदें पैं ॥१२०॥
तेणें स्वानंदें गर्जोन । श्रीमुखें स्वयें जनार्दन । बोलिला अति सुखावून । हें वर्णीं गुह्यज्ञान देशभाषा ॥१२१॥’’.
Translation - भाषांतर
N/A