मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|चरित्र| भाग १० चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४ भाग १५ भाग १६ भाग १७ भाग १८ भाग १९ भाग २० भाग २१ भाग २२ भाग २३ भाग २४ भाग २५ भाग २६ भाग २७ भाग २८ भाग २९ भाग ३० भाग ३१ भाग ३२ भाग ३३ भाग ३४ शेख महंमद चरित्र - भाग १० श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग Translation - भाषांतर चवदावा प्रसंगः‘‘गीता भागवत पुराण । अनेक ग्रंथ शास्त्रें गहन । पदें कथिलीं सद्गुरुनाथानें । अनंत नांवें धरून ॥४०॥....गीता भागवतीं वनमाळी । वाखाणीं भक्तांचीं ब्रीदावळी । म्हणे भक्त माझी निज रांगोळी । स्वहृदयीं जपतसे ॥६५॥......गीता भागवत वचनीं । सांगितलें अर्जुना उद्धवालागुनी । पाषाण पुजितां पाषाण होती मेदिनीं । कृष्ण म्हणे कर्मफळ ॥८२॥ .....निबंध साक्ष वचनें । .....॥८३॥...ते सत्य श्रीमुखाची टीका ।.....॥८५॥....हृदयीं व्हावें सावधान । गोदानीर न्यायें ॥१२८॥ गोदानीर ताविल्या तापतें । निवविल्या निवतें नासतें । तैशी नव्हेत ही साधुमतें । अनादि सिद्ध शुचित ॥१२९॥ ....... शेख सैय्यद महंमद महंमदीं ।...॥१३१॥’’---१३१ ओंव्या.पंधरावा प्रसंगः‘‘ॐ नमोजी श्रीसद्गुरु चांद बोधले । त्यांनीं जानोपंता अंगिकारिलें । जानेबानें एका उपदशिलें । दास्यत्वगुणें ॥१॥.....सत् चांद बोधल्याचें कुळीं शेख । महमंमदांनीं चर्चिला विवेक । ते विवंचनेला संत प्रश्र्निक । आशिर्वाद देती ॥४॥ पादशाहानें मना केली बगणी (वांगणी ?) । चांद बोधले अजमतेचे धणी । त्यांणी त्याची मना कली हागणी । हे विश्र्व साक्ष असे ॥५॥ नृपति लागले बोधल्याचे चरणीं । मग त्यांनीं मोकळी केली हागणी । मग आनंद जाला क्षेत्र भुवनीं । दरुशनें पुजिलीं ॥६॥ हें सांगावया काय कारण । म्हणती शेख महंमदालागून । कोठील पुसा कोणाचा कोण । यालागीं प्रगटिलें ॥७॥ ......पापें.... । काशीवास तुळापूर केलया अपार । फिटेत ना वज्रलेपें ॥५४॥......ऐका मनुष्यहत्येचें पातक । न फिटे तुळापूर केल्या अभिषेक ।.......॥८०॥’’सोळावा प्रसंगः‘‘मुसलमानांत होऊनिया पिरु । मराठियांत म्हणवी सद्गुरु । तोचि तारील हा भवसागरु । येर बुडोन बुडविती ॥५७॥....एक म्हणती हा यातीचा मलवंश (म्लेंच्छ) । भ्हणवून निखंदितों आमच्या देवतांस । याचा मानूं ना आम्ही विश्र्वास । प्रतिमा निखंदिल्या ॥६२॥ देखत अविंध देवळें मोडिती । हा तो त्यांचाच स्वयाती । येणें प्रतिमेची केली माती । आतां काय पुजावें ॥६३॥ यवन देवतांस करिती मार । हे तंव चालिलें असे पारंपार । आम्ही वंदूं ना याचें उत्तर । हा त्यांचाच गोत्या ॥६४॥ ऐका प्रतिउत्तर दीधलें । म्लेंच्छ याति ईश्र्वरें केलें । परी ज्ञान कोणासारिखें नाहीं जाले । शेख महंमद म्हणे ॥६५॥ अविंध यातीस निपजलों । कुराण पुराण बोलों लागलों । सिद्धसाधकांस मानलों । स्वहित स्वहितागुणें ॥६६॥’’---११४ ओंव्या.सतरावा प्रसंगः ‘‘सच्चा पीर कहे मुसलमान । मराठे म्हणती सद्गुरु पूर्ण । परी दोन्हींत नाहीं भिन्नत्वपण । आंखी खोल देखो भाई ॥३॥.....शेख महंमदें उत्तर दिधलें प्रीति । मी नेणें कुशलता व्युत्पत्ती । संस्कारी पंडित हांसती । शुद्ध भाषा नेणें मी ॥४९॥ मी यातीचा मलवंश [म्लेंच्छ] । संस्कार नेणें मर्हाठीस । बोल ठेविती कवित्वास । कुशल ज्ञानी ॥५०॥ महाराष्ट्रभाषा बोलणें बोली । सांगेन अंतरीचीं सखोली । विवंचना करून वेगळाली । श्रोतीं गुह्य घ्यावें ॥७६॥’’ ---२४० ओंव्या.अठरावा प्रसंगः‘‘......साधे तुळापूर तीर्थ व्रत ।.....॥८२॥ सैय्यद ब्राह्मण उत्तम वंशी । कार्य नाहीं याति नांवासी ।....॥१५१॥ सैय्यद ब्राह्मण उत्तम याति । भ्रष्ट अनाचारें वर्तती ।....॥१५२॥ शेख महंमद मुसलमान ।---१०६ ओंव्या.बोलिले हरि जोडे ऐसी खूण ।....॥२१३॥....यवन म्हणती अनाधजाल काफर । मर्हाटे म्हणती कलंकी अवतार । तो करील अवघा एकाकार । ईश्र्वर म्हणतील आपणास ॥२६९॥....मीरां महंमदी मुसलमान । ते आल्याची सांगेन खूण ।....॥३०४॥.....सैय्यद महंमदी सावकाश । सम चिन्हाकार ॥३२७॥’’---३२८ ओंव्या. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP