मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता| पहिला पाऊस प्रकाशित असंग्रहीत कविता अप्रकाशित कविता पहिला पाऊस प्रेम आणि आशा आई, हें पहिलेंच चुंबन तुझें राष्ट्रीय गीत अर्वाचीन फ़ारशी चंबळच्या तीरावर केवळ मायभूमीसाठी कुणी श्रमती, कुणी रमती मागे अस्तन्या सारूं ऐका निमिषाचें स्मारक स्फ़ुट श्लोक कां कुणी एकाचा अभिमान् ? अर्पण श्लोक असंगृहीत कविता - पहिला पाऊस डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन पहिला पाऊस Translation - भाषांतर [ वृत्त : वधूवल्ली ]भिरभिर वारा नाचत आला,धूळ उधळली दिशादिशांलागुदमरला जिव, व्याकुळ झालारंग गगनाला ये धूसर, धूमल, काळा. १कृष्णवीर दक्खनचे चढले,क्षेत्र व्यापुन व्यूढ जाहले,टणात्कार मग होऊं लागले,तरू रे श्याम लागले डोलुं बेफ़ाम. २म्लान तप्त थकलेली अवनी क्लेश उमटले तिचिया वदनींडोळे लावुन वरती गगनींपडली अबला सांगेल दुक्ख कवणाला ? ३गगनश्रीला थोर उमाळाआईच्या प्रेमाचा आला,कण्ठ दाटला, ऊर दाटला,पोटचा गोळा ! मग जिता असाच जिव्हाळा. ४सुवास वत्सलतेचा सुटला,दिरंग कुठला ? पान्हा फ़ुटला--पाऊस पीयूषाचा पडलागढुळ जळपाट लागती वाहुं सैराट. ५ढगछत झालें विरल जरासें,आडुन गगनश्रीचें हांसेंममता उधळित विलसे खासेंतजेला आला पृथिवीच्या क्लान्त मुखाला. ६नवबाल्याचें कुतुक उगवलें,गतकाल स्मृतिचित्र पुसटलें,अनघ बाल-मन गाऊं लागलें,ये रे पावसा ! देईन तुला मी पैसा ! ७१५ जून १९१२ ( १९१५ ? ) N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP