मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|करुणापर मागणें| अभंग १९ ते २१ करुणापर मागणें अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते १८ अभंग १९ ते २१ अभंग २२ ते २४ अभंग २५ ते २८ करुणापर मागणें - अभंग १९ ते २१ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग १९ ते २१ Translation - भाषांतर १९. विठोबाचे बहु उपकार शिरीं । चुकविली फेरी चौर्यांशीची ॥१॥भ्रमणा दु:खाच्या बहुत वेदना । म्हणोनी नारायणा शरण आलों ॥२॥अनाथाच्या नाथा तूं दीनाचा गोसावी । तोडर तुझ्या पायीं शोभे देवा ॥३॥कर्ता करविता सर्व तुझी सत्ता । विश्वाचा चाळिता चित्तवृत्ती ॥४॥विठा म्हणे नाम स्मरे त्याचे मुखीं । बहुकेलें सुखी शरणागतें ॥५॥२०. पतितपावन ऐकिलासी कानीं । म्हणोनी चक्रपाणी शरण आलों ॥१॥जपतप नेणें मूढ मतिहीन । बोबडें गाईन नाम तुझें ॥२॥मग कृपाळुवा जी वोळला संपूर्ण । वोलावलें मन भक्तिबोधें ॥३॥विठा म्हणे पूर्वपुन्या कांहीं होतें । तरीच पंढरिनाथें अंगिकारिलें ॥४॥२१. ऐसें सुख कोठें आहे । मुक्त मागोन करिसी काय ॥१॥सांडोनी पंढरीची वारी । मोक्ष मागे तो भिकारीं ॥२॥सांडोनी वाळवंट । कां बा इच्छिसी वैकुंठ ॥३॥मुखीं कवळ काल्याचे । ऐसे वैकुंठीं बा कैंचे ॥४॥नामयाचा विठा खेळे । बाप नामची माझें भोळें ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP