करुणापर मागणें - अभंग ७ ते ९

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या

७.
मी तुझा पोसणा अगा नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥१॥
तुझा म्हणवितां आणिका शरण जातां । लाज माझ्या चित्ता वाटे थोर ॥२॥
रायावा सेवक रकांचिये द्वारीं । फिरतां घरोघरीं लाज कोणा ॥३॥
विठा म्हणे देवा मी तुझा शरण । मागतसें दान नाम तुझें ॥४॥
८.
जावोनी वेव्हार सांगेन पंढरी । जेथें पुंडलिक द्वारीं उभा केला ॥१॥
देवोनी जाय कां घेवोनी जाय । आतां न सोडीं पाय केशवाचे ॥२॥
एक अंगेसी एक जांगेसी । तरी जीवें हृषिकेशी न सोडीं तुज ॥३॥
वेव्हारा सन्निधी पुंडलिक लोभा । विठा म्हणे उभा तेणें केला ॥४॥
९.
उभया धरणें आपण बैसला । म्हणोनी भला भला वेव्हारु हा ॥१॥
आमुच्या वेव्हारीं साक्ष हा एकू । पुंडलिकें लोकू उद्धरिला ॥२॥
नाहीं तरी वेव्हारु अवघाचि खोटा । पुंडलिकाचे चोहटा उभा असे ॥३॥
ऐसें सात पांच वेव्हारीं बुडविले येणें । विठा म्हणे धरणें जीवीं पाय तुझे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP