मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|करुणापर मागणें| अभंग १० ते १२ करुणापर मागणें अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते १८ अभंग १९ ते २१ अभंग २२ ते २४ अभंग २५ ते २८ करुणापर मागणें - अभंग १० ते १२ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग १० ते १२ Translation - भाषांतर १०. मी तुझा अंकिला अगा पंढरिनाथा । ब्रीद आपुलें आतां साच करीं ॥१॥पतितपावन ऐसें बोलती पुराणें । तारियले हीन अनंत याती ॥२॥म्हणोनी ब्रीदाचा तोडर तुझ्या पायीं । गर्जताती घाई वेदश्रुती ॥३॥विठा म्हणे मज देईं चरणसेवा । आणिक केशवा न मागें कांहीं ॥४॥११. तीर्थ तपें व्रतें देवातें जोडिलें । तें नामदेवासी दिधलें प्रेमसुख ॥१॥ऐक्यसुख परब्रम्हा साधिलें । यश जें जोडिलें त्रिभुवनींचें ॥२॥धन्य तुझें नाम धन्य तुझें नाम । धन्य देवा प्रेम तुझें पायीं ॥३॥नामा गोतामाजी पायाळु जन्मला । देव भावें आला भूमंडळीं ॥४॥स्वर्गींचें ठेवणें उमगिलें तेणें । केशवनाम नाणें अगणित ॥५॥नेत्रीं लेईला भक्तीचें अंजन । उमगिलें निधान नामनाणें ॥६॥विठा म्हणे देवा तें प्रेम पायीं । न मागतां देईं केशिराजा ॥७॥१२. भिऊनियां निघे समर्थाचे पाठी । वैरियाची भेटी न करी तया ॥१॥तैसा तुज आलों शरण केशणें । मज त्वां राखावें चरणांजवळी ॥२॥न करा उदास न राखा अभिमान । माझे अगमन विचारी कां ॥३॥तुझेनि जें होईल तें मी मागेन । चरणसेवा करीन अहर्निशी ॥४॥अविद्या अपार संचली हे देवा । याचा मजकूर दावा नाहीं कोणी ॥५॥देवा मज आतां नको गर्भवास । विटा विष्णुदास विनवीतसे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP