करुणा - अभंग २२ ते २४

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२२.
मी वत्स माझी गायी । नये आतां करूं काई ॥१॥
तुम्हीं तरी सांगा कांहीं । शेखी विनवा विठाबाई ॥२॥
येईं माझिये हरणे । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥
२३.
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पायां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चित्ता  । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जावें ओंवाळुनी । जन्मोजन्मीं म्हणे जनी ॥४॥
२४.
कां गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥१॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळीं हर्षें दीनां ॥२॥
शिकवावें तूंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥
स्वामीलागीं धीट ऐसी । म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP