करुणा - अभंग १६ ते १८

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६.
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काय ॥१॥
तुझी नाहीं केली सेवा । दु:ख वाटे माझ्या जिवा ॥२॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥
जें जें दु:ख झालें मला । तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥
क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पायां ॥५॥
१७.
ऐक बापा ह्रषिकेशी । मज ठेबीं पायांपाशी ॥१॥
तुझें रूप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥
तुजविण देवराया । कोणी नाहींरे सखया ॥४॥
कमळापति कमळपाणी । दासी जनी लागे चरणीं ॥५॥
१८.
पोट भरूनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा धिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें नि:संगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार । मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP