करुणा - अभंग ५ ते ८

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५.
गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥
६.
माझी आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥
आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रषिकेशी ॥२॥
तुजवांचुनी विठ्ठ्ला । कोणी नाहींरे मजला ॥३॥
माथा ठेवीं तुझे चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
७.
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
वेधु माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जीव ओंवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
८.
कां गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी । मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर । तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥  


Last Updated : January 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP