मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्रीगुरुबोध ग्रंथ| चतुर्थ प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - चतुर्थ प्रकरण श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : kavyapoemकाव्यबांदकर श्रीगुरुबोध ग्रंथ - चतुर्थ प्रकरण Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनम: ॥ आतां नाम मिथ्या ठरलें । परी रूप सत्य वाटलें । तेंही सांगतों ह्रदयीं धरिलें । पाहिजे तुवां ॥१॥रूप बिघडे प्रतिवर्षीं । हें तूं निवाडें जाणसी । मग रूपचि सत्य धरसि । हें वेडेपण ॥२॥बाळपणींचें रूप एक । तरुणपणींचें दुजें देख । वृद्धपणींचें पाहतां मुख । हासती मुलें ॥३॥ऐसीं रूपें बहुत होतीं । वृद्धपणींची मोठी फजीती । घरींचीं सुद्धां न पाहतीं । ढुंकोनि त्यातें ॥४॥असो रूपचि सत्य मानावें । तरी देह पडे तों एकचि असावें । एक न राहे म्हणूनि गणावें । बहुत ऐसें ॥५॥नामरूपें देहासि पडलीं । तुंवा तुझीं ऐसीं कल्पिलीं । हेचि भ्रमरूप वृत्ति पहिली । वोळख तूं ॥६॥मी देह वाटणें हेचि माया । प्रपंचा आरंभ याचि ठाया । निश्चय धरीं शिष्यराया । वचनावरी ॥७॥मन भलतीकडे वागविसी । तरी श्रवणीं लाभ काय तुजसी । जरी एकाग्रचित्तें ऐकसी । तरी पावसी मोक्ष ॥८॥‘माझा’ देह ऐसें बोलणें । तो ‘मी’ कैसेनि होणें । मी देह मी देह म्हणणें । हें मूर्खपण ॥९॥परमार्थीं पाहिजे विचार । विशेष सद्गुरुवचनीं निर्धार । तरी मग सुलभ साचार । सर्व होय ॥१०॥नलगे सायास वनवास । घरीं बैसोनि करावा अभ्यास । हळूहळू चित्तास । आवरीत जावें ॥११॥एकांत स्थानीं बैसावें । वृत्ति उठे तिला पाहावें । पाहूनि मागें रहावें । वेगळेपणें ॥१२॥मागें राहणें तें कैसें । ज्ञानस्वरूप आपण ऐसें । तेथें स्थूल देहाचें पिसें । कल्पूंच नये ॥१३॥वृत्तीचा जेथूनि उगम । तेंचि आपुलें स्थान उत्तम । जेथें मी देह हा भ्रम । नि:शेष जाय ॥१४॥वृत्ति आपणासि दिसे । आपण कोणासि न दिसे । जाणतेपणीं असतचि असे । सर्वकाळ ॥१५॥वृत्ती अनंत उठती । देखणा एकचि निश्चितीं । ऐसी धरोनि आत्मस्थिति । ढळावेंना ॥१६॥जरी वृत्तींची चुलबूळ । तरी आपुलें स्थान अचळ अढळ । सोडूंच नये सर्वकाळ । द्दढ धरावें ॥१७॥ऐसियापरि अभ्यासितां । कल्पना निमों लागती तत्वतां । एक आपण उरे आयता । सच्चिदानंद ॥१८॥इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥१९॥इति श्रीगुरुबोधे चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP