मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्रीगुरुबोध ग्रंथ| द्वितीय प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ प्रथम प्रकरण द्वितीय प्रकरण तृतीय प्रकरण चतुर्थ प्रकरण पंचम प्रकरण षष्ठ प्रकरण सप्तम प्रकरण अष्टम प्रकरण नवम प्रकरण श्रीगुरुबोध ग्रंथ - द्वितीय प्रकरण श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला. Tags : kavyapoemकाव्यबांदकर द्वितीय प्रकरण Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशायनम: ॥ त्रिविधतापें तापलों । दारापुत्रीं उबगलों । प्रपंच करितां त्रासलों । वारंवार ॥१॥या दु:खांतूनि पार करी । ऐसा कोण या संसारीं । मिळेल तरी चरणांवरी । लोळेन त्यांच्या ॥२॥ऐसी करितां तळमळ । भिऊं नको ऐसा मंजूळ । शब्द ऐकूं आला प्रांजळ । देहामागें ॥३॥आनंदी आनंद वाटला । दु:खसागर आटला । चिन्मय मूर्ति भेटला । सद्नुरुराज ॥४॥पाहतां दिव्यकांति । डोळे दिपोनि गेले निश्चितीं । सर्व भावें चरणांप्रती । शरण गेलों ॥५॥तनुमनधन अर्पिलें । मग प्रार्थनेतें आरंभिलें । मज संसारापासोनि तारिलें । पाहिजे स्वामी ॥६॥देहबुद्धीनें नाडलों । अत्मस्वरूपा विसरलों । विषयरंगीं रंगलों । रात्रदिवस ॥७॥माझा पुत्र माझी कांता । सुखी राहो ऐसी चिंता । एकही दिवस भगवंता । नाठविलें जी ॥८॥व्यापार बहुत चालविला । आयुष्यकाळ घालविला । ज्ञानदीप मालविला । प्रपंचवातें ॥९॥आतां बुद्धि आठवली । माझी वयसा व्यर्थचि गेली । पश्चात्तापें उबगली । चित्तवृत्ती ॥१०॥यासि आतां काय करूं । कैसेनि हा संसार तरूं । दु:खसागराचा परपारू । पावेन जी ॥११॥मी तुमचा सर्वभावें । तुम्हां पाहिजे तें करावें । धरावें कीं सोडावें । तुम्हांपाशीं ॥१२॥शरणागतांचें रक्षण । हेंचि आपुलें ब्रीद जाण । तरी तारावें मजलागून । सद्गुरुस्वामी ॥१३॥तुम्ही ईश्वराचे अवतार । सर्वजगासी आधार । तुम्हांसि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥१४॥तुमच्या कृपेचा पारु । नेणवे ब्रम्हादिकां निर्धारु । भवसागरींचें तारूं । हेचि पाय ॥१५॥मी बालक अज्ञान । करावया न कळे स्तवन । मंदमति हीन दीन । पायीं पडतों ॥१६॥तुमचें नाम पतितपावन । मी पतीत आलों शरण । आतां माझें उद्धरण । करावें जी ॥१७॥ऐसी करोनि प्रार्थना । साष्टांग नमस्कार चरणां । घातला तेव्हां सद्गुरु राणा । कृपेनें द्रवला ॥१८॥प्रेमें कवटाळूनि ह्रदयासी । कूर्मद्दष्टीं पाहिलें मजशीं । बोलिले बाळा कष्टी झालासी । बहुत जन्म घेउनी ॥१९॥अभयवचन दिधलें । तेणें मन सुखावलें । भवभय पळोनि गेलें । त्याचिवेळीं ॥२०॥इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥२१॥इति श्रीगुरुबोधे द्वितीय प्रकरणं संपूर्णम् ॥२॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP