श्रीगुरुबोध ग्रंथ - प्रथम प्रकरण

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्री समर्थ रामदास वैष्णव सद्‍गुरु श्रीकृष्णजगन्नाथ चरणारविंदेभ्यो नम: ।
॥ श्रीगणेशायनम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥ नमूनि वैष्णव सद्नुरु । कृष्णजगन्नाथ ह्रययीं धरूं । तेणें हा भवसागरु । थेंबुटा होय ॥१॥
ज्यांच्या पूर्ण कृपेचा प्रसाद । बोलतां नये तो अगाध । जेथें मायेचा बाध । लगों शकेना ॥२॥
जेथें श्रुति नेति वदती । तो म्यां पामरें वर्णावा किती । परंतु बोलतों यथामतीं । आज्ञाबळें करूनि ॥३॥
सहज स्वरूपीं असतां । स्फूर्ति झाली अवचितां । तीच आज्ञा मानूनि तत्वतां । प्रासंभ आतां करितसें ॥४॥
श्रीसमर्थांचा अवतार । दुसरा कृष्णदास नामें निर्धार । ज्यांच्या कृपेनें भवपार । पावले प्राणी ॥५॥
नामाभिधानें डोंगरी । प्रत्यक्ष केली अयोध्यापुरी । अनुभव निरभिमानी नरीं । घेइजे स्वयें ॥६॥
ऐसा जयांचा प्रताप । जळोनि जाती त्रिविधताप । अखंड सुख आपेंआप । वाढों लागे ॥७॥
पिंडब्रम्हांडातें ग्रासी । ऐसा अनुभवसूर्य उदयासी । येतां, अज्ञानतिमिरासी । ठाव कैंचा ॥८॥
या अनुभवीं जे विराले । तेचि एक मुक्त झाले । येर अवघे ठकोनि गेले । विषयसुखा भुलोनी ॥९॥
ऐसें ज्ञान जिहीं दिधलें । जन्मांपासोनि मुक्त केलें । अभ्यासितां मीपण गेलें । समूळ विरोनी ॥१०॥
यासि मीं आतां काय द्यावें । उपकार कैसे फेडावे । हा देह जीवेंभावें । ओंवाळीन पायीं ॥११॥
जो जो पदार्थ भेटे । तो तो सद्‌गुरुपचि वाटे । अविद्यारचित काटे । बुजोनि जाती ॥१२॥
देहास विश्वीं पाहतां । सद्नुरूवांचोनि न दिसे तत्वतां । यास्तव त्यांसि कोणता । पदार्थ अर्पावा ॥१३॥
आतां आम्ही एकचि करूं । त्यांचे चरण ह्रदयीं धरुं । तेणें हा संसार तरूं । निमिषमात्रें ॥१४॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । ह्रदयीं भेटे ॥१५॥
इति श्रीगुरुबोधे प्रथम प्रकरणं संपूर्णम्‌ ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP