पिंड ब्रह्मांड निवारण - सप्तम पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.


॥ श्रीगणेशायनम: ॥

मंथीं कल्पियेलें ज्ञान । त्यासी अनुभव प्रमाण ।
वाचाळ ह्मणती अप्रमाण । परिहार ऐकावा ॥१॥
भवद्नीता भागवत । सवालक्ष तें भारत ।
अष्टादश पुराण ग्रंथ । अनुभवें लिहिला ॥२॥
चारी वेद साही शास्त्रें । अष्टव्याकर्ण नाना तंत्रें ।
नाना यंत्रे । अनुभवें लिहिले ॥३॥
श्रीमत्शंकराचार्य । त्याणीं केलें जीवकार्य ।
ब्रह्मकारण प्रपंचकार्य । तदनुसारें लिहिला ॥४॥
कारण प्राप्तीचा प्रकार । सांगितला सारासार ।
साधन गुरुपरंपर । तदनुसारें लिहिला ॥५॥
ग्रंथ सर्व ग्रंथांवर । आणि आचार्य शंकर ।
भगवद्नीतादि ग्रंथ सारे । न पाहूनि पाहिजे ॥६॥
ह्मणतां जिव्हेचें ते रवंड । होऊनि होईल दुरवंड ।
ह्मणती श्रोतेही वितंड । बोलूं नये सर्वथा ॥७॥
द्वंद्बा श्रोता आला ऐसा । वक्ता ह्मणे यथावकाशा ।
ऐका बोलतों मी ऐसा । सप्रमाण बोलिलों ॥८॥
आपुले जाणिवेनें कळे । अवघें त्रिभुवन रचिलें ।
तरी मी जें कां बोलिलें । मिथ्या नव्हे सर्वथा ॥९॥
सागराची प्राप्ती होतां । मग तिर्थें आलीं हाता ।
तैसी आत्म प्राप्ती होतां । ग्रंथ मात्र पाहिले ॥१०॥
वृक्ष मुळासी पावतां । स्कंद शारवा आल्या हाता ।
तैसी आत्म प्राप्री होतां । ग्रंथ तितुके पाहिले ॥११॥
श्रुति स्मृति प्रमाण लिहितां । समरतंसी तरी आतां ।
ग्रंथा येईल विस्तारता । ह्मणूनि ग्रंथ आटोपीं ॥१२॥
स्त्रिया शुद्रादी पाहती । येथें लिहितां श्रुति स्मृती ।
प्रसार होईल तयां प्रती । ह्मणोनि लिहिणें ठेविलें ॥१३॥
असों किती बोलूं आतां । साक्षात्कारावीण रवोटा ।
आत्मा अनुभवी जो तत्वता । त्यासी ग्रंथीं आनंद ॥१४॥
ऐसा परिहार लिहितां । ग्रंथ वाढूं पाहे आतां ।
मूर्ख गर्विंष्ट ज्या ताठा । त्यासी माझा साष्ठांग ॥१५॥
परंपरा सांप्रदाय । सोडूनि ग्रंथ लागे काय ।
साक्षात्काराविण पाहे । त्यासी ग्रंथीं समजे ना ॥१६॥
आदिनाराणा पासून । परंपरा आली जाणून ।
साक्षात्कारी पुरुष पाहून । उपदेश घेतला ॥१७॥
स्वरूप संप्रदाय अयोध्या-मत । सितादेवी सम दैवत ।
उपासन पवन सुत । मोक्षजाणा गायत्री ॥१८॥
त्रयोदशाक्षरी मंत्र जाण । त्यारक त्यासी नामाभिधान ।
त्रिविध समाधी साधन । ग्रंथीं ते म्यां लिहिले ॥१९॥
ग्रंथ स्तुती करिती बहू । असती संसारभार वाहू ।
त्यासी ग्रंथीं रुची होऊ । ह्मणूनि ग्रंथ स्तविला ॥२०॥
अक्कलवंत असे नर । त्यासी न लागे उपचार ।
मुर्खा टोणग्याचा मार । शहाण्या मार शद्वांचा ॥२१॥
गारुडयानें बहु केलें । नगर सोन्याचें रचिलें ।
मूर्ख जनासी विकिलें । शहाणा कांहीं न घे तें ॥२२॥
तैसें आत्मज्ञान नसतां । पूर्व पक्ष येतो ग्रंथा ।
सिद्धांतासी गांठ पडतां । पूर्व पक्ष उडतो ॥२३॥
अमृत कडू ह्मणोनि तोंडीं । घालूं जातां लागे गोडी ।
तैसी स्तुतीची परवडी । न करितां गोड हा ॥२४॥
साधूसंत महाजन । योगी वितरागी वित्पन्न ।
त्रिकाळ साष्ठांग नमन । वैष्णवांचें असों त्यां ॥२५॥
लघु आत्ममथन ग्रंथ । केला जाण म्या यथार्थ ।
त्यासी प्रमाण भगवंत । अयोध्यावासी श्रीराम ॥२६॥

इति श्रीलघुआत्ममथने, गुरु शिष्य कथने, ग्रंथाभान निवारण सप्तम पद समाप्त:

॥ श्रीमत् सीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP